Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-४-सामाजिक व राजकीय चळवळी-Maharashtra Board

सामाजिक व राजकीय चळवळी

इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-४- महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) शेतकरी चळवळीची ...... ही प्रमुख मागणी आहे.

(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.

(ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.

(क) ग्राहकांचे संरक्षण करणे.

(ड) धरणे बांधावीत.

उत्तर :

शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे.

(२) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ...... करण्यात आली.

(अ) जलक्रांती           (ब) हरितक्रांती          (क) औद्योगिक क्रांती       (ड) धवलक्रांती

उत्तर :

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली.

प्रश्न २. संकल्पना स्पष्ट करा

(१) आदिवासी चळवळ

उत्तर :

आदिवासी चळवळ :

  • स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगलावरच्या हक्कांवर गदा आणल्याने अनेक आदिवासी समाजांनी उठाव केला.
  • छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संथाळ, मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला.
  • आजही त्यांचा संघर्ष सुरूच आहे.
  • आदिवासी चळवळींचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांचे जंगलावरचे हक्क मान्य करणे.
  • त्यांना वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

(२) कामगार चळवळ

उत्तर :

  • १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उदयोग सुरू झाले. या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.
  • पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.
  • स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता.
  • १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली.
  • जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

आजच्या कामगार चळवळीपुढील समस्या :

  • अस्थिर रोजगार व कायद्याचे संरक्षण नसणे.
  • कंत्राटी कामगार पद्धत व आर्थिक असुरक्षितता
  • अमर्याद कामाचे तास व अनारोग्य.
  • कामाच्या ठिकाणी असुरक्षितता.

प्रश्न ३. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

उत्तर :

  • पर्यावरणाचा -हास ही एक गंभीर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या बनली आहे.
  • शाश्वत विकासासाठी पॅरिस, रिओसारख्या ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा आयोजित करण्यात आल्या.
  • भारतातही पर्यावरण रक्षणासाठी विविध चळवळी सक्रिय आहेत.
  • 'चिपको आंदोलन', 'नमामि गंगे' उपक्रम, हरितक्रांती आणि जैवविविधतेच्या
  • संरक्षणासाठीच्या चळवळींनी पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

(२) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर :

  • स्वातंत्र्यपूर्य काळात बार्डोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न अशा शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या होत्या.
  • महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या कार्यांची प्रेरणा त्यांना मिळाली होती.
  • कूळ कायदयाने शेतकरी चळवळ मंदावली; परंतु हरितक्रांतीनंतर आंदोलनांना सुरुवात झाली.

शेतकरी चळवळीच्या मागण्या :

  • शेतीमालाला योग्य भाव मिळावा.
  • शेतीला उदयोगाचा दर्जा मिळावा.
  • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात.
  • कर्जमाफी, कर्जमुक्ती यांबाबत धोरण ठरवावे.
  • शेतीविषयक राष्ट्रीय धोरण ठरवावे.

(३) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या?

उत्तर :

स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या -

  • स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा.
  • स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सार्वजनिक जीवनात सन्मानाने जगता यावे.
  • सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.
  • स्त्रीशिक्षण, मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात.

प्रश्न ४. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

(१) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण :

  • सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उमे करतात.
  • सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.
  • चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.
  • शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

(२) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण :

  • चळवळीचे यश खंबीर नेतृत्वावर अवलंबून असते.
  • खंबीर नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील व प्रभावी राहते.
  • आंदोलनाची दिशा, तीव्रता आणि कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्णय सक्षम नेतृत्वच घेऊ शकते. तसेच, जनतेपर्यंत पोहोचून चळवळीसाठी जनाधार मिळवण्याचे कामही खंबीर नेतृत्व करते.
  • त्यामुळे चळवळ यशस्वी होण्यासाठी प्रभावी नेतृत्व आवश्यक असते.

(३) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण :

  • अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो
  • भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण
  • अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.
  • अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.

PDF

Notes, Solution Books

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-४-सामाजिक व राजकीय चळवळी-नोट्स

इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-४-सामाजिक व राजकीय चळवळी-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *