Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-२-निवडणूक प्रक्रिया-Maharashtra Board

निवडणूक प्रक्रिया

इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-२- महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात.

() राष्ट्रपती             () प्रधानमंत्री            () लोकसभा अध्यक्ष          () उपराष्ट्रपती

उत्तर :

निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

() स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ........... यांची नेमणूक झाली.

() डॉ. राजेंद्रप्रसाद () टी.एन.शेषन        () सुकुमार सेन       () नीला सत्यनारायण

उत्तर :

स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली.

() मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ....... समिती करते.

() निवड      () परिसीमन            () मतदान               () वेळापत्रक

उत्तर :

मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.

प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

() निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण :

निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात पार पडतात. यामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसतो आणि सामान्य मतदार धाकदपटशा व दहशतीपासून मुक्त राहून मोकळेपणाने मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू करतो.

() विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण :

विधानसभा किंवा लोकसभेतील सदस्य राजीनामा देतो, निधन होते किंवा पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द होते, अशा वेळी त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व थांबते. त्यामुळे निर्माण झालेली रिक्त जागा भरून काढण्यासाठी निवडणूक आयोग पोटनिवडणूक घेतो, जेणेकरून त्या मतदारसंघातील कामकाज सुरळीत चालू राहील.

() एखाद्या घटकराज्यात केव्हा किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण :

निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे असते. ही जबाबदारी राज्यसरकारवर दिल्यास पक्षपाती धोरण स्वीकारले जाऊ शकते. त्यामुळे संविधानाने निवडणुका पारदर्शक व निष्पक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. एखाद्या राज्यात निवडणुका केव्हा व किती टप्प्यांत घ्यायच्या, हे निर्णयही आयोगच घेतो.

प्रश्न ३. संकल्पना स्पष्ट करा.

() मतदारसंघाची पुनर्रचना

उत्तर :

  • विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.
  • प्रारंभी मतदारसंघ ठरवण्यात आले होते, मात्र उदयोग-व्यवसायांच्या निमित्ताने होत असलेल्या स्थलांतरामुळे एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते.
  • ही पुनर्रचना लोकसंख्येच्या प्रमाणात केली जाते.  सध्या ५४३ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत.
  • निवडणूक आयोगाची परिसीमन समिती (Delimitation Commission) मतदारसंघ नव्याने निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम करते.
  • कोणत्या ही दबावाखाली न येता ही यंत्रणा तट स्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते.

() मध्यावधी निवडणुका

उत्तर :

निवडून आलेले सरकार बहुमत गमावल्यास, विशेषतः आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास, सरकार अल्पमतात येते. जर पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल, तर मुदत पूर्ण होण्यापूर्वीच निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणुका  म्हणतात.

प्रश्न ४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

निवडणूक आयोग (भूमिका) :

  • मतदारसंघांची निर्मिती करणे.
  • मतदार याद्या निश्चित करणे.
  • निवडणुका घोषित करणे.
  • उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे.
  • मतदानाची व्यवस्था करणे.
  • मतमोजणी व निकाल जाहीर करणे.

राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका) :

  • उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे
  • उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे.
  • निवडणुकीचा प्रचार करणे.
  • निवडणूक खर्चाचा हिशेब आयोगाला सादर करणे.
  • निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे.

मतदार (भूमिका)

  • निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करणे.
  • प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.
  • मतदान करणे.

प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

() निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर :

निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो-

  • मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.
  • निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.
  • उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे.
  • निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.
  • राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.
  • निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.

() निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

उत्तर :

  • भारतीय निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त असतात, ज्यांना समान अधिकार प्राप्त असतात.
  • या आयुक्तांची निवड राष्ट्रपती करत असतात, आणि या पदासाठी प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींना निवडले जाते.
  • संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष व खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तावर असते.
  • निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी, आयुक्तांना पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणालाही संविधानाने दिलेला नाही.

() निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

उत्तर :

  • निवडणुकीच्या जाहीर होण्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे आणि कोणते वर्तन करू नये, याबाबत निवडणूक आयोगाकडून जी नियमावली जाहीर केली जाते, ती 'निवडणूक आचारसंहिता' म्हणून ओळखली जाते.
  • निवडणुकीच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते. यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते, ज्यामुळे सामान्य मतदाराला आश्वस्तता मिळते आणि निवडणुका निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पडतात.

PDF

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-2-निवडणूक प्रक्रिया-नोट्स

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-2-निवडणूक प्रक्रिया-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71

Useful links :


Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ- १ : संविधानाची वाटचाल - Online Solutions

Next Chapter : पाठ- ३ : राजकीय पक्ष - Online Solutions

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *