Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-३-राजकीय पक्ष-Maharashtra Board

राजकीय पक्ष

इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-3- महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये
  • भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप
  • राष्ट्रीय पक्ष
  • प्रादेशिक पक्ष

राजकीय पक्ष :

  • राजकीय पक्ष म्हणजे एखादी संघटना किंवा गट जो निवडणुकांमध्ये भाग घेऊन लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा आणि सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो आपली धोरणं आणि कार्यक्रम राबवू शकेल.
  • राजकीय पक्ष हे लोकशाहीत महत्त्वाचे घटक असतात, जे लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि हित लक्षात घेऊन शासन चालवण्याचा प्रयत्न करतात.
  • अन्य संस्था, गट यांच्याप्रमाणेच राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.

राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये :

  • सत्ता मिळवणे : निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे, हा राजकीय पक्षांचा मुख्य हेतू असतो.
  • विचारसरणीचा आधार : प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी एक विचारसरणी असते. या विचारसरणीला जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करीत असतात. त्यालाच 'पक्षाचा जनाधार' असे म्हणतात.
  • पक्ष कार्यक्रम : राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाल्यावर ते कार्यक्रम राबवले जातात, आणि सत्ता न मिळाल्यासही या कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
  • सरकार स्थापन करणे : बहुमत मिळवणारा पक्ष 'सत्ताधारी पक्ष' असतो; तर बहुमत न मिळालेले पक्ष 'विरोधी पक्ष' म्हणून काम करतात.
  • शासन जनता यांच्यातील दुवा : राजकीय पक्ष शासन व जनता यांतील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत नेणे व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे काम राजकीय पक्ष करीत असतात.

पक्षविरहित लोकशाही :

  • ज्या लोकशाही राज्यात राजकीय पक्ष नसतात, ती व्यवस्था पक्षविरहित लोकशाही म्हणून ओळखली जाते.
  • महात्मा गांधी, विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली होती.
  • त्यांच्यामते राजकीय पक्ष सत्तेसाठी झगडतात, भ्रष्टाचार करतात आणि त्यामुळे लोकशाहीचा खरा अर्थ हरवतो. पक्षांऐवजी लोकसमित्या स्थापन व्हाव्यात, असे त्यांचे मत होते.
  • प्लेटो आणि अमेरिकन घटनाकारांनीही पक्षपद्धतीला त्रासदायक मानले आहे.
  • पक्षविरहित लोकशाहीत लोकमताला अधिक वाव मिळतो आणि लोकहित साधले जाते, पण यासाठी समाज साक्षर, जागृत व चारित्र्यवान असावा लागतो.
  • ही व्यवस्था आदर्शवादी असून प्रत्यक्षात आणणे कठीण आहे.

पक्षपद्धती :

एकपक्षीय पद्धती :

  • ज्या देशात दीर्घकाळ एकाच पक्षाच्या हाती सत्ता असते आणि अन्य पक्षांचे अस्तित्व नसते किंवा त्यांचा प्रभाव नसतो; त्या पद्धतीला 'एकपक्षीय पद्धती' असे म्हणतात. चीनमध्ये ही पद्धती अस्तित्वात आहे.

द्विपक्ष पद्धती :

  • काही देशांत दोन पक्ष प्रभावी असतात व ते आलटून-पालटून स्वतंत्रपणे सत्तेवर येतात, तेव्हा त्या पद्धतीला 'द्विपक्ष पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती अमेरिका, इंग्लंड येथे आहे.

बहुपक्षपद्धती :

  • जेथे अनेक पक्ष अस्तित्वात असून ते एकमेकांशी सत्तास्पर्धा करतात, सर्वांचा कमी-अधिक राजकीय प्रभाव असतो; अशा पद्धतीला 'बहुपक्षीय पद्धती' असे म्हणतात. ही पद्धती भारतात आहे.
  • बहुपक्षीय पद्धतीमध्येच लोकशाही विकसित होते.

भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप :

  • स्वातंत्र्योत्तर काळात बरीच वर्षे केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच पक्ष प्रबळ होता. म्हणजेच तेव्हा 'एक प्रबळ पक्षपद्धती' होती.
  • १९७७ मध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन एक प्रबळ पक्षपद्धतीला आव्हान देऊन त्याचा प्रभाव संपवला.
  • १९८९ नंतर लोकसभेत एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे स्थापन झाली.
  • सुरुवातीस अस्थिर असणारी आघाडी सरकारे १९९९ नंतर स्थिरावली.
  • प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.

पक्षांचे दोन प्रकार :

  • राष्ट्रीय पक्ष - राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे पक्ष.
  • प्रादेशिक पक्ष - राज्यपातळीवर प्रभावी असणारे पक्ष.

निवडणूक आयोग संविधानात दिलेल्या निकषांनुसार राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देतो. तसेच, या पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्याची जबाबदारी पार पाडतो.

राष्ट्रीय पक्ष :

राष्ट्रीय पक्ष : मान्यतेचे निकष :

  • चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत ६% मते मिळवणारा पक्ष तसेच मागील निवडणुकीत पक्षाचे किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत.
  • किंवा एकूण लोकसभा मतदार संघांच्या किमान २ टक्के मतदारासंघांतून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते.

भारतातील राष्ट्रीय पक्ष :

(सदर्भ : Election Commission of India, Notification No. 56 / 201 / PPS-111, dated 13 December 2016)

(i) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इ. स. १८८५):

  • १८८५ साली स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सर्वसमावेशक संस्था होती.
  • त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते.
  • स्वातंत्र्यानंतर काँग्रेस प्रमुख राजकीय पक्ष बनला.
  • धर्मनिरपेक्षता, समाजकल्याण, दुर्बल व अल्पसंख्याक घटकांसाठी समान हक्क यावर काँग्रेसने भर दिला.
  • लोकशाही समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समतेवर काँग्रेसचा विश्वास आहे.

(ii) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (इ. स. १९२५):

  • मार्क्सवादी विचारांवर आधारलेला पक्ष.
  • या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे.
  • मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी कार्य करतो.
  • चीन व सोव्हिएत युनियन यांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून १९६४ साली पक्षात फूट पडली.

(iii) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (इ. स. १९६४):

  • भारतीय कम्युनिस्ट पक्षातून फुटून स्थापना.
  • समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही यांचा पुरस्कार.
  • कामगार, शेतमजूर, शेतकरी यांच्या हिताची जपणूक करणे.
  • साम्राज्यवादास विरोध.

(iv) भारतीय जनता पक्ष (इ. स. १९८०):

  • १९५१ साली स्थापन झालेला जनसंघ १९७७ साली जनता पक्षात विलीन.
  • १९८० मध्ये जनता पक्ष फुटून जनसंघाने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
  • प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन करण्याचे धोरण.
  • आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर.

(v) बहुजन समाज पक्ष (इ. स. १९८४):

  • समाजवादी विचारसरणीचा स्वीकार.
  • दलित, आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्याक या बहुजनांच्या हिताची जपणूक करणे.
  • बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे.

(vi) ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (इ. स. १९९८):

  • २०१६ मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता.
  • लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर विश्वास.
  • दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, हे धोरण.

(vii) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इ. स. १९९९):

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून स्थापना.
  • लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर विश्वास.
  • महाराष्ट्रात व केंद्रात यूपीए आघाडी सरकारमध्ये समाविष्ट होता.

प्रादेशिकता :

  • धर्म, परंपरा, भाषा, संस्कृती आणि भूप्रदेश यांबाबतीत भारतात विविधता आहे.
  • या सर्वांबाबत आपल्याला आत्मीयता असते.
  • आत्मीयतेतूनच पुढे अस्मिता जागृत होते.
  • अस्मिता मोठे रूप धारण करू लागली की प्रादेशिकता निर्माण होते.

प्रादेशिक पक्ष :

  • आपल्या प्रदेशाच्या वेगळेपणाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या आणि त्याचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना 'प्रादेशिक पक्ष' असे म्हणतात.
  • आपली भाषा व प्रदेश यांचा विकास व्हावा, त्या प्रदेशातील साधनसामग्री आणि रोजगाराच्या संधी यांवर आपलाच हक्क असावा. या भावनेतून पक्षांची निर्मिती होते.
  • प्रादेशिक अस्मितेतून गट, संघटना निर्माण होतात
  • प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आपल्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो.
  • प्रदेशातील आपल्या प्रभावातून हे पक्ष राष्ट्रीय राजकारणावर छाप टाकतात.

प्रादेशिक पक्ष : मान्यतेचे निकष :

  • लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६ टक्के मते आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते;
  • किंवा विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान ३ टक्के जागा किंवा किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक.

प्रादेशिक पक्षांची भूमिका :

  • प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात.
  • आपल्या प्रदेशाचा विकास या मुख्य उद्दिष्टातून कधी स्वतंत्र राज्याची, तर कधी स्वायत्ततेची मागणी करतात.
  • प्रादेशिक अस्मितेला महत्त्व देऊन संघशासनाला सहकार्य करतात.

प्रादेशिक पक्षांच्या मागण्या :

  • प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात.
  • प्रदेशातील सत्ता प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी.
  • प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये प्रदेशातील लोकांनाच अग्रक्रमाने संधी द्यावी.

प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप :

  • स्वातंत्र्योत्तर काळात तमिळनाडू, पंजाब, जम्मू आणि काश्मीर अशा राज्यांत प्रादेशिक पक्षांनी संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
  • नंतरच्या काळात स्वातंत्र्याच्या मागणीऐवजी हे पक्ष अधिक स्वायत्ततेची मागणी करू लागले.
  • १९९० नंतर शिवसेना, तेलुगु देसमसारखे प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात तसेच केंद्रात सत्तेची मागणी करू लागले.
  • ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष फुटीरतेच्या मागणीऐवजी स्वायत्ततेची मागणी करू लागले.
  • भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याच्या टप्प्यांतून झाला आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढला असून, आघाडी शासन ही त्याची प्रमुख परिणती आहे.

काही प्रमुख प्रादेशिक पक्ष / पक्षाची धोरणे / माहिती:

(i) शिवसेना :

  • महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष. १९६६ मध्ये स्थापना.
  • मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन, परप्रांतीयांना विरोध.
  • १९९५ मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्व प्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. २०१४ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी.
  • २०१९ मधील निवडणूकीनंतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सोबत महाविकास आघाडी करुन सत्‍तेत.

(ii) शिरोमणी अकाली दल :

  • पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष. १९२० मध्ये स्थापना.
  • धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य.
  • पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर.

(iii) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स :

  • काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष. १९३२ साली स्थापना.
  • काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा. स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील.

(iv) आसाम गण परिषद :

  • सरकारबरोबरील वाटाघाटीतून १९८५ मध्ये आसाम करार. १९८५ साली स्थापना.
  • निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे. आर्थिक विकासासाठी प्रयत्न.
  • गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष.

(v) द्रविड मुन्नेत्र कळघम :

  • १९२० मधल्या जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले.
  • १९४४ मध्ये जस्टीस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली.
  • १९४९ मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला.
  • त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची १९७२ मध्ये स्थापना केली.
  • तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न. केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग.
  • सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिबा. सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना राबवल्या.

भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. उदाहरण  :

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष
 शिवसेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

शेतकरी कामगार पक्ष

भारिप बहुजन महासंघ

भारतीय रिपब्लिकन पक्ष

बहुजन विकास आघाडी

राष्ट्रीय समाज पक्ष

ऑल इंडिया मजलीस-ई-इतेहदुल्ला मुसलमीन

स्वाभिमानी पक्ष

जनसुराज्य शक्ती

लोकसंग्राम

समाजवादी पक्ष

 

 

 

PDF

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-३-राजकीय पक्ष-नोट्स

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-३-राजकीय पक्ष-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71

Useful links :


Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ- २ : निवडणूक प्रक्रिया - Online Notes

Next Chapter : पाठ- ४ : सामाजिक व राजकीय चळवळी - Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *