Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-२-इतिहासलेखन : भारतीय परंपरा-Maharashtra Board

इतिहासलेखन : भारतीय परंपरा

इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-२ महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
  • भारतीय इतिहासलेख : विविध तात्त्विक प्रणाली

भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल :

प्राचीन काळातील इतिहासलेखन :

  • प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा, सामाजिक स्थित्यंतरे यांच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात असत.
  • पाच हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात होती, परंतु त्या लिपीचे वाचन करण्यात अजूनही यश मिळालेले नाही.
  • भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट व शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे.
  • मौर्य सम्राट अशोक याच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात होते.

इतिहासलेखनाची महत्त्वाची साधने :

प्राचीन भारतीय साहित्यामध्ये,

  • रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे,
  • जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ,
  • भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य
  • परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने

ही इतिहासलेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात.

प्राचीन लिखित साधनांतून मिळणारी माहिती :

  • विशिष्ट काळातील राजांची वंशावळ, राजकीय घडामोडी व शासनव्यवस्था.
  • तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, नैसर्गिक संकटे इत्यादी.
  • त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवन.
  • बाणभट्टाच्या 'हर्षचरित' या संस्कृत काव्यातून सातव्या शतकातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक जीवनाचे वास्तववादी चित्रण वाचायला मिळते.

सोहगौडा ताम्रपट :

  • उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा येथे ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक मौर्यकालीन ताम्रपट सापडला आहे.
  • त्यावर वृक्ष, पर्वत, धान्याचे कोठार अशी चिन्हे कोरलेली आहेत.
  • कोठारातील धान्य जपून वापरण्याचा आणि दुष्काळाच्या वेळी कशी काळजी घ्यावी, या संदर्भातील हे आदेश असावेत, असे मानले जाते.
  • या ताम्रपटामुळे मौर्य काळातील माहिती मिळत असल्याने तो इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन मानला जातो.

मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन :

कल्हण :

  • कल्हण या विद्वानाने १२ व्या शतकात खंडकाव्य स्वरूपात 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला.
  • पहिल्या गोनर्द राजापासून अकराव्या शतकातल्या हर्षापर्यंत सुमारे ४००० वर्षांपर्यंतचा काश्मीरचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळतो.
  • हा ग्रंथ भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरचा भूगोल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो.
  • इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, हे या ग्रंथावरून दिसते.
  • तत्कालीन नाणी, कोरीव लेख, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा यांचा अभ्यास करून हा ग्रंथ तयार झाला आहे.

मुस्लीम इतिहासकार :

मुस्लीम इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये :

  • मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लीम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहासलेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो.
  • मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले.
  • त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते.

() झियाउद्दीन बरनी :

ग्रंथाचे नाव : ‘तारीख-इ-फिरुजशाही’ या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहासलेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे

बरनीने सांगितलेले इतिहासलेखनाचे हेतू-
  • इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही
  • तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही करायला हवे.
  • तत्कालीन विद्वान व्यक्ती, साहित्यिक, संत अशा व्यक्तींच्या सामाजिक प्रभावाचेही वर्णन करावे.

बरनीच्या या विचारसरणीमुळे इतिहासलेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली.

(२) बाबर (मुघल साम्राज्याचा संस्थापक) :

ग्रंथाचे नाव : तुझुक-इ-बाबरी (आत्मचरित्र) :

या आत्मचरित्रात पुढील माहिती दिलेली आहे-

  • त्याने केलेल्या युद्धांची वर्णने.
  • प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णने.
  • स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज व वनस्पतीसृष्टी.

(३) अबुल फजल :

ग्रंथाचे नाव : अकबरनामा

ग्रंथाची वैशिष्ट्ये-

  • अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन.
  • मिळालेल्या माहितीची विश्वासार्ह छाननी.
  • पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी संशोधन पद्धती.

(४) अलू बेरूनी (४ सप्टेंबर ९७३-डिसेंबर १०४८) :

  • मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्त्वचिंतक.
  • त्याने चंद्रग्रहण पाहून निरीक्षणात्मक माहिती लिहिली. कालगणनेवर ग्रंथ लिहिला.
  • त्याने भारतभर प्रवास करून संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला.
  • 'तारीख-ए-हिंद' या ग्रंथात त्याने भारतातील तत्कालीन स्थितीचे सर्वांगीण वर्णन केले आहे. त्याने मुहम्मदाच्या भारतावरील स्वान्यांवर टीका केली आहे.
  • त्याने पतंजलीच्या 'योगसूत्रा 'चे व कपिलमुनींच्या 'सांख्य' इत्यादी संस्कृत ग्रंथांचे अनुवाद अरबी भाषेमध्ये केले.
  • त्याने १५० ग्रंथ लिहिले असे म्हणतात. परंतु त्यांतील २७ ग्रंथच आज उपलब्ध आहेत.

मध्ययुगीन इतर मुस्लीम इतिहासकार व त्यांचे ग्रंथ :

  • हसन निजामी लिखित ताजुल-मासिर,
  • मिन्हाज-इ-सिराज - तबाकत-इ-नासिरी,
  • अमीर खुस्रो याचे विपुल लेखन, तुझुक-इ-तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र ,
  • याह्या बिन अहमद सरहिंदी - तारीख-इ- मुबारकशाही

यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते.

बखर वाङ्मय :

  • ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
  • बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.
  • बखरी प्रामुख्याने मराठाशाहीत लिहिल्या गेल्या.
  • कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या 'सभासद बखरी' त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते.
  • 'भाऊसाहेबांची बखर' या बखरीतून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
  • 'पानिपतची बखर' अशी एक स्वतंत्र बखरही पानिपतच्या लढाईवर लिहिली गेली आहे.
  • होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी 'होळकरांची कैफियत' ही एक बखर आहे.

अशा रितीने शूरवीरांच्या पराक्रमांवर, लढायांवर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात

आढळून येतात. या बखरी इतिहासलेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत.

आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ :

  • एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली.
  • अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जाणवतो.
  • भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन त्यांच्या लेखनात दिसून येतो.

भारतीय इतिहासलेखन करणारे ब्रिटिश अधिकारी :

भारतीय इतिहासलेखन करणारे ब्रिटिश अधिकारी :

(१) अलेक्झांडर कनिंगहॅम :

ग्रंथाचे नाव : The Ancient Geography of India

  • भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक.
  • अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले.
  • बौद्ध ग्रंथांमधील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन आणि संशोधनपर लेखन.

(२) जॉन मार्शल :

ग्रंथाचे नाव : (i) The Buddhist art of Gandhar (ii) Takshashila

  • यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.
  • भारतीय संस्कृती पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध झाले.

(३) जेम्स मिल :

ग्रंथाचे नाव : द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया (इ.स. १८१७ मध्ये तीन खंड प्रसिद्ध झाले.)

  • ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ.
  • लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव.
  • भारतीय संस्कृतीविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन जाणवतो.

(४) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन : मुंबईचे गव्हर्नर. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत अनेक सुधारणा.

ग्रंथाचे नाव : द हिस्टरी ऑफ इंडिया

(५) जेम्स ग्रँट डफ :

ग्रंथाचे नाव : ए हिस्टरी ऑफ द मराठाज् (तीन खंड)

  • भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती या ग्रंथातून जाणवते.
  • ग्रंथात मराठ्यांचा इतिहास दिलेला आहे.

(६) कर्नल टॉड :

ग्रंथाचे नाव : Tod's annals of Rajasthan

  • राजस्थानचा इतिहास लिहिला. या ग्रंथातही भारतीयांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आढळून येते.

(७) विल्यम विल्सन हंटर :

ग्रंथाचे नाव : A Brief History of the India

  • हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्याच्या इतिहासलेखनात निष्पक्षपाती वृत्ती दिसून येते.

() सर अलेक्झांडर कनिंगहॅम (२३ जानेवारी १८१४- २८ नोव्हॅबर १८९३) :

  • एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश अमदानीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली.
  • 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण' या स्वतंत्र खात्याची स्थापना होऊन अलेक्झांडर कनिंगहॅम यांची या खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून नेमणूक झाली.
  • सारनाथ, सांची येथे उत्खनन करून त्यावर ग्रंथ लिहिला.
  • काश्मीरमधील मंदिरांच्या वास्तुशिल्पांवर लेखन केले.
  • नाणकशास्त्र, मंदिरे, स्तूप, भूगोल यांवर पुस्तके लिहिली.
  • बोधगयेतील बौद्ध अवशेषांचा अभ्यास व संशोधन केले.
  • भारतीय पुरातत्त्वविषयक विविध शाखांतील संशोधनाचा पाया घातला.

