Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-५-भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने-Maharashtra Board

भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने

इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-५- महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  • भारतीय लोकशाही यशस्वी करण्याचे मार्ग

लोकशाही :

  • लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
  • लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
  • भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोरील आव्हाने :

  • लष्करी राजवरटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे.
  • लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे.
  • केवळ राजकीय लोकशाही नव्हे; तर खन्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे.
  • लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे.

लोकशाही रुजवण्याचे मार्ग :

  • समाजातील सर्व घटकांचे सामीलीकरण करणे.
  • सामाजिक संस्थांना स्वायत्तता देणे, म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण करणे.
  • नागरिकांचे सक्षमीकरण करणे.
  • स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवतावाद इत्यादी मानवी मूल्यांचे जतन करून ती सामान्य जनतेपर्यंत नेणे.
माहितीसाठी :

लोकशाही व्यवस्था :

  • लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या मार्गाने संसद आणि विधिमंडळे या लोकशाही संस्था अस्तित्वात येतात. या संस्थांमार्फत 'सरकार' ही संस्था निर्माण होते.
  • स्थानिक कारभार करण्यासाठी स्थानिक शासनसंस्था निवडणुकीच्या माध्यमातून अस्तित्वात येतात.
  • लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना संविधानाद्वारे स्वातंत्र्य, न्याय, समता इत्यादींबाबत अधिकार मिळतात.
  • या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायसंस्था असतात.
  • बिगर लोकशाही व्यवस्थेत या संस्था नसतात व असल्या तरी त्यांना अधिकार नसतात.

 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने :

(i) जमातवाद दहशतवाद :

  • जमातवाद आणि दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहेत..
  • धार्मिक श्रेष्ठत्वाची भावना व अन्य धर्मीयांविषयी द्वेषभावना निर्माण होण्याने जमातवाद निर्माण होतो. वाढता जमातवाद दहशतवादाला जन्म देतो.
  • वाढत्या जमातवादाने देशात धार्मिक संघर्ष सुरू होतात.
  • वाढत्या संघर्षामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक ऐक्य नष्ट होते.
  • समाजात दुही निर्माण होऊन दहशतवादी घटना घडून येतात. परिणामी सामाजिक स्थैर्य व स्वास्थ्य नष्ट होऊन लोकशाही धोक्यात येते.
  • लोकांचा लोकशाहीतील सहभाग कमी होतो. जमातवादाने देशाचे अतोनात नुकसान होते.

डावे उग्रवादी (नक्षलवादी) :

  • भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करून त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली.
  • या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते.
  • सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.
  • शेतकरी-आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.

भ्रष्टाचार :

  • कायद्याचा भंग करून, वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारांचा गैरवापर करणे. याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात.
  • भ्रष्टाचार आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो.
  • अधिकारांचा गैरवापर, निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार आहेत.
  • भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण :

  • राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते.
  • पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात.
  • निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात.
  • असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले, की लोकशाही कमकुवत होते.

सामाजिक आव्हाने :

भारतीय लोकशाहीसमोर

  • वाढती बेरोजगारी
  • व्यसनाधीनता
  • साधनसंपत्तीचे असमान वाटप
  • गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढती दरी
  • जातिव्यवस्था
  • स्त्री-पुरुष असमानता.
  • भाषावाद व प्रांतीयता इत्यादी

ही महत्त्वाची सामाजिक आव्हाने आहेत. ही आव्हाने दूर केल्यास लोकशाही अधिक सक्षम होईल.

भारतीय लोकशाही यशस्वी करण्याचे मार्ग :

  • सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे.
  • गुन्हेगारांना कडक शासन देण्यासाठी न्यायालये स्वतंत्र ठेवणे.
  • शासनाबरोबरच सामाजिक व वैयक्तिक पातळीवर लोकशाहीचा अवलंब करणे.
  • शासनव्यवहारांच्या सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढवणे.
  • समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, न्याय इत्यादी मूल्यांची वैयक्तिक जीवनातही जोपासना करणे.

लोकशाहीला पूरक ठरणारे शासनाचे उपक्रम :

  • सर्व शिक्षा अभियान.
  • स्वच्छ भारत अभियान.
  • ग्राम समृद्धी योजना.
  • स्व-मदत गटांची स्थापना.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना.
  • स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांना दिलेले ५० टक्के आरक्षण.

PDF

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-५-भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने-नोट्स

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-५-भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *