सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -1- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा.
- जीवाणू : सृष्टी : मोनेरा.
- आदिजीव : सृष्टी : प्रोटिस्टा
- कवके : सृष्टी : कवक
- शैवाल : एकपेशीय असल्यास सृष्टी : प्रोटिस्टा,
- बहुपेशीय असल्यास सृष्टी : वनस्पती.
- आदिकेंद्रकी : सृष्टी : मोनेरा
- दृश्यकेंद्रकी : मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते.
- सूक्ष्मजीव : सृष्टी : मोनेरा किंवा प्रोटिस्टा.
प्रश्न 2. सजीव, आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा.
प्रश्न 3. माझा जोडीदार शोधा.
अ | ब |
कवक | क्लोरेल्ला |
प्रोटोझुआ | बॅक्टेरियोफेज |
विषाणू | कॅन्डिडा |
शैवाल | अमिबा |
जीवाणू | आदि केंद्रकी |
(1) कवक - कॅन्डिडा
(2) प्रोटोझुआ - अमिबा
(3) विषाणू - बॅक्टेरियोफेज
(4) शैवाल - क्लोरेल्ला
(5) जीवाण - आदिकेंद्रकी.
प्रश्न 4. दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
(अ) लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत.
चूक.
स्पष्टीकरण : लॅक्टोबॅसिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत. दुधाचे दही बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो. शिवाय इतरही दुग्धजन्य पदार्थ तयार करताना लॅक्टोबॅसिलाय वापरतात.
(आ) कवकांची पेशीभित्तिका कायटीनपासून बनलेली असते.
बरोबर.
स्पष्टीकरण : वनस्पतींच्या पेशींची पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेली असते; मात्र कवकांची पेशीभित्तिका 'कायटीन' या जटिल शर्करेपासून बनलेली असते. या पेशिभित्तिकेच्या आत पेशीद्रव्यात अनेक केंद्रके असतात.
(इ) अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो.
बरोबर.
स्पष्टीकरण : अमिबा हा आदिजीव असून छद्मपाद हा त्याच्या हालचालीचा अवयव आहे.
(ई) प्लास्मोडिअममुळे आमांश होतो.
चूक.
स्पष्टीकरण : प्लास्मोडिअममुळे मलेरिया होतो, तर एन्टामिबा हिस्टोलिटिकामुळे आमांश होतो.
(उ) टोमॅटोविल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे.
चूक.
स्पष्टीकरण : टोमॅटो विल्ट हा विषाणुजन्य रोग आहे. या रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशींनाच संसर्ग करतात.
प्रश्न 5. उत्तरे लिहा.
(अ) व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा.
- व्हिटाकर यांनी ज्या पद्धतीने वर्गीकरण केले आहे, ते अतिशय शास्त्रीय पायावर आधारित आहे.
- आदिकेंद्रकी सजीवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. आदिकेंद्रकी सजीव इतर सजीवांपेक्षा निराळे असतात. त्यामुळे हा समावेश योग्य ठरतो.
- सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लीनासारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवाचे नेमके वर्गीकरण करता आले.
- युग्लीनामध्ये हरितलवक असल्याने ती वनस्पतीप्रमाणे प्रकाश-संश्लेषण करते आणि प्रचलनाचे अवयव असल्याने त्याचे वर्गीकरण पूर्वी आदिजीव प्राणी या वर्गात करण्यात येत असे.
- कवक या वर्गाचे पोषण मृतोपजीवी असल्याने त्याचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे.
- पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती, पेशी संघटन, जीवन पद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात.
- यामुळे व्हिटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही अचूक ठरते.
(आ) विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा.
- विषाणू हे सूक्ष्मजीव साधारणतः 10 nm ते 100 nm इतक्या सूक्ष्मतेचे असतात. त्यांना सजीव-निर्जीवांच्या सीमारेषेत धरले जाते. विषाणू हे जीवाणूंच्या 10 ते 100 पटींनी लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात.
- सामान्यतः त्यांना सजीव मानले जात नाही, परंतु ते स्वतःप्रमाणे प्रतिकृती तयार करू शकतात.
- विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात असतात. डी-ऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल किंवा रायबोन्युक्लिक आम्ल यापासून विषाणू बनतात. ते लांबलचक रेणू असून त्यांना प्रथिनांचे आवरण असते.
- विषाणू केवळ वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशींतच राहू शकतात. ज्या वेळी विषाणू संसर्ग करतात, त्या वेळी ते या यजमान पेशींच्या मदतीने स्वतःची प्रथिने तयार करून
- स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात.
- त्यानंतर यजमान पेशींचा नाश होतो व विषाणूंच्या प्रतिकृती मुक्त होतात. हे मुक्त विषाणू संसर्गजन्य असल्याने ते नव्या पेशींना संसर्ग करतात.
(इ) कवकांचे पोषण कसे होते?
बहुसंख्य कवकांतील पोषणपद्धती मृतोपजीवी आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर कवके जगतात. कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते.
(ई) मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो?
- मोनेरा या सजीव सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असतात.
- त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात.
- हे सर्व सजीव आदिकेंद्रकी असून त्यांत पटलबद्ध केंद्रक किंवा पेशीअंगके नसतात.
- या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो.
उदाहरणे : जीवाणू क्लोस्ट्रिडिअम टिटॅनी, व्हायब्रीओ कॉलेरी, ट्रेपोनेमा पॅलीडम, स्ट्रेप्टोकोकस न्युमोनि, लेजीओनेला न्युमोनि, सालमोनेला टायफी, स्टॅफायलोकॉकस ऑरिअस, क्लोस्ट्रीडीअम बोट्युलीनम.
प्रश्न 6. ओळखा पाहू मी कोण ?
(अ) मला केंद्रक, प्रद्रव्य पटल किंवा पेशीअंगके नसतात.
मोनेरामधील सजीव.
(आ) मला केंद्रक, प्रद्रव्य पटल युक्त पेशीअंगके असतात.
प्रोटिस्टामधील आदिजीव.
(इ) मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते.
बुरशी, कवकाचा एक प्रकार.
(ई) माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते.
जीवाणू. काही आदिजीव.
(उ) मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
विषाणू.
(ऊ) माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे.
शैवाल.
प्रश्न 7. अचूक आकृत्या काढून नावे द्या.
(अ) जिवाणूंचे विविध प्रकार
(आ) पॅरामेशिअम
(इ) बॅक्टेरिओफेज
प्रश्न 8. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा.
जिवाणू, कवक, विषाणू, शैवाल
विषाणू → जीवाणू → कवक → शैवाल.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -1-सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण-नोट्स
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ - 2 : आरोग्य व रोग - Online Solutions |