Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-७-खेळ आणि इतिहास-Maharashtra Board

खेळ आणि इतिहास

इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-७- महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. () दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ........... येथे सुरू झाली.

() ग्रीस

() रोम

() भारत

 () चीन

उत्तर :

ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली.

() महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला .......... म्हणत.

() ठकी

() कालि चंडिका

() गंगावती

() चंपावती

उत्तर :

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत.

() पुढीलपैकी चुकीची जोडी ळखून लिहा.

() मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ

() वॉटर पोलो - पाण्यातील खेळ

() स्केटींग - साहसी खेळ

() बुद्धिबळ - मैदानी खेळ

उत्तर :

बुद्धिबळ - मैदानी खेळ

प्रश्न २. टीपा लिहा.

() खेळणी आणि उत्सव

उत्तर :

उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे. खेळणी आणि उत्सव यांचा एक नात्याचा धागा आहे जो आनंद आणि उत्साहाचा संगम दर्शवतो.

  • विविध संस्कृतींत आणि धर्मांत उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. सँतॉक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो.
  • दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात.
  • होळीमध्ये रंग खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिचकारी आणि रंगांचे खेळणे मुलांना आनंद देतात.
  • गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात.
  • बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात.

उत्सवांच्या वेळी मुलांना खेळण्यांच्या माध्यमातून सर्जनशीलता आणि आनंद मिळतो. खेळणी केवळ मनोरंजनच नाही तर शिक्षणाचेही साधन आहेत. खेळणी मुलांच्या नवनिर्मितीक्षमतेला प्रोत्साहन देतात आणि विविध सांस्कृतिक परंपरांचा वारसा पुढे नेण्यास मदत करतात.

() खेळ चित्रपट

उत्तर :

  • खेळ आणि चित्रपट हे दोन्ही मनोरंजनाच्या आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या क्षेत्रांत आघाडीवर आहेत. दोन्हींचा संबंध काही महत्वपूर्ण पैलूंमध्ये पाहता येतो:
  • खेळांवरील आधारित चित्रपट प्रेक्षकांना खेळांची माहिती आणि त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देतात.
  • खेळांवरील चित्रपट प्रेक्षकांना प्रेरित करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दल आदर वाढवतात. यामुळे नवीन खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण होतो आणि खेळातील प्रगतीला चालना मिळते.
  • पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक-नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात असत.
  • अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. 'लगान', 'दंगल' असे क्रिकेट, कुस्ती अशा खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.
  • मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत.
  • प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे.

प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

उत्तर :

  • खेळ ही कोणत्याही राष्ट्राची आज मक्तेदारी राहिलेली नाही. याचाच अर्थ, आज खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झालेले आहे.
  • सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी; तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात.
  • खेळांच्या स्पर्धांचे दूरदर्शन आणि ऑनलाइन प्रसारण हक्क विकले जातात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून खेळांचे थेट प्रसारण होते.
  • निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी विविध वाहिन्यांवर बोलावले जाते.
  • सामने पाहण्यासाठी मोठया प्रमाणात प्रेक्षकवर्ग येतो. त्यामुळे कंपन्या मोठया प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळांच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे.

() खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

उत्तर :

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. खेळण्यांद्वारे आपण विविध संस्कृतींच्या आणि इतिहासाच्या अंतरंगात डोकावू शकतो. त्यामुळे खेळणी ही इतिहास-लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.

  • खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.
  • मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. योद्ध्यांची जीवनशैली, शस्त्रास्त्रांची रचना आणि त्यावेळच्या युद्धकलेचा अंदाज येतो.
  • उत्खननात पॉंपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यातील प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.
  • मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते.
  • सिन्धू संस्कृतीतील उत्खननात लहान मातीच्या खेळण्यांचे अवशेष मिळाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीची आणि बालकांच्या खेळाची झलक मिळते.

म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

प्रश्न ४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.

उत्तर :

खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते.

  • खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत.
  • व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे.
  • खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगतासाठीच राखून ठेवलेली असतात.
  • 'षट्कार' नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात.
  • इंग्रजी भाषेत तर क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते.
  • अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते.

ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे.

() खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

उत्तर :

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत.

  • खेळांमधून विविध संस्कृती आणि परंपरांची झलक मिळते. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीक ओलिंपिक स्पर्धा ही त्यांच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग होती. त्यातून ग्रीकांची धार्मिकता, शौर्य आणि शारीरिक तंदरुस्ती यांची माहिती मिळते
  • खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो.
  • खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते.
  • ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचाच आधार घ्यावाच लागतो.
  • विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.
  • खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.
  • खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात, खेळांशी संबंधित सर्व घटकांना खेळांचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.
  • खेळ आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधामुळे आपण विविध काळांतील समाज, संस्कृती आणि राजकारणाचे प्रतिबिंब पाहू शकतो. यामुळेच खेळ हा केवळ मनोरंजनच नव्हे तर शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतो.

() मैदानी खेळ बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

मैदानी खेळ बैठे खेळ
मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. हे खेळ कोठेही बसून खेळता येतात.
मैदानी खेळांत शारीरिक कोशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते.
मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो.
या खेळांमध्ये थकवा लवकर येतो. या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही.
उदा., बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो, लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो-खो उदा., बुद्धिबळ, पत्ते , सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, सागरगोटे, भातुकली.
बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच बैठ्या खेळांच्या स्पर्धा सोडल्यास अन्य बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-७-खेळ आणि इतिहास-नोट्स

PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-७-खेळ आणि इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Next Chapter : पाठ- 6 : मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - Online Solutions

Next Chapter : पाठ- 8 : खेळ आणि इतिहास - Online Solutions

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *