स्थान-विस्तार
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
भूगोल या विषयाच्या अभ्यासासाठी अत्यावश्यक क्षमता :
भूगोल या विषयाच्या अभ्यासासाठी व परिणामकारक आकलनासाठी पुढील क्षमता आत्मसात कराव्या लागतात :
- निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, नकाशा वाचन, मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण, चिकित्सक विचार.
भौगोलिक ज्ञानाच्या उपयोजनातून प्रदेशाचा अभ्यास :
भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून एखाद्या प्रदेशाचा अभ्यास केल्यास पुढील फायदे होतात :
- प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची जाण होते.
- प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले हे समजते.
- प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या समजतात.
- प्रदेशातील पर्यावरणाच्या व्हासावरील उपायांचा विचार करता येतो.
- प्रदेशातील विविध घटनांचा क्रम लक्षात येतो व त्यातील बदलांची प्रक्रिया समजते.
- प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींना सक्षमपणे तोंड देता येते.
- प्रादेशिक असमतोलाची कारणे शोधता येतात व त्यानुसार उपाययोजनांचा विचार करता येतो.
- प्रदेशातील भविष्यातील घटनांचा किंवा समस्यांचा अंदाज बांधता येतो.
भारत व ब्राझील- तौलनिक अभ्यास :
भारत :
(i) महत्त्वाची माहिती :
- राजधानी : नवी दिल्ली.
- शासनप्रणाली : स्वातंत्र्यप्राप्तीपासून, म्हणजेच १९४७ पासून संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणाली.
- जागतिक लोकसंख्येतील क्रमांक : दुसरा.
- लोकप्रिय खेळ : क्रिकेट.
- विशिष्ट ओळख : मसाल्यांच्या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध.
- नृत्यप्रकार : कथकली, भरतनाट्यम इत्यादी,
(ii) स्थान, विस्तार व सीमा :
- स्थान : उत्तर आणि पूर्व गोलाधांत विस्तार. आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थान.
- अक्षवृत्तीय विस्तार : मुख्य भूमी : ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहामधील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' हे भारताचे अतिदक्षिण टोक.
- रेखावृत्तीय विस्तार : ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त.
- वृत्त स्थिती : भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.
इतर महत्त्वाची माहिती :
- राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य होय.
शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे :
| दिशा | शेजारचे देश | सागर/महासागर |
| पूर्व | बांग्लादेश,म्यानमार | बंगालचा उपसागर |
| उत्तर | अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान | --- |
| पश्चिम | पाकिस्तान | अरबी समुद्र |
| दक्षिण | श्रीलंका (सागरी सीमांशी संलग्न), इंडोनेशिया (सागरी सीमांशी संलग्न) | हिंदी महासागर |
(iii) ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यःस्थिती :
- परकीय राजवट : सुमारे दीड शतके ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली.
- स्वातंत्र्यदिन : १५ ऑगस्ट १९४७.
- स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीच्या समस्या : तीन युद्धे व दुष्काळी परिस्थिती.
इतर महत्त्वाची माहिती :
- भारत हा विकसनशील देश असून एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे.
- भारतात स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यांवर आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. परिणामी भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे.
- भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण अधिक आहे (सुमारे ५१ टक्के). त्यामुळे भारताकडे 'तरुण देश' म्हणून पाहिले जाते.
ब्राझील :
(i) महत्त्वाची माहिती :
- राजधानी : ब्राझीलिया.
- शासनप्रणाली : १९८५ पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणाली.
- जागतिक लोकसंख्येतील क्रमांक : पाचवा.
- लोकप्रिय खेळ : फुटबॉल हा ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ आहे.
- विशिष्ट ओळख : कॉफीसाठी सुप्रसिद्ध; 'जगाचा कॉफी पॉट'.
- नृत्यप्रकार : सांबा या नृत्य प्रकारासाठी ब्राझील हा देश प्रसिद्ध आहे.
इतर महत्त्वाची माहिती :
- ब्राझील देशाचे नाव ‘पाऊ ब्रासील’ या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.
- कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते.
- ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील आकारमानाने सर्वांत मोठा देश आहे.
- ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. ब्राझीलने आजवर पाच वेळा 'फिफा विश्वचषक' जिंकला आहे.
- पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध आहेत.
(ii) स्थान, विस्तार व सीमा :
- स्थान : ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धांत आहे. काही भागाचा उत्तर गोलार्धात व बहुतांश भागाचा दक्षिण गोलार्धात विस्तार. पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात स्थान.
- अक्षवृत्तीय विस्तार : ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त.
- रेखावृत्तीय विस्तार : ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त.
- वृत्त स्थिती : ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते; तर दक्षिण भागातून मकरवृत्त जाते.
शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे :
| दिशा | शेजारचे देश | सागर/महासागर |
| पूर्व | --- | दक्षिण अटलांटिक |
| उत्तर | फ्रेंच गियाना, सुरीनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया | उत्तर अटलांटिक |
| पश्चिम | पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे | --- |
| दक्षिण | अर्जेंटिना, उरुग्वे | --- |
(iii) ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यःस्थिती :
- परकीय राजवट : सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली.
- स्वातंत्र्यदिन : ७ सप्टेंबर १८२२.
- स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीच्या समस्या : विविध वित्तीय समस्या.
इतर महत्त्वाची माहिती :
- १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती.
- विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे.
- भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. अशा प्रकारे, जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२-स्थान-विस्तार-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२-स्थान-विस्तार-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Useful links :
| Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल- - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ- १ : क्षेत्रभेट - Online Notes Next Chapter : पाठ- ३ : प्राकृतिक रचना व जलप्रणाली - Online Notes |
