Solutions-Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-2-पाठ-1-आनुवंशिकता व उत्क्रांती-Maharashtra Board

आनुवंशिकता व उत्क्रांती

Based on Class 10 -विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-2-पाठ-१- Maharashtra Board

Solutions

प्रश्न 1. खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न 2. पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

() मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.

उत्तर :

  • सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले. त्या वेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनोसोर नाहीसे झाले. त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली.
  • आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्या वेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले.
  • 4 कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथ गतीने नाहीशा झाल्या.
  • त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत होत मानवसदृश प्राण्यांचा विकास होऊ लागला. झाडांवर राहणाऱ्या माकडांपासून कपि आणि मानव अशा दोन भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले.
  • मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती, बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले.
  • हा सारा प्रवास सुमारे सात कोटी वर्षांपासून सुरू झाला. मात्र 50 हजार वर्षांपूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला.
  • सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्या नंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली.

() सजीवांचे भौगोलिक पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद /

जातिउद्भव होतो.

उत्तर :

  • प्रत्येक जाती त्या त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. तिचा आहार, विहार, फलनक्षमता, समागमकाळ इत्यादी जातिनिहाय भिन्न असतो.
  • असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत.
  • या दोन भिन्न जातींचा पूर्वज एकच असू शकतो. परंतु काही कारणाने जर या जातीचे दोन गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादनीयदृष्ट्या अलग राहिले तर त्यांच्या आनुवंशिक गुणधर्मांत बदल होऊन त्यापासून दोन नव्या जाती बनतात, जातिबदल/जातिउद्भव (Speciation) होतो

() जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

Answer :

  • जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात.
  • काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरीत्या जपले जातात. हे सारे अवशेष, तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात.
  • त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते.
  • याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो.
  • भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठरावीक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत.
  • त्या त्या कालावधीत, अनुक्रमे अपृष्ठवंशीय; मत्स्य, उभयचर, सरिसृप; नंतर मध्यजीव महाकल्पात सरिसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात.
  • उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे.

() पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञान विषयक पुरावे दिसून येतात.

उत्तर :

  • मत्स्य, उभयचर, सरिसृप, पक्षी आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य असते.
  • जसजसा पुढचा विकास होतो तसतसे हे साम्य कमी कमी होत जाते. परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते.

प्रश्न 3. कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.

(जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ)

() अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्य कारणभाव ह्युगो ऱ्व्हीस यांच्या .........सिद्धांतामुळे लक्षात आला.

उत्तर :

अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्य कारणभाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या उत्परिवर्तन  सिद्धांतामुळे लक्षात आला.

() प्रथिनांची निर्मिती ............मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

उत्तर :

प्रथिनांची निर्मिती जनुक मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

() DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे ...... म्हणतात.

उत्तर :

DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन म्हणतात.

() उत्क्रांती म्हणजेच............ होय.

उत्तर :

उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय.

() मानवी शरीरात अढळणारे........... हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

उत्तर :

मानवी शरीरात अढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

प्रश्न 4. प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

() लॅमार्क वाद

उत्तर :

जीन बाप्टिस्ट लॅमार्क (1744-1829) 'इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्थांत (Use or disuse of organs) आणि मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत' (Theory of inheritance of acquired characters) किंवा लॅमार्कवाद हे दोन सिद्धांत लॅमार्क यांनी मांडले.

  • प्रत्येक जीव उत्क्रांतीसाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या आयुष्यादरम्यान प्रत्येक जीव बदलत असतो. पुढच्या पिढीकडे हे बदल संक्रमित होतात. पुढील प्रत्येक पिढीमध्येही सजीवांच्या शरीररचनेत असे बदल घडून येतात.
  • हे बदल घडण्याचे कारण म्हणजे सजीवाने एखादी शरीररचना वापरणे किंवा न वापरणे हेच असते. अशा अर्थाचा जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी सिद्धांत मांडला.
  • त्याहीपुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की जिराफ आपली मान ताणत पिढ्यान्‌पिढ्या झाडांवरची पाने खात असल्यामुळे त्याची मान लांब झाली.
  • घणाचे घाव घालून लोहाराचे खांदे बळकट झाले.
  • शहामृग, इमू, पेंग्विन अशा पक्ष्यांचे, न उडण्यामुळे पंख कमकुवत झाले.
  • पाण्यात राहून आणि पोहून हंस, बदकाचे पाय पोहण्यासाठी अनुकूलित झाले.
  • सापाने बिळात जाण्यासाठी योग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले.

ही सर्व उदाहरणे ‘मिळवलेली वैशिष्ट्ये’ (Acquired characters) अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पि ढीकडे संक्रमित होतात. हाच तो ‘मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत’ किंवा लॅमार्कवाद होय.

लॅमार्कवादार आक्षेप :

विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हा स मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्क चे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले.

() डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

उत्तर :

चार्लर्स्‌ रॉबर्ट डार्विन (1809-1882) यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत उत्क्रांती शास्त्रात एक मैलाचा दगड ठरला आहे. डार्विन याने त्यासाठी ‘ओरीजीन ऑफ स्पेसीज’ (Origin of species) हे पुस्तकही प्रसिद्ध केले

  • चार्लस्‌ डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून ' सक्षम ते जगतील ' असे मत मांडले.
  • याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धत टिकून राहतो.
  • सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत.
  • जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वत:च्या वेगळ्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती तयार करतात.
  • डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे; कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.

डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताला घेण्यात आलेले आक्षेप :

  • नैसर्गिक निवडीच्या खेरीज आणखीही काही बाबी उत्क्रांतीसाठी आवश्यक आहेत.
  • डार्विनने उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिलेले नाही.
  • या सिद्धांतात सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही.

() भ्रूणविज्ञान

उत्तर :

  • भ्रूणविज्ञानात | निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
  • विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणबाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते.
  • जसजसा पुढे विकास होत जातो, तसतसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते.
  • प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत.
  • भ्रूणविज्ञान अशा रितीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते.

() उत्क्रांती

उत्तर :

  • उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला.
  • त्याचप्रमाणे, भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय.
  • उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्षे लागतात. मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो.
  • उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह-ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो.
  • उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीव-जाती निर्माण होतात.
  • उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जातिउदभव हे दोन सिदूधांत जगभरात योग्य मानले जातात.

() जोडणारे दुवे

उत्तर :

दोन गटांतील बनस्पती आणि प्राणी यांच्यातील काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा एकमेकांच्या गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. जोडणाऱ्या दुव्यांवरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो.

उदा.:

  • पेरीपॅटस : वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव तसेच संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्‍ताभिसरण संस्था. यावरून पेरीपॅटस हा अनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे असे लक्षात येते.
  • डकबिल प्लॅटिपस : सरिसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो; परंतु सस्तनी प्राण्यांप्रमाणे त्याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. त्यामुळे डकबिल प्लॅटिपस हा सरिसृप व सस्तनी या वर्गांतील दुवा आहे.
  • फुप्फुसांदूवारे श्‍वसन करणारा लंगफिश हा मासा; मत्स्य आणि उभयचर या वर्गांतील हा दुवा आहे.
  • या जोडणाऱ्या दुव्यांवरून पुढील बाबी लक्षात येतात : अँनेलिडा (वलयी) पासून आर्थरोपॉड (संधिपाद), मत्स्यापासून उभयचर आणि सरिसृप प्राण्यांपासून सस्तन प्राणी हे उत्क्रांत झाले.

प्रश्न 5. आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा.

उत्तर :

एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांदवारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.

आनुवंशिक बदल होण्याची कारणे :

  • उत्परिवर्तन : अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात.
  • युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते; त्यामुळेही आनुवंशिक बदल होतात.

प्रश्न 6. अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.

उत्तर :

  • सजीवांमधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे म्हणजे अवशेषांगे.
  • अस्तित्वात असलेल्याच इंद्रियांत क्रमाक्रमाने बदल घडून नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होतात.
  • भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलाची गरज असते. परंतु इतर वेगळ्या परिस्थितींत अशी इंद्रिये निरुपयोगी किंवा हानिकारक ठरतात.
  • नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होऊ शकतात.
  • एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो.
  • आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे; कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते. पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे.
  • मानवाला अवशेषांगांच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात.
  • मानवाच्या शरीरात असणारी इतर अवशेषांगे: माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस.

प्रश्न 7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात?

उत्तर :

  • आनुवंशिक गुणधर्म आई-वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे आनुवंशिक गुणधर्म शक्‍यतो टिकवले जातात.
  • ज्या गुणधर्मामुळे सजीवांत परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात.
  • उत्क्कांतीच्या अतिशय हळुवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत.
  • उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस आनुवंशिक बदलाचेच इंधन असते.

() गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर :

प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यांत होते : (1) प्रतिलेखन (2) भाषांतरण (3) स्थानांतरण. प्रथिनांची निर्मिती DNA वरील जनुकांच्या संकेतानुसार आणि RNA च्या माध्यमातून होते. यालाच प्रथिननिर्मितीचा सेंट्रल डॉग्मा असे म्हटले आहे.

  • प्रतिलेखन : या प्रक्रियेत DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार m-RNA, तयार होतो. यासाठी DNA, चे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्युक्लिओटाइडच्या क्रमवार रचनेनुसार m-RNA वर न्युक्लिओटाइड्सचा पूरक क्रम येतो. DNA तील थायमीनऐवजी m-RNA मध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो. प्रतिलेखन पेशीकेंद्रकात होते. मात्र DNA, वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला m-RNA पेशीद्रव्यात येतो. हा संदेश ' ट्रिप्लेट कोडॉन 'च्या स्वरूपात असतो. म्हणजेच प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत तीन न्युक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो.
  • भाषांतरण : प्रत्येक m-RNA मध्ये हजारो कोडॉन असतात. ठरावीक कोडॉन ठरावीकच अमिनो आम्लांचीच ओळख पटवतात. ही योग्य ती अमिनो आम्ले पुरवण्याचे काम t-RNA करतो. त्याकरिता m-RNA वर जसा कोडॉन असतो, तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन t-RNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात.
  • स्थानांतरण : r-RNA चे कार्य पुढीलप्रमाणे असते : t-RNA, ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान रायबोझोम, m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक-एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात.

प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात.

() उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?

उत्तर :

उत्क्रांतीचा सिद्धांत (Theory of Evolution) :

  • पहिला सजीव पदार्थ म्हणजेच जीवद्रव्य. हे समुद्रात निर्माण झाले.
  • यापासून कालांतराने एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली.
  • जवळजवळ 300 कोटी वर्षांच्या कालावधीत या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होऊन त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले.
  • सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले.
  • संघटनात्मक उत्क्रांती : सजीवातील बदल व विकास होत गेलेल्या प्रक्रियेच्या क्रमविकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हणतात.
  • उत्क्रांती : भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे, म्हणजे उत्क्रांती होय.

उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution ) :

  • बाह्यरूपीय पुरावे (Morphological evidences)
  • शरीरशास्त्रीय पुरावे (Anatomical evidences)
  • अवशेषागे (Vestigial organs)
  • पुराजीवविषयक पुरावे (जीवाश्म विज्ञान) (Palaeontological evidences)
  • जोडणारे दुवे (Connecting links)
  • भ्रूणविज्ञानविषयक पुरावे (Embryological evidences)

() उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.

उत्तर :

  • निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात.
  • उदा., मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते.
  • बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे.
  • परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते.

() जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे

उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर :

जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात.

  • काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरीत्या जपले जातात. हे सारे अवशेष, तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात.
  • त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते.
  • याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो.
  • भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठरावीक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत.
  • त्या त्या कालावधीत, अनुक्रमे अपृष्ठवंशीय; मत्स्य, उभयचर, सरिसृप; नंतर मध्यजीव महाकल्पात सरिसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात.
  • उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे.

() सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा.

उत्तर :

सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले. त्या वेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनोसोर नाहीसे झाले. त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली.

  • लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षांत निरनिराळे माकडसदृश प्राणी निर्माण होत गेले.
  • सुमारे 4 कोटी वर्षांपूवी आफ्रिकेतील या माकडसदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यापासून कपि (एप) आणि मानव अशा दोन गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली.
  • मेंदूच्या आकारमानात वाढ, हाताचा अंगठा आणि पंजा यांच्यात सुधारणा, दोन पायांवर चालणे, पळणे या प्रकारचे बदल होत होत मानवसदूश प्राणी निर्माण होऊ लागले.
  • त्या नंतरच्या काळात हे कपिसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. त्यांच्यापासून गिबन आणि ओरँगउटान निर्माण झाले.
  • उरलेले हे कपिसदृश प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती मानवसदृश प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. त्यामुळे ते ताठ उभे राहू लागले. मागचे पाय शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले.
  • सुमारे 2 कोटी वर्षांपूवी हातांचा वापर करणारे, ताठ उभे गडणांर, पडिले मानवसदृश प्राणी अस्तित्वात आले.
  • त्यानंतर आदिमानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मवरून मानवी उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला.
  • आफ्रिकेतील रामापिथिकस हा एप, पहिला मानवसदृश प्राणी म्हणून नोंद झाली आहे.' रामापिथिकस -> ऑस्ट्रॅलोपिथिकस -> निॲन्डरथॉल मानव -> क्रो मॅन्यां मानव असे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत.
  • 'निॲन्डरथॉल मानव' हा पहिला ' बुद्धिमान मानव ' म्हणजेच होमो सॅपियन म्हटला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले; मात्र सांस्कृतिक बदल झाले.
  • बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती वसवणे, कला, इतिहास, शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या. 200 वर्षांपूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुरुवात केली

मानव वंशाच्या प्रवासातील टप्पे व कालखंड :

  • लेम्युरसारखे प्राचीन प्राणी - 7 कोटी वर्षांपूर्वी
  • इजिप्तोपिथिकस - 4, कोटी वर्षांपूर्वी
  • ड्रायोपिथिकस – 2.5 कोटी वर्षांपूर्वी
  • रामापिथिकस – 1 कोटी वर्षांपूर्वी
  • ऑस्ट्रॅलोपिथिकस - 40 लाख वर्षांपूर्वी
  • कुशल मानव - 20, लाख वर्षांपूर्वी
  • ताठ चालणारा मानव - 15 लाख वर्षांपूर्वी
  • निॲन्डरथॉल – 1.5 लाख वर्षांपूर्वी
  • क्रो मान्यां मानव – 50 हजार वर्षांपूर्वी

PDF- Notes, Solution, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to get PDF from store

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-2-पाठ-1-आनुवंशिकता व उत्क्रांती-Notes

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-2-पाठ-1-आनुवंशिकता व उत्क्रांती-Solutions

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-2-पाठ-1-आनुवंशिकता व उत्क्रांती-Text Books


Maharashtra board -कक्षा- 10 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम - भाग १ व २ सर्व २० धड्यांच्या नोटस (२० PDF) Rs.78

MSBSHSE -कक्षा- 10 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम भाग १ व २ सर्व २० धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (२० PDF) Rs.74

MSBSHSE -कक्षा- 10 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम भाग १ व २ सर्व २० धड्यांची नोट्स व स्वध्याय प्रश्नोत्तरे (40 PDF) Rs. 133

Useful links :


Main Page : - Maharashtra Board Class 10-Marathi Medium - विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-१  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Next Chapter : विज्ञान आणि तंत्रज्ञान-भाग-2 -पाठ - 2-  सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *