Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-18- परिसंस्था-Maharashtra Board

परिसंस्था

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -18- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

() हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील............... घटक होय.

(भौतिक, सेंद्रिय , असेंद्रिय )

उत्तर :

हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय.

() परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे ............... परिसंस्थेची उदाहरणे आहे.

(भूतल, जलीय, कृत्रिम)

उत्तर :

परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे जलीय परिसंस्थेची उदाहरणे आहे.

() परिसंस्थेमध्येमानवप्राणी...... गटात मोडतो.

(उत्पादक, भक्षक, विघटक)

उत्तर :

परिसंस्थेमध्ये ‘मानव’ प्राणी भक्षक गटात मोडतो.

प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा.

उत्पादक परिसंस्था
. निवडुंग 1. जंगल
. पाणवनस्पती 2. खाडी
. खारफुटी 3. जलीय
. पाईन 4. वाळवंटीय
उत्तर :

(1) निवडुंग - वाळवंटीय

(2) पाणवनस्पती -जलीय

(3) खारफुटी - खाडी

(4) पाईन - जंगल.

प्रश्न 3. माझ्या विषयी माहिती सांगा.

() परिसंस्था

उत्तर :

  • परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरक्रियांनी तयार होणारी रचना आहे.
  • परिसंस्थेतील सर्व सजीव म्हणजे जैविक घटक आणि त्यांच्या सभोवतालच्या अधिवासात असणारे तापमान, ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइड, मृदा व त्यातील क्षार इत्यादी अजैविक घटक या दोन्हीमध्ये सतत आंतरक्रिया होत असतात. या अन्योन्य संबंधातूनच वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो. प्र
  • त्येक परिसंस्थेतील उत्पादक म्हणजे वनस्पती, प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात.
  • विघटक जीवाणू, कवक आणि इतर सूक्ष्मजीव मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना असेंद्रिय स्वरूपात पुन्हा निसर्गात पाठवतात.
  • चांगल्या अवस्थेतील परिसंस्था अशा प्रकारे एकमेकांशी समतोल प्रमाणात राहतात.

() बायोम्स

उत्तर :

पृथ्वी वरील काही भागांत बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना ‘बायोम्स’ (Biomes) असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो.

पृथ्वी वर दोन मुख्य प्रकारच्या ‘बायोम्स’ आढळतात.

  • भू-परिसंस्था (Land Biomes) : भू-परिसंस्था या केवळ भूचर वनस्पती आणि प्राण्यांचे पोषण करणाऱ्या असतात. त्यात विविध प्रकार आहेत. उदा., गवताळ प्रदेश, सदाहरित जंगले, वाळवंटी प्रदेश, टुंड्रा, तैगा, विषुववृत्तीय जंगले इत्यादी
  • जलीय परिसंस्था (Aquatic Biomes) : जलीय बायोम्समध्ये गोड्या पाण्याची परिसंस्था, सागरी परिसंस्था आणि खाडीची परिसंस्था या परिसंस्थांचा समावेश होतो.

() अन्नजाळे

उत्तर :

बहुतेक परिसंस्थेतील अन्नसाखळ्या गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे जटिल स्वरूपातील अन्नजाळी निर्माण होतात. कोणत्याही परिसंस्थेत अन्नसाखळी सरळ आणि एकरेषीय नसते. परंतु त्यात खूप परस्परावलंबी नाती असतात. हे संबंध खूप जटिल असतात. भक्ष्य खाणारा भक्षक एखादे वेळी दुस-याच भक्षकाचे भक्ष्य ठरू शकतो. अन्नजाळे अन्नसाखळ्या (Food Chains) यांचा समूह असतात.

  • प्राथमिक उत्पादक (Primary Producers): यामध्ये वनस्पती, शैवाल व काही सूक्ष्मजीव (जसे की हरितसूत्रके) यांचा समावेश होतो. हे जीव सूर्यप्रकाशाच्या मदतीने फोटोसिंथेसिस करून ऊर्जा तयार करतात.
  • प्राथमिक उपभोक्ता (Primary Consumers): हे जीव शाकाहारी (Herbivores) असतात, जे प्राथमिक उत्पादकांवर पोषणासाठी अवलंबून असतात. उदा. हरण, गायी, भोपळे इत्यादी.
  • द्वितीयक उपभोक्ता (Secondary Consumers): हे जीव मांसाहारी (Carnivores) असतात आणि प्राथमिक उपभोक्त्यांवर पोषणासाठी अवलंबून असतात. उदा. लांडगा, वाघ इत्यादी.
  • तृतीयक उपभोक्ता (Tertiary Consumers): हे जीव तृतीय स्तरावर असतात आणि द्वितीयक उपभोक्त्यांवर पोषणासाठी अवलंबून असतात. उदा. गरुड, बिबटे इत्यादी.
  • अपघटक (Decomposers): हे जीव मृत सजीवांच्या अवशेषांवर पोषणासाठी अवलंबून असतात आणि त्यांना अपघटन (Decomposition) करून नवनिर्मितीयोग्य पदार्थात परिवर्तित करतात. उदा. जंतू, कवक इत्यादी.

अन्नजाळे हा परिसंस्थेतील जैविक संतुलनाचा एक महत्वाचा घटक आहे.

प्रश्न 4. शास्त्रीय कारणे द्या.

() परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

उत्तर :

वनस्पती हे उत्पादक असतात. प्रकाश-संश्लेषण करून ते स्वतः अन्ननिर्मिती करतात. सौर ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करताना वनस्पती मातीतून असेंद्रिय क्षार आणि पाणी यांचे शोषण करतात व सेंद्रिय अन्नपदार्थ बनवतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

() मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात.

उत्तर :

  • जेव्हा मोठी धरणे बांधली जातात, तेव्हा मुळातील भू-स्वरूप बदलले जाते. तेथील झाडे तोडली जातात. या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात. बऱ्याचशा प्रजाती अशा कारणांनी नष्ट झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वनस्पती आणि प्राणी यांची हानी होते.
  • साठवलेल्या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाची शक्यता वाढते. धरणे बांधताना तेथील माणसांच्या वसाहती आणि शेतीवाडी नष्ट होते. धरणांमुळे नदीच्या खालच्या बाजूच्या पाण्याच्या प्रवाहात घट होते. त्यामुळे अगोदर असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात.

अशा रितीने मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात.

() दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

उत्तर :

खूप वर्षांपूर्वी दुधवा जंगलात एकशिंगी गेंड्यांचे वास्तव्य होते. परंतु खूप वर्षे त्यांची शिकार झाल्यामुळे येथील गेंडे नष्ट झाले. या गेंड्यांचे वास्तव्य पुन्हा होण्यासाठी त्यांचे पिंजऱ्यात प्रजनन करून त्या पिल्लांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन्य जीवन मौल्यवान असते. म्हणून त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी असे प्रयत्न करण्यात आले.

प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले?

उत्तर :

लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर अनेक परिणाम होऊ शकतात. लोकसंख्या वाढल्यामुळे परिसंस्थेतील संतुलन बिघडते आणि विविध जैविक व अजैविक घटकांवर परिणाम होतो.

मानवी लोकसंख्या अफाट वेगाने वाढते. त्या प्रमाणात इतर प्राण्यांची संख्या सीमित राहते.

मानव हा कोणत्याही परिसंस्थेचा सर्वोच्च भक्षक असतो. त्याला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गरजा देखील परिसंस्थाच पुरवत असते.

  • नैसर्गिक संसाधनांची कमी: वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक अन्न, पाणी, ऊर्जा आणि इतर संसाधनांची गरज भासते, ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अधिक वापर होतो आणि काही ठिकाणी त्या संसाधनांची कमी होते.
  • वनांचा नाश: शहरीकरण, शेती आणि इतर मानवी उपक्रमांसाठी अधिक जमीन आवश्यक असल्यामुळे वृक्षतोड आणि वनांचा नाश होतो. यामुळे वनस्पतींना आणि वन्यप्राण्यांना रहिवासी जागांची कमी पडते.
  • प्रदूषण: वाढत्या लोकसंख्येमुळे जल, वायू, आणि माती प्रदूषण वाढते. यातून प्राण्यांच्या आरोग्यावर आणि मानवांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
  • जैवविविधता कमी: परिसंस्थेतील संतुलन बिघडल्यामुळे अनेक प्रजातींना संकट निर्माण होते आणि त्यांची संख्या कमी होते. काही प्रजातींना तर नष्ट होण्याचा धोका सुद्धा असतो.
  • हवामान बदल: मानवांच्या उपक्रमांमुळे वातावरणात ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे जागतिक तापमान वाढते आणि हवामानातील बदल दिसून येतात.
  • समुद्री परिसंस्था प्रभावित: समुद्रातील संसाधनांवर अधिक दबाव येतो, ज्यामुळे समुद्री परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पती प्रभावित होतात.
  • पाण्याची कमतरता: जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवते.

या सा-यांचा परिणाम परिसंस्थेवर ताण निर्माण करतो. मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घनकचरा देखील निर्माण करते.

() परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे?

उत्तर :

  • ज्या वेळी लोकांना त्यांच्या गावात पुरेसे अन्न, पैसे किंवा इतर सोयी-सवलती मिळत नाहीत, अशा वेळी ते सुख-सोयींकरिता शहराकडे स्थलांतर करतात.
  • शहरामध्ये कारखाने, उद्योग इत्यादी असल्याने त्यांना उपजीविकेची चांगली साधने मिळतात. या शोधात दररोज अनेक लोक शहरांकडे येतात. त्यामुळे नागरीकरण होते.
  • शहरातील वाढीव लोकसंख्येमुळे येथे सर्व सोयीसुविधांवर ताण येतो. निवासाच्या जागांची कमतरता भासते. त्यामुळे येथे शेतजमीन, नजीकची जंगले, खाजण जमिनी, गवताळ प्रदेश, कांदळवने किंवा जलाशय अशाही ठिकाणी भराव घालून राहण्यासाठी वापर केला जातो. या प्रयत्नांत नैसर्गिक परिसंस्था नष्ट होतात.
  • विकास कामांसाठी जंगले हटवली जातात. जमिनीचा वापर वेगळ्याच कारणांसाठी केल्यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. वनस्पती आणि प्राणी यांच्या जाती नाहीशा होतात. वन्यप्राणी मानव संघर्ष सुरू होतात.

अशा रितीने परिसंस्थेचा संपूर्ण व्हास होतो.

() नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात?

उत्तर :

  • काही शेजारी राष्ट्रांमध्ये जमीन, पाणी, खनिजसंपत्ती अशा साधनसंपदांवरून वाद निर्माण होतात. काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहांत स्पर्धा निर्माण होते.
  • मतभेद विकोपाला गेल्यामुळे युद्धाला तोंड फुटते. धार्मिक आणि वांशिक कारणांनी देखील युद्धे केली जातात.
  • युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बाँब वर्षाव व सुरुंग स्फोट केले जातात. त्यामुळे जागतिक पातळीवर शांतता नष्ट होते. जीवितहानी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात. कधी कधी त्या नष्ट सुद्धा होतात.

() परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा.

उत्तर :

  • हवा, पाणी, मृदा, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादी अजैविक घटकांचा परिसंस्थेतील वनस्पती, प्राणी आणि जीवाणू अशा जैविक घटकांवर परिणाम होतो.
  • या जैविक घटकांची संख्या देखील अजैविक घटकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
  • हे जैविक घटक, अजैविक घटकांचे शोषण करतात किंवा परिसंस्थेत पुन्हा सोडतात. त्यामुळे अजैविक घटकांचे प्रमाण, जैविक घटकांमुळे घटत किंवा वाढत असते.
  • प्रत्येक जैविक घटक एखाद्या विशिष्ट अजैविक घटकांशी सतत आंतरक्रिया करीत असतो. तसेच तो इतर जैविक घटकांशी देखील आंतरक्रिया करीत असतो.

() सदाहरित जंगल गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा.

उत्तर :

सदाहरित जंगल गवताळ प्रदेश
पृथ्वीचा सुमारे 7% भूभाग हा सदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे. पृथ्वीचा सुमारे 30% भूभाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे.
पृथ्वीवरचे जवळपास निम्मे भूचर प्राणी आणि

जमिनीवरच्या वनस्पती सदाहरित जंगलांमध्येच असतात.

बहुसंख्य चरणारे प्राणी गवताळ प्रदेशात असतात.
विषुववृत्तीय सदाहरित जंगले ही घनदाट आणि अनेक थरांची असतात. गवताळ प्रदेशात अतिशय उंच गवत वाढते. ही मुख्यत्वे रान-गवते असून एखादे झाड देखील या प्रदेशात दिसते.
सदाहरित जंगलांच्या प्रदेशात खूप जास्त पाऊस असतो. गवताळ प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढविण्यासाठी पुरेसे नसते,
विषुववृत्तीय प्रदेशात अशा प्रकारची जंगले आढळतात. पृथ्वीवर अनेक ठिकाणी गवताळ प्रदेश असतात.

[/spoiler]

प्रश्न 6. खालील चित्रांचे वर्णन लिहा.

उत्तर :

  • पहिल्या चित्रात वाळवंटी परिसंस्था दिसत आहे. दुसऱ्या चित्रात जंगलातील परिसंस्था दाखवली आहे आणि त्यात एक तलाव म्हणजेच जलीय परिसंस्थादेखील दिसत आहे.
  • वाळवंटी परिसंस्थेत निवडुंग, पाम वृक्ष, कमी पाऊस आणि वालुकामय मृदा असते. येथे वनसृष्टी खूपच कमी असते. येथील भक्षकदेखील कमी संख्येने असतात. उंट हा प्राथमिक भक्षक असतो आणि निवडुंग पाण्याच्या कमतरतेतही जगू शकतो.
  • जंगलातील परिसंस्थेत हत्ती, वाघ, धनेश (हॉर्नबिल) हा पक्षीदेखील आणि जलीय परिसंस्था दिसते. येथे पर्जन्यमान अधिक असते, ज्यामुळे विविध पाणथळ जागा आणि अन्नसाखळ्या तयार होतात. पक्षी पाण्यातील माशांचे भक्ष्य करतात, जंगली श्वापदे पाणी पिण्यासाठी येतात. गवत, झाडे उत्पादक आहेत, लहान मासे प्राथमिक भक्षक, हत्ती शाकाहारी प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक आणि गरुड व वाघ तृतीय भक्षक आहेत.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-18- परिसंस्था - नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-18- परिसंस्था - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 17 : मानवनिर्मित पदार्थ  -  Online Solutions

Next Chapter : पाठ - 19 : ताऱ्यांची जीवनयात्रा. -  Online Solutions

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *