खेळ आणि इतिहास
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-७- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :
|
खेळ : मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ.
- खेळ ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.
- शिकारी अवस्थेतील माणसाचा शिकार करणे हा उदरभरणाखेरीज खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता.
- प्राचीन महाकाव्यांतही द्यूत, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात.
खेळाचा इतिहास :
- खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे.
- खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले.
- धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती , मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले.
- प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये ऑलिम्पिया या नगरात दर चार वर्षानी खेळांच्या स्पर्धा भरत असत. आधुनिक ऑलिम्पिक खेळही दर चार वर्षांनीच होतात.
- ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीकांनी जगाला दिलेली देणगी आहे.
- एकमेकांत अडकवलेली पाच वर्तुळे हे आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून त्यातून सहकार्य, मैत्री, ईर्षा, विजिगीषू वृत्ती व शांतता यांचा संदेश जगाला मिळतो.
- ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे हे सन्मानाचे मानले जाते; कारण जगभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो.
खेळांच्या प्रशिक्षणासाठी भारतातील प्रसिद्ध संस्था :
- वडोदरा-पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव व्यायामशाळा
- पतियाळा-पतियाळा क्रीडा विद्यापीठ
- गांधीनगर-स्वर्णिम गुजरात स्पोर्टस् विद्यापीठ
- कोल्हापूर-खासबाग व मोतीबाग तालीम
- अमरावती-हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ
- पुणे-श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी
खेळांचे महत्त्व :
- खेळांमुळे मन प्रसन्न राहते जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात आणि तणावमुक्ति होते.
- माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने उल्हसित होते.
- खेळांमुळे शारीरिक व्यायाम होते, ज्यामुळे शरीर काटक व बळकट होते आणि आरोग्य सुधारते.
- खेळांमुळे मनोधैर्य वाढते. चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात.
- खेळांमध्ये सहभाग घेणे म्हणजे टीमवर्क शिकणे, सहकार्य आणि संप्रेषण कौशल्ये विकसित करणे. सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागतात.
- खेळांमध्ये नेतृत्वगुणांचे शिक्षण मिळते आणि स्फुर्ती निर्माण होते. नेतृत्वगुण विकसित होतात.
खेळांचे प्रकार :
खेळांचे बैठे आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत.
बैठे खेळ :
- बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. हे खेळ कोठेही बसून खेळता येतात.
- उदा., बुद्धिबळ, पत्ते , सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, सागरगोटे, भातुकली.
- बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते.
- कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच बैठ्या खेळांच्या स्पर्धा सोडल्यास अन्य बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत.
- बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो.
- या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही.
मैदानी खेळ :
- मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात.
- विदेशी मैदानी खेळांत बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो.
- देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो-खो इत्यादी खेळांचा समावेश होतो.
- मैदानी खेळांत शारीरिक कोशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते.
- मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो.
- बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात.
विविध मैदानी खेळ :
- धावणे : १०० मीटर, २०० मीटर, मॅरेथॉन, अडथळ्यांच्या शर्यती.
- शारीरिक कौशल्यांवर आधारित : गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी.
- पाण्यातील खेळ : वॉटर पोलो, पोहण्याच्या शर्यती, नौकानयन.
- शारीरिक कसरतींचे खेळ : मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स.
- साहसी खेळ : स्केटिंग, स्कीईंग, आईस हॉकी.
- रोमांचकारी खेळ : ग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, मोटारसायकल-मोटारकार यांच्या शर्यती.
खेळांच्या स्पर्धा :
- खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मि ळाली आहे.
- खेळांच्या स्पर्धा स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात.
- हॉकी, बुद्धिबळ, कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल यांच्या विश्व-चषक स्पर्धा भरवल्या जातात.
- हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे.
- ऑलिम्पिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, ब्रिटिश राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातात.
खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण :
- खेळ ही कोणत्याही राष्ट्राची आज मक्तेदारी राहिलेली नाही. याचाच अर्थ, आज खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झालेले आहे.
- जगातील कानाकोपऱ्यातील लोक आपल्या देशाचा संघ खेळत नसला, तरीही सामने पाहून आनंद घेतात.
- क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदी खेळांचे दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत असल्याने हे सामने जगभर पाहिले जातात.
- ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा आनंद जगभरातील लोक घेत असतात. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांच्या विश्वकप स्पर्धा भरतात. प्रेक्षकांनी खेळांचे अर्थकारणच बदलून टाकले आहे.
- खेळांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. हौशी खेळाडू शिकण्यासाठी, प्रेक्षक मनोरंजनासाठी, व्यापारी-कंपन्या जाहिरातींची संधी म्हणून, तर निवृत्त खेळाडू समालोचन करण्यासाठी खेळांकडे पाहतात.
खेळांचे साहित्य आणि खेळणी :
- लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी जी साधने व उपकरणे बनवली जातात, त्यांना 'खेळणी' असे म्हणतात.
- प्राचीन काळापासून प्रत्येक समाजात लहान मुलांच्या करमणुकीसाठी व शिक्षणासाठी खेळणी बनवली जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.
- मोहेंजोदडो, पाँपेई, ग्रीस इत्यादी ठिकाणी झालेल्या प्राचीन स्थळांच्या उत्खननात हाताने किंवा साच्यातून बनवलेली खेळणी, तसेच मातीची व दगडांची खेळणी सापडली आहेत.
- प्राचीन ग्रंथांतही बाहुल्यांचा उल्लेख सापडतो.
- शूद्रकाने लिहिलेल्या 'मृच्छकटिक' या नाटकाच्या नावाचा अर्थच 'मातीची गाडी' असा होतो. 'कथासरित्सागर' या ग्रंथात मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे.
- लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या-नाचणाऱ्या-आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे उल्लेख आहेत. महाराष्ट्रात या रंगीत लाकडी बाहुल्या 'ठकी' या नावाने ओळखल्या जातात.
- कालौघात खेळणी बनवण्याचे तंत्र सुधारत जाऊन सुबक खेळणी बनू लागली.
- धातुयुगातील माणूस खेळण्यांसाठी धातूंचा वापर करू लागला.
- आधुनिक काळात कातडे, कापड, मोरपिसे, मोती यांचा खेळण्यांच्या सजावटीसाठी वापर केला जातो. आधुनिक काळात बॅटरीवर आणि इलेक्ट्रॉनिकवर चालणारी खेळणीही तयार झालेली आहेत.
खेळणी आणि इतिहास :
- मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास-लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.
- खेळण्यांमधून वापराचा काळ, बनवण्याची पद्धती, तंत्रज्ञान, धार्मिक व सांस्कृतिक रितीरिवाज यांची माहिती होते.
- मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.
- उत्खननात पाँपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यातील प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.
- मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट :
खेळ व वाङ्मयीन साहित्य :
- खेळांशी संबंधित साहित्य (वाङ्मय) ही एक नवी ज्ञानशाखा आहे.
- खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व कोश उपलब्ध आहेत.
- मराठीत मल्लखांबाचा इतिहास प्रसिद्ध झाला आहे.
- 'षट्कार 'सारखी मराठी व इंग्रजीतही नियतकालिके निघतात.
- वृत्तपत्रांमधून क्रीडाविषयक वृत्ते व लेख प्रसिद्ध होत असतात.
खेळ व चित्रपट :
- सर्व प्रादेशिक भाषांतून व इंग्रजीतून खेळांविषयी चित्रपट तयार केले जातात. उदा., दंगल, चक दे इंडिया इत्यादी.
- ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा मेरी कोम, पहिल्या महिला कुस्तीगीर फोगट भगिनी, धावपटू मिल्खा सिंग, तेंडुलकर व धोनी हे क्रिकेटर यांच्या जीवनावर चित्रपट निघालेले आहेत.
क्रीडा चित्रपट व इतिहास :
- क्रीडा चित्रपट तयार करताना त्या खेळाची माहिती असावी.
- त्या कालखंडातील भाषा, पेहराव, पद्धती याचा अभ्यास हवा.
- कोशांतर्गत माहिती, पुस्तके व वृत्पत्रीय लेख, खेळांचा इतिहास या सर्वाचा सखोल अभ्यास हवा.
- खेळाविषयी जनतेचे असणारे समज, प्रथा, पूर्वपरंपरा, प्रसिद्ध खेळाडू अशा सर्व गोष्टींचा शोध घ्यावा लागतो.
- या गोष्टी माहीत करून घेतल्या नसतील तर तो चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरणार नाही. म्हणून क्रीडाविषयक चित्रपट तयार करताना काही गोष्टी माहीत असणे आवश्यक असते.
खेळ आणि व्यावसायिक संधी :
खेळांशी संबंधित व्यवसाय :
- खेळांविषयी आणि आंतरराष्ट्रीय खेळांविषयी माहिती लिहिणारे लेखक व समीक्षक.
- खेळांचे वर्णन करणारे समालोचक व खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक (कोच).
- दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून खेळांची वृत्ते देणारे बातमीदार, निवेदक व क्रीडातज्ज्ञ.
- पंच, मैदान तयार करणारे व त्यांचे साहाय्यक.
- संगणक तज्ज्ञ, समालोचकाला माहिती पुरवणारे साहाय्यक.
- खेळांचे साहित्य तयार करणारे उदयोजक व कुशल कामगार.
समालोचक व इतिहास :
- समालोचकासाठी केवळ प्रत्यक्ष सामन्यांचे वर्णन करणे पुरेसे नसते.
- खेळाची पूर्वपीठिका, आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, त्यांच्या आठवणी यांची माहिती त्याला असली पाहिजे.
- मैदानाची माहिती, त्याचा इतिहास त्याला माहीत असावा.
माहितीसाठी :
बाळ ज. पंडित :
|
शिक्षणक्षेत्र व खेळ :
- शालेय पातळीपासून खेळांना शिक्षणक्षेत्रात महत्त्व आहे.
- शालेय, आंतरशालेय ते राष्ट्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थी खेळंच्या विविध स्पर्धात भाग घेतात.
- खेळाडूंगाठी सरकार शिष्यवृत्तीही देते.
- खेळाईूंसाठी शासनात आणि खासगी आस्थापनांत राखीव जागा ठेवण्यात येतात.
माहितीसाठी :
(१) राणी लक्ष्मीबाई : झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रीडाप्रिय असल्याचा उल्लेख विष्णुभट गोडसे यांनी 'माझा प्रवास' या प्रवासवर्णनात केला आहे. (२) बालंभट देवधर : कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविदयागुरू बाळंभट देवधर यांनी केल्याचा दावा मनीषा बाठे यांनी केला आहे. हा व्यायाम त्यांना वानरांच्या क्रीडेवरून स्फुरला, असे त्या नमूद करतात. (२) खाशाबा जाधव व मारुती माने हे प्रसिद्ध कुस्तीगीर होते; तर सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमी क्रिकेट कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' म्हणून गौरवले. (३) मेजर ध्यानचंद : १९२८ व १९३२ मध्ये खेळाडू म्हणून, तर १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचे संघनायक म्हणून मेजर ध्यानचंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. तिन्ही ऑलिम्पिक स्पर्धांत भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० च्या वर गोल केले. 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस भारतात 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून पाळला जातो. त्यांना १९५६ मध्ये 'पद्मभूषण' सन्मानाने गौरवण्यात आले होते. |
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-७-खेळ आणि इतिहास-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-७-खेळ आणि इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- 6 : मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - Online Notes Next Chapter : पाठ- 8 : खेळ आणि इतिहास - Online Notes |