Notes-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-8-प्रदूषण-Maharashtra Board

प्रदूषण

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -8- Maharashtra Board

नोट्स

अभ्यासघटक :

  • प्रदूषण
  • प्रदूषके
  • हवा प्रदूषण
  • जल प्रदूषण
  • मृदा प्रदूषण
  • प्रदूषण - प्रतिबंध व नियंत्रण
  • माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
  • औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर इत्यादी मानवनिर्मित समस्यांमुळे पृथ्वीवरील पर्यावरण असंतुलित व खराब होऊ लागले आहे.
  • या साऱ्यामुळे पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण होते. या प्रदूषणाचे परिणाम पृथ्वीवरच्या सर्व सजीवांवर आणि मानवांवर देखील होतात.

प्रदूषण (Pollution) :

नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.

हवा, जल, जमीन अशा सर्वच ठिकाणी प्रदूषण होत असते.

  • हवेमध्ये निरनिराळे विषारी वायू आणि कणरूप पदार्थ सोडल्यामुळे हवा प्रदूषित
  • होते.
  • जलाशयाच्या ठिकाणी वाटेल तसे पदार्थ सोडले जातात. समुद्र, नद्या, तलाव, कालवे अशा सर्वच ठिकाणी औद्योगिक कारखान्यांतून किंवा घरगुती सांडपाण्यातून निरनिराळी प्रदूषके पाण्यात मिसळली जातात.
  • जमिनीवर, मातीत, शेतात सर्व ठिकाणी घनपदार्थ फेकले गेल्याने प्रदूषण होते. शेतात खते-कीटकनाशके यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
  • काही प्रकारचे प्रदूषण नैसर्गिक कारणांनी होते. उदा., वणवे, धुळीची वादळे, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी.
  • परंतु जास्त प्रमाणात प्रदूषण हे मानवी हस्तक्षेपामुळे व त्याने केलेल्या निरनिराळ्या क्रियांमुळे प्रदूषण होते. हवे असलेले उत्पादन निर्माण करीत असताना अनेक हानिकारक पदार्थ तयार होत असतात. त्या पदार्थांमुळे जल, जमीन आणि हवा अशा तिन्ही ठिकाणी प्रदूषण होत असते.

प्रदूषके (Pollutants) :

  • प्रदूषके हे परिसंस्थेच्या सर्व घटकांवर घातक परिणाम करणारे घटक असतात. त्यांच्यामुळे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा येतो.
  • अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवांवर) यांचा परिणाम होत असल्याने प्रदूषण होते.
  • प्रदूषकांच्या प्रमाणानुसार पर्यावरणावर परिणाम होत असतात.
  • पर्यावरणात जास्त प्रमाणात प्रदूषके सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते.

प्रदूषकांचे प्रकार : (1) नैसर्गिक प्रदूषके (2) मानवनिर्मित प्रदूषके.

  • निसर्गातील प्रक्रियांमुळे नैसर्गिक प्रदूषके कालांतराने नष्ट होतात. मानवनिर्मित प्रदूषके मात्र दीर्घकाळ टिकतात.

हवा प्रदूषण (Air pollution)

हवा प्रदूषण : विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारखे घातक पदार्थ हवेत मिसळले आणि हवा दूषित झाली की त्याला हवा प्रदूषण असे म्हणतात.

(i) हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे :

कारणे प्रदूषके
ज्वालामुखीचा उद्रेक : हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनिअम क्लोराइड, हायड्रोजन, बाष्प, धूलिकण
भूकंप : पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ.
वावटळी धुळीची वादळे : जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव.
वणवे : कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड व धूर.
सूक्ष्मजीव : काही घातक जीवाणू, कवकांचे बिजाणू.

(ii) हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे :

कारणे प्रदूषके
इंधनाचा वापर : (i) दगडी कोळसा, लाकूड, एलपीजी, रॉकेल, डीझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात.

(ii) घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते

औद्योगिकीकरण : विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे , नायट्रोजन ऑक्साइड, वातावरणात मिसळतात
अणुऊर्जानिर्मिती अणुस्फोट : अणुऊर्जानिर्मितीत युरेनि अम, थोरिअम, ग्रॅफाइट, प्लुटोनिअम या

मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते.

हवा प्रदूषणाचा वनस्पती प्राणी यांच्यावर होणारा परिणाम :

वनस्पती :

  • पर्णछिद्रे बुजून जातात.
  • प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.
  • वनस्प तची वाढ खुंटते. पाने गळतात, पिवळी पडतात.

प्राणी :

  • श्वसनावर विपरीत परिणाम होतो.
  • डोळ्यांचा दाह

हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम :

(i) ओझोन थराचा ऱ्हास/नाश : वातावरणाच्या स्थितांवर थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर असतो. ओझोन थर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून (UV-B) पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. प्रदूषणाने आता या ओझोन थराला धोका निर्माण झाला आहे.

(ii) हरितगृह परिणाम व जागतिक तापमानवाढ : पृथ्वीभोवतीच्या वातावरणात CO2 कमी प्रमाणात असतो. परंतु तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवर तापमान उबदार राहते.

मात्र गेल्या शंभर वर्षांत इंधन ज्वलन आणि औद्योगिकीकरणामुळे वातावरणामधील CO2 प्रमाणाबाहेर वाढला आहे. या CO2 चा थर पृथ्वीसभोवती राहतो. त्याच्यासोबत नायट्रस ऑक्साइड, मिथेन वायू व CFC हे वायू देखील पृथ्वीवरील उष्णता बाहेरच्या वातावरणात उत्सर्जित होऊ देत नाहीत.

हे सर्व वायू हरित गृह वायू आणि ते करीत असलेला परिणाम म्हणजे हरित गृह परिणाम होय.

हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. वाढत्या हरितगृह परिणामामुळे :

  • जागतिक तापमानवाढ (Global warming)
  • हवामानात बदल
  • पिकांचे उत्पादन कमी आणि अनियमित होणे
  • वन्यजीवांना धोका
  • हिमनग व हिमनद्या वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ

असे घातक परिणाम दिसून येतात.

(iii) आम्लवर्षा (Acid Rain ) : कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्सा इडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते. ही आम्ले , पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

आम्लवर्षेचे परिणाम :

  • मृदेचीं व जलाशयाची आम्लता वाढते. यामुळे जलचर आणि वनातील सजीवांची हानी होते. संपूर्ण परिसंस्थेवर घातक परिणाम होतो.
  • आम्लामुळे इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया होऊन क्षरण होते.
  • सल्फरयुक्त हवा रंगकाम, तैलचित्र, नायलॉन कापड, सुती कपडे, रेयॉन कपडे, कातडी वस्तू आणि कागद यांवर परिणाम करते व त्यांचा रंग बदलते.
  • जड धातू (कॅड्मिअम आणि मर्क्युरीसारखे) वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात.
  • जलाशयातील आणि जलवाहिन्यांतील पाणी आम्लयुक्त होते. जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टिकचे पेयजलात निक्षालन होते. आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय :

  • कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर तसाच हवेत सोडू नये. त्यातील दूषित कण हवा यंत्रणेचा वापर करून काढून घ्यावेत. उदा., निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणी यंत्र (Filters) यांचा वापर बंधनकारक असावा.
  • घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट.
  • आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण.
  • CFC निर्मितीवर बंदी/बंधने.
हवा प्रदूषणाच्या काही कुप्रसिद्ध घटना :

(1) लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडले. त्यात दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर म सळला. या धुरक्याची छाया 5 दिवस राहिली. लंडन शहरात 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीत अशीच छाया होती.

(2) इ. स. 1948 साली पिट्सबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यांमुळे दिवसाही रात्रच झाली, यावेळी या शहराला “काळे शहर” म्हणून ओळखले गेले .

(3) भोपाळमध्ये युनियन कार्बाईड कंपनीमध्ये घडलेल्या अपघातातून वायुगळती झाली व

त्यामुळे 2 डिसेंबर 1984 च्या रात्री आठ हजार लोक प्राणाला मुकले. याला भोपाळ वायू

दुर्घटना असे म्हणतात. ही आतापर्यंतची सर्वांत भयानक औद्योगिक दुर्घटना आहे.

 जल प्रदूषण (Water Pollution) :

जल प्रदूषण म्हणजे नैसर्गिक व बाह्यघटकांच्या मिश्रणाने पाण्यात होणारे अपायकारक बदल. जल प्रदूषणाने पाणी अस्वच्छ आणि विषारी होते, त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलीय सजीवांना अपाय होतो आणि मानवांत साथीच्या रोगांचा फैलाव होतो.

भौतिक, रासायनिक व जैविक बदल झाल्यामुळे गोडे किंवा समुद्राचे खारे पाणी प्रदूषित होते.

जलप्रदूषके (Water Pollutants) :

  • जैविक जलप्रदूषके : शैवाल, जिवाणू, विषाणू व परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही या जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात.
  • असेंद्रिय जलप्रदूषके : बारीक वाळू, धुलिकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश.
  • सेंद्रिय जलप्रदूषके : तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके.

पाणी प्रदूषणाची कारणे परिणाम :

() नैसर्गिक कारणे परिणाम :

कारणे परिणाम
जलपर्णीची वाढ प्राणवायू कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. (अतिजैविकीकरण)
कुजणारे पदार्थ इतर सजीवांचे (प्राणी व वनस्पती) अवशेष पाण्यात पडून सडणे व कुजणे.
गाळ गाळामुळे नदीचे पात्र किंवा प्रवाह नैसर्गिकरीत्या बदलतात. गाळ प्रदूषणकारी असू शकतो.
जमिनीची धूप जमिनीची धूप होऊन सूक्ष्मजीव जसे जैविक, तसेच अजैविक घटक पाण्यात मिसळतात.
कवक कवक व जीवाणूंची वाढ पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर होते. कवक आणि जीवाणूंमुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. रोगराई पसरते.
शैवाल पाणी शैवालामुळे अस्वच्छ होते.
कृमी जमिनीवरचे कृमी पाण्यात वाहत येऊन पाणी दूषित होते..

() मानव निर्मित कारणे परिणाम :

निरनिराळ्या स्रोतांतून जलाशयात मानवाने सोडलेले उत्सर्जित पाणी आणि इतर पदार्थ यांना एकत्रितपणे जल प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे असे म्हणता येईल.

कारणे परिणाम
निवासी क्षेत्रातील सांडपाणी मल-मूत्र आणि इतर प्रदूषित पाणी शहरात आणि गावात जलाशयात सोडले जाते. मोठ्या शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया जरी केल्या जात असतील तरी त्या पुरेशा पडत नाहीत.
औद्यागिक सांडपाणी निरनिराळ्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित पाण्यात अनेक विषारी आणि घातक द्रव्ये, विरंजक रसायने, पारा, शिसे असे धातू इत्यादी असतात.
खनिज तेल गळती यात मुख्यत्वे क्रूड तेलाच्या गळतीने समुद्रात तेलतवंग निर्माण होतात.
खते कीटकनाशकांचा वापर कीटकनाशके आणि खते यांच्या वापराने शेताच्या आजूबाजूच्या जलाशयात रासायनिक एन्ड्रिन, क्लोरीन आणि कार्बोनेट असणारी कीटकनाशके मिसळली जातात.
इतर कारणे मानवांच्या चुकीच्या व्यवहाराने पाणी प्रदूषित होते. उदा., नदीच्या पाण्यात किंवा सागरकिनारी मलमूत्र विसर्जन करणे, कपडे धुणे, अंबाडी-घायपात पाण्यात सडवणे, रक्षा, अस्थि विसर्जन व निर्माल्य इत्यादी जलाशयात टाकणे.

औष्णिक विद्युत केंद्रातून गरम पाणी नजीकच्या जलाशयात सोडल्यास औष्णिक प्रदूषण होते.

पाणी प्रदूषणाचे परिणाम :

(i) मानवावर होणारा परिणाम :

  • निरनिराळे जीवाणुजन्य आणि विषाणुजन्य विकार दूषित पाण्यावाटे माणसांना होतात. काही रोगांच्या साथी देखील येतात.
  • अतिसार, कावीळ, विषमज्वर, पटकी, आन्त्रशोथ असे पोटाचे विकार दुषित पाण्यामुळे होतात.
  • त्वचा रोग आणि हाडांच्या विकृती प्रदूषित पाण्यातील घातक द्रव्यांमुळे होतात.
  • यकृत, मेंदू, मूत्रपिंड अशा अवयवांमध्ये प्रदूषित पाण्यातील जड धातूंचा संचय होऊन निरनिराळे विकार होऊ शकतात.

(ii) परिसंस्थेवर होणारा परिणाम (जैविक परिणाम) :

  • परिसंस्थेतील वनस्पतींची वाढ खुंटली जाऊन वनस्पतींच्या प्रजातींचा नाश होतो.
  • जलपरिसंस्थेचे नियमन आणि संतुलन बिघडल्याने तेथील अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी विस्कळीत होतात.
  • प्रदूषकांमुळे मासे व इतर जलचर मरतात.
  • तेलतवंग पसरल्याने समुद्रपक्ष्यांवरही परिणाम होतो.
  • पाण्यातील उपयुक्त जीवाणू नष्ट होतात.

इतर परिणाम - अजैविक परिणाम :

  • पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म प्रदूषकांमुळे बदलतात. जसे रंग व चव बदलते.
  • पाण्यातील क्षारांची पातळी बदलते.
  • पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडतात.
  • पाण्यातील उपयुक्‍त जीवजंतू नष्ट होतात.
  • जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो.
  • पिकात विषारी तत्व समाविष्ट होतात.

मृदा प्रदूषण (Soil Pollution) :

मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरीत्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात, त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते. तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात.

मृदा प्रदूषणाचे परिणाम :

  • मृदेत मिसळणाऱ्या मैल्यात अनेक रोगकारक जीवाणु, विषाणू आणि आतड्यातील परपोषी कृमी असतात. यांच्यामुळे विविध रोग पसरू शकतात.
  • मानवी तसेच प्राण्यांच्या विष्ठेमध्ये रोगकारक सूक्ष्मजीव असतात. हे पदार्थ खतांच्या स्वरूपात मृदेत मिसळले जातात. अशा मृदेवर आणि खतांवर वाढलेल्या वनस्पतींचे दूषितीकरण होते व त्यामुळे अशा वनस्पतींचा आहार घेणाऱ्या मानवांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो.
  • मृदा तसेच भूमी प्रदूषणामुळे जमिनीचा कस आणि उत्पादनक्षमता कमी होते.
  • मृदा प्रदूषणामुळे सभोवतालच्या जलाशयांना जल प्रदूषणाचा धोका पोहोचतो. मृदेमधून विषारी द्रव्ये जवळच्या पाणीसाठ्यात शिरतात किंवा पाझरून भूगर्भजलात प्रवेश करतात.
  • किरणोत्सारी प्रदूषके व इतर पदार्थ मृदेवाटे पिके, पाणी व शेवटी मानव अशा रितीने अन्नसाखळीद्वारा प्रवास करतात.

मृदा प्रदूषणाचा हवा व जल प्रदूषण यांच्याशी असणारा संबंध :

  • ओला कचरा तसाच पाण्यात फेकल्याने तो सडून व कुजून त्यात हानिकारक रोगजंतूंची वाढ होते. असा कचरा वाहत्या पाण्यात मिसळला की जल प्रदूषण होते.
  • शेतात अतिप्रमाणात वापरलेल्या रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके यामुळे मृदा प्रदूषण होते. फवारणीमुळे कीटकनाशके व तणनाशके हवेत मिसळून हवा प्रदूषित करतात.
  • रासायनिक खतांच्या अतिवापराने त्यातील घातक रसायने पाण्यात मिसळून जल प्रदूषण करतात.
  • मानवी मलमूत्र, पशू, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते.
  • या मलमूत्र व विष्ठेमुळे त्यातून काही वायू बाहेर पडून दुर्गंधी येते. हे वायू हवेत मिसळल्यावर हवेचे प्रदूषण होते. हीच घाण पाण्यात मिसळल्यास पाणी प्रदूषित होते. शिवाय त्यापासून संसर्ग होण्याचा संभव असतो.

प्रदूषण - प्रतिबंध नियंत्रण :

भारत सरकारने प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित केलेले कायदे पुढीलप्रमाणे आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण आणि नियमन करण्याचा प्रयत्न केला जातो.

(1) जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 1974.

(2) हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 1981.

(3) पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986.

(4) जैववैद्यकीय कचरा (हाताळणी आणि व्यवस्थापन नियम) - 1998.

(5) धोकादायक उत्सर्ग व घनकचरा (हाताळणी आणि व्यवस्थापन नियम) - 1989.

(6) ध्वनी प्रदूषण नियंत्रण (नियम आणि नियंत्रण) - 2000.

(7) ई-कचरा (हाताळणी आणि व्यवस्थापन नियम)- 2011.

प्रदूषण नियंत्रणासाठीच्या कायद्यांची अंमलबजावणी :

  • भारत सरकारने प्रदूषण नियंत्रणासंबंधी विविध कायदे तयार केले आहेत. प्रदूषणाचे नियमन, नियंत्रण आणि प्रतिबंध व्हावा यासाठी सरकार मार्गदर्शक तत्त्वे आखून देते.
  • केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ या संस्था प्रदूषणविरोधी नियंत्रण योग्य रितीने पाळले जाते की नाही, यावर लक्ष ठेवतात.
  • कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इत्यादी संस्थांद्वारा कायद्यांचे पालन होते की नाही, यावर प्रदूषण नियामक मंडळे लक्ष ठेवून असतात.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-8-प्रदूषण - नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-8-प्रदूषण - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 7 : धातु-अधातु  -  Online Notes

Next Chapter : पाठ - 9 : आपत्ती व्यवस्थापन -  Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *