Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-12-आम्ल, आम्लारी ओळख-Maharashtra Board

आम्ल, आम्लारी ओळख

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -12- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा.

द्रावण दर्शकात झालेला बदल आम्ल/आम्लारी
लिटमस फिनॉल्फ्थॅलिन मिथिल ऑरेंज
1   बदल नाही.   -------
2     नारंगी रंग बदलून लाल झाला. ----------
3 लाल लिटमस निळा झाला.     -----------
उत्तर :

द्रावण दर्शकात झालेला बदल आम्ल/आम्लारी
लिटमस फिनॉल्फ्थॅलिन मिथिल ऑरेंज
1   बदल नाही.   आम्ल
2     नारंगी रंग बदलून लाल झाला. आम्ल
3 लाल लिटमस निळा झाला.     आम्लारी

प्रश्न 2. सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा.

H2SO4, Ca(OH)2, HCl, NaOH, KOH, NH4OH

उत्तर :

  • H2SO4 - सल्फ्युरिक आम्ल
  • Ca(OH)2 - कॅल्शिअम हायड्रॉक्साइड
  • HCI - हायड्रोक्लोरिक आम्ल
  • NaOH - सोडिअम हायड्रॉक्साइड
  • KOH - पोटॅशिअम हायड्रॉक्साइड
  • NH4OH - अमोनिअम हायड्रॉक्साइड

प्रश्न 3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योग धंद्यात सर्वांत जास्त महत्त्व का आहे?

उत्तर :

सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योग धंद्यात सर्वांत जास्त महत्त्व असण्याचे कारण याचा वापर अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये आवश्यक प्रतिसादक म्हणून वापरले जाते.

उदाहरणार्थ :

  • अमोनिअम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट ऑफ लाइम यांसारख्या खतांच्या निर्मितीत होतो.
  • सल्फ्युरिक आम्लाचा वापर हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, फॉस्फरिक आम्ल, ईथर, मेटल सल्फेटस् यांच्या निर्मितीत होतो.
  • धातूंना शुद्ध करण्यासाठी, विशेषतः तांबे आणि जस्त शुद्धीकरणात हे आम्ल अत्यंत उपयुक्त ठरते.
  • तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठीदेखील होतो.

प्रश्न 4. उत्तरे द्या.

() क्लोराइड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे?

उत्तर :

क्लोराइड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे.

() एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे?

उत्तर :

खडकात धातूंचे कार्बोनेट हे संयुग आहे.

() प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल?

उत्तर :

बाटलीतील द्रव्यात निळ्या लिटमसचा कागद टाकला असता जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे असे सिद्ध होते.

प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() आम्ल आम्लारीतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

आम्ल आम्लारी
अधातूंच्या ऑक्साइडांपासून आम्ले मिळतात. धातूंच्या ऑक्साइडांपासून आम्लारी मिळतात.
आम्लांमध्ये H (हायड्रोजन) हा प्रमुख घटक असतो व या घटकामुळे या संयुगांना आम्लधर्म प्राप्त होतो. आम्लारीमध्ये OH (हायड्रॉक्सिल) प्रमुख घटक असतो व त्यामुळे या संयुगांना आम्लारिधर्मी प्राप्त होतो.
आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो.
आम्ले चवीला आंबट असतात. आम्लारी चवीला तुरट, कडवट असतात.

() दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही?

उत्तर :

सर्वसाधारणपणे दर्शक ही सेंद्रिय संयुगे असल्याने दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही.

() उदासिनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात?

उत्तर :

उदासिनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात.

() आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते ?

उत्तर :

आम्लांचे औद्योगिक उपयोग विविध आहेत आणि हे रसायने अनेक उद्योगांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. काही महत्त्वाचे औद्योगिक उपयोग खालीलप्रमाणे आहेत:

सल्फ्युरिक आम्ल (H₂SO₄):

  • खते उत्पादन: फॉस्फेट खते तयार करण्यासाठी.
  • पेट्रोलियम उद्योग: कच्च्या तेलाचे शुद्धीकरण.
  • बॅटरी निर्मिती: बॅटरीमध्ये विद्युतद्रव्य (इलेक्ट्रोलाइट) म्हणून वापरले जाते.

हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl):

  • धातू शुद्धीकरण: स्टील निर्मितीमध्ये धातूंवरून ऑक्साइड हटवण्यासाठी.
  • अन्न प्रक्रिया: विविध खाद्य पदार्थांच्या निर्मितीत.

नायट्रिक आम्ल (HNO₃):

  • खतांचे उत्पादन: अमोनियम नायट्रेट तयार करण्यासाठी.
  • विस्फोटक: टीएनटी आणि अन्य विस्फोटके तयार करण्यासाठी.

असिटिक आम्ल (CH₃COOH):

  • रासायनिक संश्लेषण: विविध रसायनांचे उत्पादन.
  • खाद्य उद्योग: प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून आणि फ्लेव्हरिंग एजंट म्हणून.

साइट्रिक आम्ल (C₆H₈O₇):

  • खाद्य आणि पेय: अन्नसंवर्धक आणि फ्लेव्हरिंग एजंट म्हणून.
  • सौंदर्यप्रसाधने: त्वचेला साफ करण्यासाठी आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये.

ऑक्झालिक आम्ल (C₂H₂O₄):

  • धातू साफ करणे: धातूंवरचे गंज आणि डाग हटवण्यासाठी.
  • कापड उद्योग: कपड्यांवरील डाग काढण्यासाठी.

प्रश्न 6. रिकाम्या जागा भरा.

(1) आम्लातील प्रमुख घटक....... आहे.

उत्तर :

आम्लातील प्रमुख घटक H+ आयन आहे.

(2) आम्लारीतील प्रमुख घटक....... आहे.

उत्तर :

आम्लारीतील प्रमुख घटक OH- आयन आहे.

(3) टार्टारिक हे ....... आम्ल आहे.

उत्तर :

टार्टारिक हे सौम्य आम्ल आहे.

प्रश्न 7. जोड्या लावा.

गट गट
1. चिंच a. ॲसेटिक आम्ल
2. दही b. सायट्रिक आम्ल
3. लिंबू c. टार्टारिक आम्ल
4. व्हिनेगर d. लॅक्टिक आम्ल
उत्तर :

गट गट
1. चिंच टार्टारिक आम्ल
2. दही लॅक्टिक आम्ल
3. लिंबू  सायट्रिक आम्ल
4. व्हिनेगर ॲसेटिक आम्ल

प्रश्न 8. चूक की बरोबर ते लिहा.

() धातूंची ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात.

उत्तर :

बरोबर.

() मीठ आम्लधर्मी आहे.

उत्तर :

चूक : (मीठ उदासीन आहे.)

() क्षारांमुळे धातूचे क्षरण होते.

उत्तर :

चूक : (आम्ल व आम्लारीमुळे धातूचे क्षरण होते.)

() क्षार उदासीन असतात.

उत्तर :

बरोबर.

प्रश्न 9. पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी उदासीन या गटांत वर्गीकरण करा.

HCl, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3

उत्तर :

पदार्थ गट
HCl, H2SO4, HNO3. आम्लधर्मी
CaO, MgO, Na2CO3. आम्लारीधर्मी
H2O, NaCl, KCI. उदासीन

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-12-आम्ल, आम्लारी ओळख - नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-12-आम्ल, आम्लारी ओळख - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 11 : मानवी शरीर व इंद्रिय संस्था  -  Online Solutions

Next Chapter : पाठ - 13 : रासायनिक बदल व रासायनिक बंध -  Online Solutions

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *