Notes-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -2-आरोग्य व रोग-Maharashtra Board

आरोग्य व रोग

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -2- Maharashtra Board

नोट्स

अभ्यासघटक :

  • संसर्गजन्य रोग/संक्रामक रोग
  • असंसर्गजन्य रोग
  • जेनेरिक औषधे
  • जीवनशैली आणि आजार

आरोग्य (Health) :

आजारपण : आजारी पडणे म्हणजे आपले स्वास्थ्य बिघडणे होय.

  • काही आजार घरगुती उपचारांनी बरे होतात. त्यामुळे जरी रोगाचा संसर्ग झाला तरी त्याने होणारा त्रास थोड्याच कालावधीसाठी असतो.
  • पण काही वेळेला अशा उपायांनी बरे वाटत नाही. अशा वेळेला डॉक्टरांनी केलेल्या उपचारांचीच गरज भासते.

आरोग्य (Health) : शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरीत्या पूर्णपणे सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय.

रोग : शरीराच्या शारीरिक किंवा मानसिक कार्यातील समतोल ढासळणे किंवा जैविक कार्यात अडथळा येणे म्हणजे रोगाची स्थिती निर्माण होणे. निरनिराळ्या रोगांची लक्षणे भिन्न असतात.

रोगांचे प्रकार : रोगांचे अनेक प्रकार असतात. त्यांचे ढोबळ वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते.

() संसर्गजन्य रोग/संक्रामक रोग :

संसर्गजन्य रोग/सक्रामक रोग : जे रोग दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) यांद्वारे पसरतात त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. उदा., क्षय, कावीळ, कुष्ठरोग, सर्दी-खोकला इत्यादी.

  • रोग्याच्या सतत सहवासामुळे त्याच्या शरीरातले रोगजंतू हवेवाटे वा अन्य मार्गाने दुसऱ्या निरोगी माणसाच्या शरीरात शिरतात. अशा वेळी संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • जीवाणू, विषाणू किंवा आदिजीव यांच्या अकस्मात हल्ल्यामुळे संसर्गजन्य रोग होत असल्याने त्याची लक्षणे त्वरित दिसून येतात.
  • संसर्गजन्य रोगांवर प्रतिजैविके अथवा आदिजीव, जंत असे वाहक मारण्यासाठी औषधे उपलब्ध असतात.

काही महत्त्वाचे संसर्गजन्य रोग :

(i) क्षय (Tuberculosis) :

  • कारक : जीवाणू (मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युली)
  • संक्रमणाचे माध्यम : रोग्याच्या थुंकीतून, हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या वस्तू वापरणे.
  • लक्षणे : दीर्घमुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास
  • उपाय व उपचार : बी. सी.जी. लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे. नियमित औषध घ्यावे. DOT हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा.

(ii) कावीळ (Hepatitis) :

  • कारक : विषाणू (हेपॅटीटीस A,B,C,D,E)
  • संक्रमणाचे माध्यम : पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन
  • लक्षणे : भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा (मल)
  • उपाय व उपचार : पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

 (iii) अतिसार (हगवण) (Diarrhoea) :

  • कारक : जीवाणू, विषाणू शिगेल्ला बॅसीलस एन्टामिबा हिस्टोलिटीका
  • संक्रमणाचे माध्यम : दूषित अन्न व पाणी
  • लक्षणे : पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब
  • उपाय व उपचार : अन्न झाकून ठेवावे, पाणी उकळून व गाळून प्यावे, जलसंजीवनी (ORS) घ्यावी.

(iv) पटकी (Cholera) :

  • कारक : जीवाणू (व्हिब्रियो कॉलरी)
  • संक्रमणाचे माध्यम : दूषित अन्न व पाणी
  • लक्षणे : उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायांत पेटके येणे.
  • उपाय व उपचार : स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी.

(v) विषमज्वर (Typhoid) :

  • कारक : जीवाणू (सालमोनेला टायफी)
  • संक्रमणाचे माध्यम : दूषित अन्न व पाणी
  • लक्षणे : भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104°F पर्यंत ताप येणे.
  • उपाय व उपचार : स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी.

सद्यःस्थितीतील काही महत्त्वाचे रोग :

(i) डेंग्यू (Dengue) :

प्रसार :

  • डेंग्यू हा संसर्गजन्य रोग एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत पसरतो.
  • हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन -1, 2 या विषाणूमुळे होतो.

लक्षणे :

  • तीव्र ताप
  • तीव्र डोकेदुखी
  • उलट्या होणे.
  • डोळ्यांच्या खोबणीत दुखणे.
  • रक्तबिंबिका प्रमाण कमी होणे.
  • शरीरांतर्गत रक्तस्राव होणे.

निदान :

  • रक्त चाचणी, रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी

(ii) स्वाईन फ्लू :

प्रसार :

  • स्वाईन फ्लूचा संसर्ग डुकरामुळे किंवा माणसाद्वारे होतो.
  • इन्फ्लुएन्झा ए (H1N1) या विषाणूमुळे होणारा संसर्ग.
  • रोग्याच्या घामातून, नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून विषाणूंचा प्रसार.

लक्षणे :

  • धाप लागणे.
  • श्वसनाला अडथळा निर्माण होणे.
  • घसा खवखवणे.
  • शरीर दुखणे.

निदान :

  • रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो.

(iii) एड्स :

प्रसार :

  • HIV (Human Immunodeficiency Virus) विषाणूमुळे होतो.
  • संसर्ग होऊन असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून व दूषित रक्तातून लागण.

लक्षणे :

व्यक्तिसापेक्ष लक्षणे. मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती हळूहळू दुर्बल होऊन विविध रोगांची लागण होते.

निदान :

  • ELISA ही रक्ताची चाचणी.

डासांमार्फत रोगप्रसार :

  • हिवताप- अॅनाफिलीस डासाच्या मादीमुळे.
  • हत्तीरोग - क्युलेक्स डासाच्या मादीमुळे.
  • डेंग्यू- एडिस डासाच्या मादीमुळे.
  • एडिस व अॅनाफिलीस यांचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी/गटारे येथे असतो.

डासांची पैदास होऊ नये म्हणून उपाय :

  • घराभोवती आणि घरामध्ये कोठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे.
  • साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसेल तर त्यावर कीटकनाशक फवारणी, नगरपालिका / ग्रामपंचायत अशा ठिकाणच्या हिवताप निर्मूलन विभागाकडे तक्रार अर्ज देणे.
  • तळी, डबकी असतील तर तिथे गप्पी मासे सोडणे. गप्पी मासे डासाच्या अळ्या खातात, त्यामुळे आपसूकच डासांचे नियंत्रण होते.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था : स्वाईन फ्लूच्या निदानासाठी ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी - एन.आय.व्ही .), पुणे’ व ‘राष्ट्रीय संचारी रोग संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस – एन.आय.सी.डी) दिल्ली’ येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.

लक्षात ठेवा : HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने व HIV बाधित व्यक्तीची सेवासुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा.

प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार :

  • मानवाप्रमाणेच पाळीव प्राण्यांना ही निरनिराळ्या आजारांची बाधा होऊ शकते. असे प्राणी काही ठरावीक रोगांचे वाहक सुद्धा असू शकतात. त्यांच्या काही आजारांमुळे आपल्याला देखील संसर्ग होण्याची भीती असते.
  • कबुतरांमुळे श्वसनसंस्थेच्या बऱ्याच रोगांचा संसर्ग होऊ शकतो. अस्थमा किंवा दमा या रोगाचा संबंध कबुतरांच्या पिसांशी आणि विष्ठेशी असल्याचे आढळून आले आहे.
  • उंदीर किंवा घुशी या काही रोगांच्या वाहक असतात. जीवाणुजन्य प्लेग हा रोग उंदराच्या माध्यमातून मानवांत पसरला जातो.
  • झुरळे विषमज्वराच्या जीवाणूची वाहक असू शकतात.

रेबीज (Rabies) :

रेबीज प्राणघातक, विषाणुजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जा तंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात.

रेबीज रोगाची लक्षणे :

  • 2 ते 12 आठवडे ताप राहतो.
  • अतिशयोक्‍ती करत वागणे.
  • पाण्याची भीती वाटणे.
  • जलद्वेष (Hydrophobia) हे या रोगाचे महत्त्वा चे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात.
  • कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसांत दिसू लागतात

उपाय : रेबीज प्राणघातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते..

() असंसर्गजन्य रोग :

असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग : जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत, अशा रोगांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात.

(i) कर्करोग :

(i) कर्करोग (Cancer) :

कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढ. अशा अनियंत्रित वाढीमुळे गाठ किंवा दुर्दम्य अर्बुद (tumour) तयार होतो. शरीरातील कोणत्याही ऊतीत कर्करोग होऊ शकतो. उदा., फुप्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा किंवा रक्त.

कारणे :

  • कर्करोगजन्य पदार्थांचे सेवन उदा., तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान, सतत जंकफूड खाणे इत्यादी.
  • चोथायुक्त अन्नपदार्थांचा (फळे व पालेभाज्यांचा) समावेश नसणे हे अन्नमार्गाच्या कर्करोगाचे कारण आहे.
  • आनुवंशिक कारणांनी देखील कर्करोग होतो.

लक्षणे :

  • वजनात काहीही कारण नसताना घट होणे.
  • बरा न होणारा दीर्घकालीन खोकला.
  • आवाज घोगरा होणे आणि गिळताना त्रास होणे.
  • उपचार करून देखील बरा न होणारा व्रण किंवा कमी न होणारी सूज.
  • स्तनात गाठी निर्माण होणे.

कर्करोगावरील आधुनिक निदान पद्धती :

कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढील तंत्रांचा वापर करतात :

  • टिश्यू डायग्नोसिस
  • सी. टी. स्कॅन
  • एम. आर. आय. स्कॅन
  • मॅमोग्राफी बायॉप्सी

उपचार :

  • रसायनोपचार (Chemotherapy)
  • किरणोपचार (Radiation therapy)
  • शल्यचिकित्सा (Surgery)
  • रोबोटिक सर्जरी (Robotic surgery)
  • लॅप्रोस्कॉपिक सर्जरी (Laparoscopic surgery)

प्रतिबंधात्मक उपाय/नियंत्रण :

  • आहारावर योग्य नियंत्रण
  • शारीरिक व्यायाम
  • तंबाखू सेवन, धूम्रपान इत्यादी कधीही न करणे.
  • व्यसनांच्या आहारी न जाणे.

[collapse]
(ii) मधुमेह :

(ii) मधुमेह (Diabetes) :

  • सामान्य निरोगी माणसाच्या स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन हे संप्रेरक, मधुमेही रुग्णाच्या शरीरात तयार होत नाही किंवा कमी प्रमाणात स्रवते.
  • इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे मधुमेही व्यक्तीच्या रक्तात शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही.

कारणे :

  • आनुवंशिकता
  • अतिलठ्ठपणा
  • व्यायामाचा/कष्टाचा अभाव
  • मानसिक ताण/तणाव

लक्षणे :

  • सारखी तहान लागणे.
  • जास्त वेळा लघवी होणे.
  • विशेषतः रात्री वारंवार लघवी करावी लागणे.
  • वजन अनियंत्रितरीत्या वाढणे किंवा कमी होणे.
  • थकवा जाणवणे.

निदान पद्धती :

  • रक्त शर्करा तपासणी.
  • Hb1AC ही तपासणी.

प्रतिबंधात्मक उपाय/नियंत्रण :

  • इन्सुलिन इंजेक्शन किंवा इन्सुलिन निर्मितीला प्रेरण देणाऱ्या गोळ्या/औषधे.
  • आहारावर सक्त नियंत्रण. योग्य आहार.
  • कर्बोदके आणि मेदयुक्त पदार्थ नियंत्रित प्रमाणात खाणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आणि वेळेवर औषधे घेणे.
  • रक्तातील साखरेच्या पातळीची वेळोवेळी तपासणी करणे.
  • व्यायाम आणि नियमित चालणे.

[collapse]

भारतात मधुमेहाचे प्रमाण जागतिक पातळीवर सर्वांत जास्त आहे. सात कोटी भारतीय मधुमेही आहेत.

(iii) हृदयविकार :

(iii) हृदयविकार (Heart Diseases) :

  • हृदयाच्या कार्यक्षमतेत काही कारणांनी घट झाली की हृदयविकार होतो. हृदयाच्या स्नायूंना सतत रक्ताचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्या रक्तावाटे ऑक्सिजन व पोषक द्रव्ये हृदयाला पोहोचवली जातात.
  • असा पुरवठा कमी झाल्यास हृदयास जास्त कार्य करावे लागून ताण येतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशा परिस्थितीत अतिशय वेगाने डॉक्टरी उपचार मिळावे लागतात. त्वरित औषधोपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो.

लक्षणे :

  • छातीत असह्य वेदना जाणवणे.
  • खांदे, मान व डावा हात दुखणे.
  • हात आखडणे.
  • भरपूर घाम सुटणे.
  • अस्वस्थता, कंप जाणवणे.
  • शौचाची जाणीव होणे.

कारणे :

  • धूम्रपान करणे, मद्यपान.
  • मधुमेह.
  • उच्च रक्तदाब.
  • लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता.
  • व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे.
  • आनुवंशिकता.
  • तणाव, रागीटपणा आणि चिंता.

निदान पद्धती :

  • कार्डिओग्रॉम हा आलेख काढून घेणे.
  • हृदयरोगतज्ज्ञाकडून सखोल तपासणी.
  • रक्ताच्या काही तपासण्या.

उपचार :

  • त्वरित 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करणे.
  • रुग्ण शुद्धीवर आहे का ते तपासणे.
  • कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट (O.L.S.) या प्रकारचा उपचार करणे. यात रुग्णाला कडक
  • पृष्ठभागावर झोपवून रुग्णाच्या छातीवर दाब देऊन हृदयाला कार्यरत ठेवता येते. एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब देऊन डॉक्टर येईस्तोवर असा प्रथमोपचार केल्यास जीव वाचवता येतो.

उपचार पद्धती :

  • अॅन्जिओप्लास्टी
  • ओपन हार्ट सर्जरी
  • स्टेंट्स टाकणे
  • बायपास सर्जरी
  • हृदय प्रत्यारोपण
  • पेसमेकर बसवणे

[collapse]

लक्षात ठेवा : अयोग्य जीवनशैली म्हणजे चुकीचा आहार-विहार, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त मानसिक ताण-तणाव, संप्रेरकांचे अनियमित स्त्रवणे इत्यादी मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत.

औषधांचा गैरवापर :

  • कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात. त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात.
  • जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके (Pain Killers) घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो.
  • प्रतिजैविकांच्या (Antibiotics) अतिवापराने मळमळ, पोटदखी,पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पड़णे इत्यादी लक्षणे तयार होतात.

लक्षात ठेवा : प्रत्येक रोग ठरावीक वैद्यकीय कारणांनीच होतो. ज्या लोकांना याचे ज्ञान नसते ते अंधश्रद्धा बाळगतात. उदा., दैवी प्रकोप, दुसऱ्याच्या मत्सरामुळे, मंत्र-तंत्र, जादूटोणा अशा कारणांनी कोणतेही रोग होत नाहीत. योग्य वैद्यकीय उपचारांनीच रोग बरे केले जातात.

जेनेरिक औषधे :

  • ज्या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंट शिवाय केले जाते त्यांना जेनेरिक औषधे असे म्हणतात. ब्रॅन्डेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असणारी जेनेरिक औषधे तुलनेने स्वस्त असतात.
  • जेनेरिक औषधांची मोठ्या प्रमाणावर निर्यात भारतीय कंपन्या करतात. मात्र इथे ब्रॅन्डेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकली जातात.
  • अमेरिकेसारख्या देशात 80% जेनेरिक औषधे वापरली जातात. त्यामुळे त्यांच्या देशात औषधावरील शेकडो अब्ज रुपये वाचवले जातात.
  • पंतप्रधान जनऔषध योजनेच्या अंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला 'जनऔषधी स्टोअर्स'मध्ये उपलब्ध झाली आहेत. भारत सरकारने ही योजना 1 जुलै 2015 रोजी सुरू केली आहे.

जीवनशैली आणि आजार :

  • जीवनशैली म्हणजे आहार-विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो.
  • उशीरा उठणे, उशीरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंकफूड (अरबट चरबट) खाणे यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणे वाढले आहे.
  • आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा.

लसीकरण (Vaccination) :

  • लसीकरण केल्याने आजारांना प्रतिबंध करता येतो. बालकांना योग्य लसी देऊन त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण करता येते.

आरोग्य दिनविशेष  :

  • 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
  • 14 जून - जागतिक रक्तदान दिन
  • 29 सप्टेंबर - जागतिक हृदय दिन
  • 14 नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन
PDF - Notes Solutions, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -2-आरोग्य व रोग-नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -2-आरोग्य व रोग-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 1 : सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण  -  Online Notes

Next Chapter : पाठ - 3 : बल व दाब -  Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *