संविधानाची वाटचाल
इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-१ महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थां मध्ये महिलांसाठी ........... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या
आहेत.
(अ) २५% (ब) ३०% (क) ४०% (ड) ५०%
महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थां मध्ये महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
(२) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ?
(अ) माहितीचा अधिकार कायदा
(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा
(ड) यांपैकी कोणतेही नाही.
हुंडाप्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे
(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे ........
(अ) प्रौढ मताधिकार
(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
(क) राखीव जागांचे धोरण
(ड) न्यायालयीन निर्णय
लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण
प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
हे विधान बरोबर आहे; कारण-
- भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.
- भारतीय संविधानाने प्रौढ मताधिकार स्वीकारला, त्यामुळे सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला.
- मतदारांची वयोमर्यादा २१ वरून १८ वर्षे करण्यात आल्याने मतदारसंख्या वाढली.
- जगातील कोणत्याही लोकशाही देशात इतक्या मोठ्या संख्येने मतदार नाहीत,
त्यामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते
(२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
हे विधान चूक आहे; कारण-
- लोकशाही सुदृढ करण्यासाठी नागरिकांना शासनाच्या कार्याची माहिती असणे आवश्यक आहे.
- पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे चांगल्या शासनाचे गुण माहितीच्या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.
- या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार अधिक खुले झाले असून, कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.
(३) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
हे विधान बरोबर आहे; कारण-
- भारतीय संविधान लिखित असले तरी ते स्थिर नसून प्रवाही आहे.
- बदलत्या परिस्थितीनुसार संसदेला त्यात बदल करण्याचा अधिकार आहे, मात्र मूलभूत चौकटीला धक्का न लावता हे बदल केले जातात.
- या लवचिकतेमुळे संविधान एक जिवंत दस्तऐवज म्हणून कार्य करते आणि जनतेच्या गरजांनुसार विकसित होत राहते.
प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) हक्काधारित दृष्टिकोन
- स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासनपद्धती स्वीकारली आणि ती अधिक प्रगल्भ करण्यासाठी विविध सुधारणा केल्या.
- प्रारंभी नागरिकांना ‘लाभार्थी’ म्हणून पाहिले गेले, परंतु इ.स. २००० नंतर त्यांना हक्क देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला गेला.
- त्यामुळे माहिती, शिक्षण आणि अन्नसुरक्षा यांसाठी केवळ कायदे नाहीत, तर ते नागरिकांचे मूलभूत हक्क म्हणून मान्य करण्यात आले.
- या बदललेल्या दृष्टिकोनाला ‘हक्काधारित दृष्टिकोन’ म्हणतात.
(२) माहितीचा अधिकार
- शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने २००५ साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला.
- या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत.
- शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, यांची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.
- माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे सक्षमीकरण झाले असून, प्रशासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.
(३) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
- संविधानकारांनी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले.
- त्यामुळे १९५२ च्या पहिल्या लोकसभेत २२ महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन २०१९ च्या निवडणुकीत ती ७६वर जाऊन पोहोचली आहे.
- लोकसभेच्या एकूण जागांच्या ५०% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात, असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे.
- स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णयप्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?
भारतात प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषाला २१ वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय २१ वरून १८ वर्षे इथपर्यंत आणले.
- ही मर्यादा १८ वर्षे करण्यात आल्याने युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.
- आपले प्रतिनिधी कसे असावेत, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.
- यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.
- या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली.
- युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.
- भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले आहे. लोकांच्या इच्छा -आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात.
(२) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे-
- ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.
- व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.
- जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
- सर्वांना विकासाची समान संधी देणे.
(३) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?
- न्यायालयाच्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे.
- घटस्फोटित महिलांसाठी पोटगी, समान वेतनाचा हक्क, वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचा समभाग, आणि प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना प्रवेश यांसारख्या निर्णयांमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता मिळाली.
- खाप पंचायतींचे अधिकार रद्द केल्याने स्त्रियांवरील अन्याय कमी झाला. या निर्णयांमुळे संसदेला महिलांच्या हक्कांसाठी अधिक सक्षम कायदे करावे लागले.
Click on below link to Download PDF from store
इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-१-संविधानाची वाटचाल-नोट्स
इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-१-संविधानाची वाटचाल-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- २ : निवडणूक प्रक्रिया - Online Solutions |