Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-१-इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा-Maharashtra Board

इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-१ महाराष्ट्र बोर्ड

Solutions

प्रश्न १. () दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ........... यास म्हणता येईल.

() व्हॉल्टेअर

() रेने देकार्त

() लिओपॉल्ड रांके

() कार्ल मार्क्स

उत्तर :

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

() आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ .......... याने लिहिला.

() कार्ल मार्क्स

() मायकेल फुको

() लुसिआँ फेबर

() व्हॉल्टेअर

उत्तर :

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.

() पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

() जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी

() लिओपॉल्ड व्हॉन रांके - थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी

() हिरोडोटस - हिस्टरिज्

() कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन मेथड

उत्तर :

चुकीची जोडी : कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड

प्रश्न २. टीपा लिहा.

() द्वंद्ववाद

उत्तर :

द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्‌) :

  • एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.
  • दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच 'द्वंदुववाद' असे म्हणतात.

() ॲनल्स प्रणाली

उत्तर :

  • विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये 'अॅनल्स' ही इतिहासलेखनाची नवी प्रणाली उदयाला आली.
  • इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो, असा विचार पुढे आला.
  • तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच 'अॅनल्स प्रणाली' असे म्हणतात.
  • 'अॅनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी विसाव्या शतकात प्रथम विकसित केली.
  • अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली.

प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

उत्तर :

  • इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
  • त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
  • इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
  • सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
  • १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला.

() फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

उत्तर :

  • मायकेल फुको हा विसाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता.
  • त्याने पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.
  • मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
  • त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
  • फुको यानी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हटले आहे.

प्रश्न ४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

उत्तर :

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या 'दास कॅपिटल' या ग्रंथात 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला. त्याच्या मते -

  • इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
  • मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
  • समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते.
  • उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो; त्यातूनच वर्गसंघर्षाला सुरुवात होते.

मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

() आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

आधुनिक इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये :

  • या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
  • हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध देवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.
  • या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते.
  • मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासलेखनात घेतला जातो.

() स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर :

  • स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहासलेखनाची भूमिका आहे.
  • इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
  • त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
  • इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
  • सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
  • १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला.

() लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.

उत्तर :

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी 'द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी' व 'द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी' या ग्रंथातून इतिहासलेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते-

  • इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.
  • इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.
  • जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.
  • एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता.

PDF

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-१-इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा-नोट्स

इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-१-इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-१-इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा- पाठ्य पुस्तक

Useful links :


Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Next Chapter : पाठ- २ : इतिहासलेखन : भारतीय परंपरा - Online Notes

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *