प्रकाशाचे परावर्तन
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -16- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला ……….. म्हणतात.
सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात.
(आ) लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे ……….. परावर्तन असते.
लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते.
(इ) कॅलिडोस्कोपचे कार्य ……… गुणधर्मावर अवलंबून असते.
कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते.
प्रश्न 2. आकृती काढा.
दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 900 चा कोन करतात. एका आरशावर आपाती किरण 300 चा आपतन कोन करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा.
प्रश्न 3. ‘आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही’, या वाक्या चे स्पष्टीकरण सकारण कसे कराल ?
वस्तूंपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणांस दिसू लागतात. अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये प्रकाश शिरत नाही. परिणामी अंधाऱ्या खोलीत दृष्टीची संवेदना होत नाही, म्हणजेच आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू पाहू शकत नाही.
प्रश्न 4. नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
- प्रकाशाच्या नियमित परावर्तनात सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपर्तन कोन व परावर्तन कोन समान मापांचे असतात. त्यामुळे परावर्तित किरण सुद्धा परस्परांस समांतर असतात.
- प्रकाशाच्या अनियमित परावर्तनात खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापांचे नसल्याने परावर्तन कोनही समान मापांचे नसतात. परिणामी परावर्तित किरण परस्परांस समांतर नसतात, तर ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात.
प्रश्न 5. खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा.
आपाती किरण, परावर्तन कोन, स्तंभिका, आपात बिंदू, आपतन कोन, परावर्तित किरण.
प्रश्न 6. खालील प्रसंग अभ्यासा.
स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना.
खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा.
(अ) प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचा काही संबंध आहे का ?
होय. प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे.
(आ) यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा.
- संथ पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात लहरी निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार लक्षात येतात.
- संथ पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते, तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते.
(इ) प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ?
होय. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात.
प्रश्न 7. उदाहरणे सोडवा.
(अ) सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन 400 चा असेल, तर आपतन कोन व परावर्तन
कोनांची मापे काढा.
सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन = 40°
परावर्तन कोन, r = परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन = 90°- 40° = 50°
∴ आपतन कोन, i = r = 50°.
(आ) आरसा व परावर्तित किरण यांमधील कोन 230 असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल ?
सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन = 23°
परावर्तन कोन, r = परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन = 90°- 23° = 67°
∴ आपतन कोन, i = r = 67°.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-16- प्रकाशाचे परावर्तन - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-16- प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 15 : ध्वनी - Online Solutions Next Chapter : पाठ - 17 : मानवनिर्मित पदार्थ - Online Solutions |