() सर जॉन हयुबर्ट मार्शल (१९ मार्च १८७६- १७ ऑगस्ट १९५८) :

  • त्यांच्या नेतृत्वाखाली मोहेंजोदडो, तक्षशिला, सांची, श्रावस्ती, पाटणा, सारनाथ इत्यादी ठिकाणी उत्खनन झाले.
  • त्यांनीच पुराणवास्तू व वस्तू संरक्षणाचा कायदा १९०४ साली संमत करवून घेऊन भारतातील प्राचीन वास्तूंना शासनाकडून संरक्षण मिळवून दिले.
  • भारतीय संशोधकांना पुरातत्त्वीय उत्खननाचे प्रशिक्षण दिले.
  • संग्रहालयांमध्ये वाढ केली.
  • अनेक शिलालेख शोधून त्यांवरील माहिती प्रसिद्ध केली.
  • 'सिंधू संस्कृतीचा शोध' हे त्यांचे महत्त्वाचे कार्य.

(१०) जेम्स मिल (६ एप्रिल १७७३-२३ जून १८३६) :

  • इंग्लंडमधील स्कॉटलंड प्रांतातील मिल हे तत्त्वज्ञ, इतिहासकार व अर्थतज्ज्ञ होते. ते उपयुक्ततावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते.
  • त्यांनी तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राजकीय व सामाजिक धोरणे यांवर विपुल लेखन केले.
  • त्यांनी १८०६ साली ब्रिटिश भारताचा इतिहास ('द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया') लिहिण्यास प्रारंभ केला व १८१७ साली तो तीन खंडांत प्रसिद्ध केला.
  • हा ग्रंथ भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा व विस्ताराचा हा पहिला इतिहास होय.
  • सत्तासंपादनासाठी ज्या पद्धतींचा वापर केला गेला, त्यांवर या ग्रंथांत त्याने टीका केली आहे.
  • या ग्रंथामुळेच त्यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या 'इंडिया हाउस' या मुख्य कार्यालयात नेमणूक झाली.
  • त्यांच्या १७ वर्षांच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश शासनव्यवस्थेत सुधारणा झाली.

(११) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन (६ ऑक्टोबर १७११- २० नोव्हेंबर १८५९) :

  • एल्फिन्स्टन हे १८१९ ते १८२७ या काळात मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते.
  • ते कर्तबगार प्रशासक, मुत्सद्दी आणि इतिहासकार होते. त्यांनी कायद्याचे स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
  • त्यांनी ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर भोसले, दुसरे बाजीराव पेशवे अशा अनेकांच्या दरबारी काम केले.
  • मुंबई इलाख्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत त्यांनी फार मोठे कार्य केले.
  • मातृभाषा व इंग्रजी भाषा अशी शिक्षण पद्धती त्यांनी सुरू केली.
  • स्थानिकांच्या शिक्षणासाठी छोटी पुस्तके छापून घेतली.
  • शिक्षणासाठी 'दक्षिणाफंड' उभारला. अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली.

(१२) जेम्स ग्रँट डफ (८ जुलै १७८९-२३ सप्टेंबर १८५८) :

  • जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज्' हा ग्रंथ तीन खंडांत लिहिला.
  • मराठी साम्राज्याचा अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचा समावेश होतो.
  • भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती जेम्स ग्रँट डफच्या या इतिहास ग्रंथातही जाणवते. परंतु पहिला सुसूत्र, एकसंध मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्त्वाचे आहे.
  • नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी ग्रँट डफच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.

[collapse]

भारतीय इतिहासलेख : विविध तात्त्विक प्रणाली

वसाहतवादी इतिहासलेखन :

  • ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा यात समावेश होता.
  • भारतीय संस्कृती गौण आहे, ही त्यांची दृष्टी लेखनात जाणवते.
  • वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहासलेखन केले.
  • 'केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथाच्या पाचही खंडांत वसाहतवादी इतिहासलेखन आढळते.

प्राच्यवादी इतिहासलेखन :

  • अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
  • या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
  • प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून 'या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती,' अशी कल्पना मांडली.
  • या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

प्राच्यवादी इतिहासकार :

  • सर विल्यम जोन्स : इ.स. १७८४ मध्ये कोलकाता येथे 'एशियाटिक सोसायटी 'ची स्थापना केली. प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला चालना दिली.
  • फ्रेडरिक मॅक्सम्युलर : संस्कृत साहित्याचा अभ्यासक. 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. 'द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट' या नावाने ५० खंड प्रकाशित केले. ऋग्वेदाचे संकलन केले व जर्मन भाषेत भाषांतर केले.
  • प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद यांनी केले.

राष्ट्रवादी इतिहासलेखनः

  • एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली.
  • आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले, त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
  • या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला.
  • भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
  • राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.

राष्ट्रवादी इतिहासकार :

राष्ट्रवादी इतिहासकार :

(१) विष्णुशास्त्री चिपळूणकर :

ग्रंथाचे नाव : राष्ट्रवादी लेखन

  • महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रेरणा दिली.
  • ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला.

(२) न्या. महादेव गोविंद रानडे :

ग्रंथाचे नाव : द राईज ऑफ द मराठा पॉवर

  • मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली.
  • मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांतील
  • जागृती प्रतिपादन केली.

(३) वि. का. राजवाडे :

ग्रंथाचे नाव : मराठ्यांच्या इतिहासाची साधने-२२ खंड

'भारत इतिहास संशोधक मंडळा 'ची स्थापना केली.

इतिहास-लेखनाविषयीची मते –

  • स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय.
  • इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवनदर्शन होय.
  • आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे.
  • अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे.

(४) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर :

ग्रंथाचे नाव : द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स – १८५७

सावरकरांनी केलेल्या क्रांतिकारक आणि समाजसेवी कार्याप्रमाणेच त्यांचे लेखनकार्यही राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते.

सावरकरांचे लेखन साहित्य :

  • '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' तसेच 'जोसेफ मॅझिनीचे चरित्र' हा अनुवादित ग्रंथ
  • 'सागरा प्राण तळमळला', 'स्वतंत्रते भगवती' यांसारख्या कविता
  • 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने' व 'शत्रूच्या शिबिरात' यांसारखे ग्रंथ
  • 'मोपल्यांचे बंड' व 'काळे पाणी' या कादंबऱ्या
  • 'उःशाप', 'संन्यस्त खड्ग', 'उत्तरक्रिया' ही नाटके
  • 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र
  • अनेक निबंध व लेखन
  • हिंदू धर्मावरील ग्रंथ तसेच इंग्रजी साहित्य.

सावरकरांच्या साहित्याने भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहासलेखनास चालना मिळाली.

(५) गोविंद सखाराम सरदेसाई :

ग्रंथाचे नाव : मराठी रियासत

  • मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रकाशित केला.
  • 'रियासतकार' या नावानेच ते ओळखले जाऊ लागले.

इतर काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे :

  • नावे राजेंद्रलाल मिश्र , रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी , भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णु मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर.

[collapse]

स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासलेखनः

मार्क्सवादी इतिहास :

  • उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा ऊहापोह मार्क्सवादी इतिहासलेखनात केलेला दिसून येतो.
  • सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते.
  • भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा , कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.
  • भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड डांगे यांनी 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' या ग्रंथात मार्क्सवादी इतिहासलेखनच केले आहे.
  • मार्क्सवादी इतिहासकारांनी भारतीय जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.

वंचितांचा (सबऑल्टर्न ) इतिहासः

  • समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात.
  • समाजातील हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या समाजवर्गाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनापासून झाली.
  • समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहासलेखनाची सुरुवात झाली पाहिजे, असे अँटिनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाने मत मांडले.
  • 'गुलामगिरी' या ग्रंथात महात्मा जोतीराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितला.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 'हू वेअर द शूद्राज' व 'द अनटचेबल्स' या ग्रंथांत दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यांवर प्रकाश टाकला आहे.
  • वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजीत गुहा यांनी केले.

स्त्रीवादी इतिहास :

स्त्रीवादी इतिहासलेखिकांसमोरील आव्हाने :

  • प्रारंभीच्या काळात पुरुष-इतिहासकार असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले, त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक होते.
  • स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन व संकलन करणे.
  • इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार करणे.

स्त्रीवादी इतिहासलेखिका :

स्त्रीवादी इतिहासलेखिका :

(१) ताराबाई शिंदे :

ग्रंथाचे नाव : स्त्री-पुरुष तुलना

  • हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
  • या पुस्तकात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले आहे.
  • ताराबाईंनी समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि जातिव्यवस्थेला विरोध करणारे लेखन केले.

 (२) पंडिता रमाबाई :

ग्रंथाचे नाव : द हाय कास्ट हिंदू वुमन

  • स्त्रियांच्या जीवनावरील ग्रंथ.

(३) मीरा कोसंबी :

ग्रंथाचे नाव : क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी

  • पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यांवरील निबंध.
  • स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादींसंबंधी लेखन.

(४) शर्मिला रेगे :

ग्रंथाचे नाव : रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर : रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज

  • महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर लेखन केले.
  • दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन या ग्रंथात केले आहे.

[collapse]

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-२-इतिहासलेखन : भारतीय परंपरा-नोट्स

PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-२-इतिहासलेखन : भारतीय परंपरा-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Next Chapter : पाठ- १ : इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - Online Notes

Next Chapter : पाठ- ३ : उपयोजित इतिहास - Online Notes

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *