Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-३-उपयोजित इतिहास-Maharashtra Board

उपयोजित इतिहास

इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-३ महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. () दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ........... या शहराचे उत्खनन करताना सापडले.

() दिल्ली    () हडप्पा     () उर         () कोलकाता

उत्तर :

जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले.

() भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे.

() नवी दिल्ली       () कोलकाता          () मुंबई      () चेन्नई

उत्तर :

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.

() पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

() कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा

() रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य

() रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण

() कालबेलिया - राजस्थान चे लोकसंगीत आणि लोकनृत्य

उत्तर :

(२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य

प्रश्न २. टीपा लिहा.

() उपयोजित इतिहास

उत्तर :

  • ‘उपयोजित इतिहास’ या संज्ञेसाठी ‘जनांसाठी इतिहास’ (पब्लिक हिस्टरी) असा पर्यायी शब्दप्रयोग आहे.
  • एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय.
  • इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात.
  • भूतकाळातील घटनांसंबंधीच्या ज्ञानाचा वर्तमानात आणि भविष्यकाळात समाजाला कसा उपयोग होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
  • उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्व सामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो.
  • आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते.
  • उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.

() अभिलेखागार

उत्तर :

  • ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.
  • अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.
  • अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.
  • भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
  • प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही असते.

प्रश्न ३. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

मूर्त वारसा अमूर्त वारसा
(१) प्राचीन स्थळे

(२) प्राचीन वास्तू

(३) प्राचीन वस्तू

(४) हस्तलिखिते

(५) प्राचीन शिल्पे

(६) प्राचीन चित्रे

(१) मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा

(२) पारंपरिक ज्ञान

(३) सणसमारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी

(४) कला सादरीकरणाच्या पद्धती

(५) पारंपरिक कौशल्ये

(६) परंपरा, पद्धती, कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट

 

प्रश्न ४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

उत्तर :

  • लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
  • दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले.
  • कृषी, औद्योगिक उत्पादन, स्थापत्य इत्यादी क्षेत्रांत होत गेलेल्या बदलांचा, त्यामागील तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
  • दगडी हत्यारे तयार करण्याच्या अवस्थेपासून विज्ञानयुगापर्यंत प्रगत झालेले तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या इतिहासाचाच अभ्यास करावा लागतो.

() जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्को द्वारे जाहीर केली जाते.

उत्तर :

  • पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
  • हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.
  • काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये.
  • यासाठी त्याचे जतन कसे करावे, याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी 'युनेस्को' या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

प्रश्न ५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

() विज्ञान

() कला

() व्यवस्थापनशास्त्र

उत्तर :

प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय-

() विज्ञान :

  • मानवी गरजांची पूर्तता आणि जिजासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात.
  • त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो.
  • या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो.
  • विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.

() कला :

  • कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो.
  • या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो.
  • संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

() व्यवस्थापनशास्त्र :

  • उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यासंबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या, हे समजावून घेणे आवश्यक असते.
  • तसेच या यंत्रणा सांभाळणाऱ्या संघटना या सर्वांचा अभ्यास करताना, त्यांच्या भूतकालीन व्यवस्थापनांचा अभ्यास करावा लागतो.
  • त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते.

() उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?

उत्तर :

इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो-

  • भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.
  • आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या
  • आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.
  • उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
  • उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.

() इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.

उत्तर :

इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात :

  • नियमित देखभाल: किल्ले, स्मारके, राजवाडे यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी करावी.
  • संरक्षण कायदे: ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
  • सजगता वाढवणे: समाजात इतिहासाच्या साधनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.
  • तज्ज्ञांचा सल्ला: जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
  • भौतिक साधनांचे संरक्षण: ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात आणि चोरीपासून संरक्षण करावे.
  • मौखिक साहित्याचे संकलन: ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
  • प्राचीन ग्रंथांचे संरक्षण: वाळवी व बुरशीपासून प्राचीन ग्रंथांचे संरक्षण करावे.
  • कीटकनाशकांचा वापर: ऐतिहासिक साधनांच्या संरक्षणासाठी कीटकनाशक औषधांचा वापर करावा.
  • सामान्य जनतेचा सहभाग: साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करावे.
  • प्रबोधन: प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण करावी.

हे उपाय इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

() नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्र कल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?

उत्तर :

नैसर्गिक आणि सास्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात-

  • प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
  • स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो.
  • सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत; यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.
  • स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उदयोग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

इयत्ता-१० वी-इतिहास-३-उपयोजित इतिहास-नोट्स

इयत्ता-१० वी-इतिहास-३-उपयोजित इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *