Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२-स्थान-विस्तार-Maharashtra Board

स्थान-विस्तार

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२- महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

() ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

उत्तर :

बरोबर

() भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.

उत्तर :

चूक : (भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते)

() ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.

उत्तर :

चूक

() ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.

उत्तर :

बरोबर

() ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

उत्तर :

चूक : (दक्षिण अटलांटिक, उत्तर अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.)

() भारताच्या अग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

उत्तर :

चूक

() भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.

उत्तर :

बरोबर

प्रश्न . थोडक्यात उत्तरे लिहा.

() स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

उत्तर :

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना आर्थिक विकास, सामाजिक असमानता, राजकीय स्थिरता, पर्यावरणीय समस्या, शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय या क्षेत्रातील मोठ्या समस्या भेडसावत होत्या.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले :

  • स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
  • स्वातंत्र्योत्तर काळात दोन्ही देशांना आर्थिक विकासाचा मोठा प्रश्न होता. भारतात विभाजनामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या, तर ब्राझीलमध्ये आर्थिक अस्थिरता आणि औद्योगिकीकरणाची आवश्यकता होती
  • स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
  • नव्याने स्वतंत्र झालेल्या दोन्ही देशांना राजकीय स्थैर्य राखण्याचे आव्हान होते. भारतात संस्थानांचे विलीनीकरण, आणि संविधान निर्मिती यांसारखे प्रश्न होते, तर ब्राझीलमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्वाचा अभाव जाणवत होता

() भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थाना संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?

उत्तर :

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :

  • भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धांत आहे.
  • ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धांत आहे,
  • भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.
  • ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

() भारत ब्राझील यांचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार सांगा.

उत्तर :

भारत :

  • अक्षवृत्तीय विस्तार : मुख्य भूमी : ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहामधील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' हे भारताचे अतिदक्षिण टोक.
  • रेखावृत्तीय विस्तार : ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त.

ब्राझील :

  • अक्षवृत्तीय विस्तार : ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५' दक्षिण अक्षवृत्त.
  • रेखावृत्तीय विस्तार : ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त.

प्रश्न३. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

() भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने ओळखले जाते.

(i) लक्षद्वीप

(ii) कन्या कुमारी

(iii) इंदिरा पॉईंट

(iv) पोर्ट ब्लेअर

उत्तर :

भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते.

() दक्षिण अमेरिका खंडातील ………. हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

(i) चिली-इक्वेडोर

(ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया

(iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना

(iv) सुरीनाम-उरुग्वे

उत्तर :

दक्षिण अमेरिका खंडातील चिली-इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

() दोन्ही देशांतील राजवट ............ प्रकारची आहे.

(i) लष्करी

(ii) साम्यवादी

(iii) प्रजासत्ताक

(iv) अध्यक्षीय

उत्तर :

दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे.

() खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो?

उत्तर :

(i)

() खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो?

उत्तर :

(iii)

() गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?

उत्तर :

(iii)

() गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?

उत्तर :

(ii)

PDF

Notes, Solution Books
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२-स्थान-विस्तार-नोट्स

PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-२-स्थान-विस्तार-स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Useful links :


Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल-  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ- १ : क्षेत्रभेट - Online Solutions

Next Chapter : पाठ- ३ : प्राकृतिक रचना व जलप्रणाली - Online Notes

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *