क्षेत्रभेट
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-१- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :
|
क्षेत्रभेट : एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, तेथील घटनांवर, प्रक्रियांवर, कार्यपद्धतीवर वा समस्यांवर थेट अनुभव घेणे आणि त्यातून शिक्षण घेणे. म्हणजे 'क्षेत्रभेट' होय.
क्षेत्रभेटीचे उद्दिष्ट /महत्त्व :
- क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा, प्रक्रियांचा व उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
- क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
- क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक
- परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
उदाहरणे:
- भूगोल शिकताना नदी, डोंगर किंवा गावाचा अभ्यास करण्यासाठी तिथे जाणे.
- समाजशास्त्रात ग्रामीण भागातील समाजरचना पाहण्यासाठी गावभेट.
- विज्ञान विषयासाठी कारखान्याला भेट देणे.
- पर्यावरण अभ्यासासाठी जंगल किंवा अभयारण्यात भेट.
क्षेत्रभेटीचे नियोजन :
क्षेत्रभेटीची तयारी/तपशीलवार नियोजन :
(i) ठिकाणनिश्चिती :
- क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे.
- उदा., नदीकिनारा, समुद्रकिनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी.
(ii) हेतूनिश्चिती :
- क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे.
- उदा., थंड हवेच्या ठिकाणास व समुद्रकिनाऱ्यास भेट देऊन या दोन ठिकाणांतील हवामानांतील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी.
(iii) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता :
- क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे.
- उदा., कारखान्यास भेट देण्यासाठी कारखान्याच्या मालकाने/व्यवस्थापकाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.
(iv) प्रश्नावली निर्मिती :
क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे.
उदा., शेतास भेट देताना शेतकऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे :
- तुमची शेतजमीन कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे?
- शेतातील पिकांची नासधूस होऊ नये म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेता?
- तुम्ही शेतीसाठी कोणती जलसिंचन पद्धत वापरता?
- तुम्ही कोणत्या प्रकारची बियाणी वापरता?
- तुम्हांला शेतीमधून मिळणारे वार्षिक उत्पन्न किती आहे? इत्यादी.
(v) उपयुक्त साहित्य :
- माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
- स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.
- क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
- क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पर्तींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.
(vi) खबरदारी :
क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे :
- क्षेत्रभेटीदरम्यान स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे व ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकांची यादी बरोबर ठेवणे.
- क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे पालन करणे.
- क्षेत्रभेटीदरम्यान स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची सखोल व अचूक माहिती मिळणे.
- क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रातील मालमत्तेचे व तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याविषयी खबरदारी घेणे.
- क्षेत्रभेटीचा हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने माहितीचे संकलन करणे.
क्षेत्रभेटीचा अहवाल :
क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर त्याविषयी अहवाललेखन करणे आवश्यक ठरते.:
क्षेत्रभेट अहवाल साधने / आधार :
- क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती
- क्षेत्रभेटीच्या ठिकाणची छायाचित्रे
- क्षेत्रभेटीसाठी वापरण्यात आलेले नकाशे/आराखडे
- तक्ते
- चित्रे इत्यादी.
क्षेत्रभेट अहवालातील मुद्दे :
- प्रस्तावना.
- क्षेत्रभेटीचे महत्त्व व उद्दिष्टे,
- संबंधित क्षेत्रातील प्राकृतिक रचना, नद्या, तलाव, हवामान, पर्जन्यमान.
- उद्योग, पिके, प्राणी, वनस्पती, घरे व घरांची रचना.
- संबंधित क्षेत्रातील वाहतुकीच्या सोयी, लोकजीवन, समस्या
- संबंधित क्षेत्रातील लोकसंख्या, लोकांचा आहार, पोशाख, संस्कृती इत्यादी बाबींविषयीच्या माहितीचे संकलन.
- माहितीचे चित्रांच्या, छायाचित्रांच्या, तक्त्यांच्या, आलेखांच्या साहाय्याने सादरीकरण.
- निष्कर्ष, आभार प्रदर्शन व संदर्भसूची.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-१-क्षेत्रभेट-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-१-क्षेत्रभेट-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Useful links :
| Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल- - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- २ : स्थान-विस्तार - Online Notes |
