Notes-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -1-सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण-Maharashtra Board

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -1- Maharashtra Board

नोट्स

अभ्यासघटक :

  • जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता
  • व्हिटाकर वर्गीकरण पद्धत
  • सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

जैवविविधता वर्गीकरणाची आवश्यकता (Biodiversity and need of classification) :

  • पृथ्वीवरील सजीवांत भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी अनुकूलन होते. एकाच जातीच्या सजीवांतही अनुकूलनामुळे विविध बदल झालेले दिसतात.
  • पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत.
  • प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.
  • सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती हा वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे.

वर्गीकरणाचा इतिहास :

  • कार्ल लिनिअस (इ.स. 1735) यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. वनस्पती व प्राणी (Vegetabilia & Animalia) सृष्टी
  • हेकेल (इ.स. 1866) यांनी 3 सृष्टी कल्पिल्या प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी.
  • चॅटन (इ.स. 1925) यांनी पुन्हा सजीवांचे 2 गट केले - आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी.
  • कोपलँड (इ.स. 1938) यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले - मोनेरा, प्रोटिस्‍टा, वनस्पती व प्राणी.

रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर : त्यांनी इ.स. 1969 मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली.

वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले.

(1) पेशीची जटिलता (Complexity of cell structure) : सजीवांच्या पेशी आदिकेंद्रकी आहेत की दृश्यकेंद्रकी आहेत, हे लक्षात घेतले.

(2) सजीवांचा प्रकार/जटिलता (Complexity of organisms)  : सजीव एकपेशीय आहेत किंवा बहुपेशीय आहेत हे लक्षात घेतले जाते.

(3) पोषणाचा प्रकार (Mode of nutrition): सजीव प्रकाश-संश्लेषण करणारे स्वयंपोषी आहेत की परपोषी आहेत हे लक्षात घेतले जाते. वनस्पती स्वयंपोषी असतात; तर कवके मृतावशेषातून अन्न शोषण करणारे परपोषी सजीव असतात. प्राणी हे भक्षण करून राहणारे परपोषी असतात.

(4) जीवन पद्धती (Life style): पोषणाच्या अनुषंगाने प्रत्येक सजीव निरनिराळ्या पोषण पातळ्यांवर असतो. यालाच जीवन पद्धती असे म्हणतात. वनस्पती उत्पादक असतात, तर प्राणी भक्षक आणि कवकांसारखे सजीव विघटक असतात.

(5) वर्गानुवंशिक संबंध (Phylogenetic relationship) : उत्क्रांती होत असताना आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय अशा सोप्या शरीररचनेपासून जटिल रचनेच्या पद्धतीत सजीवांचे वर्ग विकसित होत गेले. यालाच वर्गानुवंशिक संबंध असे म्हणतात.

पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती :

सृष्टी : मोनेरा, प्रोटिस्टा व कवके :

सृष्टी 1 : मोनेरा (Monera) :

लक्षणे :

  • मोनेरा या सजीव सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असतात.
  • त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात.
  • हे सर्व सजीव आदिकेंद्रकी असून त्यांत पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीअंगके नसतात.
  • या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो.

उदाहरणे : जीवाणू क्लोस्ट्रिडिअम टिटॅनी, व्हायब्रीओ कॉलेरी, ट्रेपोनेमा पॅलीडम, स्ट्रेप्टोकोकस न्युमोनि, लेजीओनेला न्युमोनि, सालमोनेला टायफी, स्टॅफायलोकॉकस ऑरिअस, क्लोस्ट्रीडीअम बोट्युलीनम.

सृष्टी 2 : प्रोटिस्टा (Protista) :

लक्षणे :

  • या सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते.
  • प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात.
  • स्वयंपोषी पेशीत हरितलवके असतात.

उदाहरणे : युग्लिना, व्हॉल्व्हॉक्स, अमिबा, पॅरामेशिअम, प्लास्मोडिअम इत्यादी.

सृष्टी 3 : कवके (Fungi) :

लक्षणे :

  • कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
  • कवके बहुतांशी मृतोपजीवी आहेत. ती कुजलेल्या सेंद्रिय कार्बनी पदार्थांवर जगतात.
  • कवकांची पेशीभित्तिका 'कायटीन' या जटिल शर्करेपासून बनलेली असते.
  • कवके तंतुरूपी असतात. पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात.

उदाहरणे : विविध कवके, किण्व (बेकर्स यीस्ट), बुरशी, अॅस्परजिलस (मक्याच्या क़णसावरील बुरशी), पेनिसिलिअम, भूछत्रे (मश्रूम).

[collapse]

सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण (Classification of microbes) :

पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

(1) जीवाणू (Bacteria) :

लक्षणे :

  • आकार - 1 mm ते 10 mm
  • जीवाणू हे मोनेरा सृष्टीतील एकपेशीय आणि आदिकेंद्रीय सूक्ष्मजीव असतात.
  • काही जीवाणू एकटेच किंवा स्वतंत्र असतात. काही जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात.
  • जीवाणूंच्या पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. मात्र पेशीभित्तिका असते.
  • प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने म्हणजेच द्विविभाजनाने होते.
  • अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात.

उदाहरणे : गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती, सर्पिलाकार.

 (2) आदिजीव (Protozoa) :

लक्षणे :

  • आदिजीव हे प्रोटिस्टा सृष्टीतील एकपेशीय परंतु दृश्यकेंद्रकी पेशी असणारे सजीव होय.
  • त्यांचा आकार सूक्ष्म असून सुमारे 200 um इतका असतो.
  • त्यांना छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका असे प्रचलनाचे अवयव असतात.
  • यांचे प्रजनन द्विखंडन/द्विविभाजन पद्धतीने होते.
  • आदिजीव निरनिराळ्या ठिकाणी आढळतात. जसे, माती, गोडे पाणी व समुद्र इत्यादी.
  • काही आदिजीव दुसऱ्या सजीवांच्या शरीरात राहून रोग निर्माण करतात. उदा., एन्टामिबा हिस्टोलिटिका या आदिजीवामुळे आमांश होतो. प्लास्मोडिअम व्हायव्हॅक्स या आदिजीवामुळे मलेरिया होतो.
  • यांच्या पोषण पद्धती वेगवेगळ्या असतात. उदा., युग्लीना स्वयंपोषी असतात; तर अमिबा, पॅरामेशिअम परपोषी असून ते गढूळ पाण्यात स्वतंत्र जीवन जगतात.

(3) कवके (Fungi) :

लक्षणे :

  • आकार - सुमारे 10 mm ते 100 mm
  • कवक सृष्टीत असणारे सजीव परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी असतात.
  • कवके बहुतेक वेळा मृतोपजीवी असून ते कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
  • 'कायटीन' या जटिल शर्करेपासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली असते.
  • कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात.
  • कवकांतील प्रजनन लैंगिक पद्धतीने होते किंवा अलैंगिक पद्धतीने होते. अलैंगिक पद्धतीने प्रजनन होत असताना द्विखंडन किंवा मुकुलायन होते.
  • उदा., यीस्ट, कॅन्डीडा, आळंबी, मश्रूम, किण्व (बेकर्स यीस्ट), बुरशी, अॅस्परजिलस, पेनिसिलिअम,

(4) शैवाले (Algae) :

लक्षणे :

  • आकार - सुमारे 10 mm ते 100 mm
  • जलीय (पाण्यात वाढणारे).
  • दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव.
  • प्रकाश-संश्लेषण करू शकणारे- पेशींमध्ये हरित लवक.
  • शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यानी दिसतात.

उदाहरणे :  क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास.

 (5) विषाणू (Virus) :

लक्षणे :

  • विषाणू हे सूक्ष्मजीव साधारणतः 10 nm ते 100 nm इतक्या सूक्ष्मतेचे असतात. त्यांना सजीव-निर्जीवांच्या सीमारेषेत धरले जाते. विषाणू हे जीवाणूंच्या 10 ते 100 पटींनी लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात.
  • सामान्यतः त्यांना सजीव मानले जात नाही, परंतु ते स्वतःप्रमाणे प्रतिकृती तयार करू शकतात.
  • विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात असतात. डी-ऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल किंवा रायबोन्युक्लिक आम्ल यापासून विषाणू बनतात. ते लांबलचक रेणू असून त्यांना प्रथिनांचे आवरण असते.
  • विषाणू केवळ वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशींतच राहू शकतात. ज्या वेळी विषाणू संसर्ग करतात, त्या वेळी ते या यजमान पेशींच्या मदतीने स्वतःची प्रथिने तयार करून
  • स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात.
  • त्यानंतर यजमान पेशींचा नाश होतो व विषाणूंच्या प्रतिकृती मुक्त होतात. हे मुक्त विषाणू संसर्गजन्य असल्याने ते नव्या पेशींना संसर्ग करतात.

उदाहरणे :

  • मानव - पोलिओ विषाणू, · इन्फ्लुएंझा विषाणू, · HIV - एड्स विषाणू.
  • गुरे – पिकोर्ना विषाणू (Picorna virus).
  • वनस्पती - टोमॅटो विल्ट विषाणू, · तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी.
  • जीवाणू- बॅक्टेरिओफाज.
व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे दोष :

व्हिटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे दोष :

  • मोनेरा आणि प्रोटिस्टा या दोन्ही सृष्टींतील काही सजीव प्रकाश-संश्लेषण करणारे असतात. त्यामुळे काही स्वयंपोषी, तर काही परपोषी असतात. तसेच या दोन्ही सृष्टींतील काही सजीवांना पेशीभित्तिका असते, तर काहींना नसते.
  • विभिन्न लक्षणे दाखवणारे सजीव प्रोटिस्टा या सृष्टीत एकत्र गटात टाकण्यात आले आहेत.
  • वनस्पती, प्राणी आणि कवक या तिन्ही सृष्टींत त्यांच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सजीवांचा समावेश करण्यात आला नाही. उदा., प्राणी सृष्टीत अमिबासारख्या एकपेशीय प्राण्याचा समावेश नाही. यामुळे संदेह निर्माण होऊ शकतो.
  • तसेच शैवाल जर एकपेशीय असतील तर त्यांना प्रोटिस्टा सृष्टीत आणि बहुपेशीय असतील तर त्यांना वनस्पती सृष्टीत समाविष्ट केले जाते. प्रत्यक्षात एकपेशीय आणि बहुपेशीय शैवालात खूप साम्य आहे. परंतु व्हिटाकरच्या वर्गीकरण पद्धतीने ते एकमेकांपासून खूप दूरच्या गटात गेले आहेत.
  • वॉल्व्हॉक्स व क्लॅमिडोमोनास यांसारख्या शैवाल प्रजाती प्रोटिस्टामध्ये समाविष्ट केल्या जात नाहीत.
  • व्हिटाकरच्या वर्गीकरण पद्धतीत विषाणू कोणत्याच सृष्टीत येत नाहीत. 

[collapse]
PDF - Notes Solutions, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -1-सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण-नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -1-सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Next Chapter : पाठ - 2 : आरोग्य व रोग -  Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *