Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -3-बल व दाब-Maharashtra Board

बल व दाब

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -3- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) SI पद्धतीत बलाचे एकक ............... हे आहे.

(डाईन, न्युटन, ज्युल )

उत्तर :

SI पद्धतीत बलाचे एकक न्युटन हे आहे.

(आ) आपल्या शरीरावर हवेचा दाब ................ दाबा इतका असतो.

(वातावरणीय, समुद्राच्या तळावरील, अंतराळातील)

उत्तर :

आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दाबा इतका असतो

(इ) एखाद्या वस्तुकरिता वेगवेगळ्या .........द्रवात प्लावक बल ......... असते.

(एकसारखे, घनतेच्या, भिन्न , क्षेत्रफळाच्या )

उत्तर :

एखाद्या वस्तुकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते

(ई) दाबाचे SI पद्धतीतील एकक ...........आहे.

(N/m3, N/m2, kg/m2, Pa/m2)

उत्तर :

दाबाचे SI पद्धतीतील एकक N/m2 आहे.

प्रश्न 2. सांगा पाहू माझा जोडीदार !

‘अ’ गट ‘ब’ गट
(1) द्रायू जास्त दाब
(2) धार नसलेली सुरी वातावरणीय दाब
(3) अणकुचीदार सुई विशिष्ट गुरुत्व
(4) सापेक्ष घनता कमी दाब
(5) हेक्टो पास्कल सर्व दिशांना सारखा दाब
उत्तर :

(1) द्रायू  - सर्व दिशांना सारखा दाब

(2) धार नसलेली सुरी - कमी दाब

(3) अणकुचीदार सुई  - जास्त दाब

(4) सापेक्ष घनता  - विशिष्ट गुरुत्व

(5) हेक्टो पास्कल - वातावरणीय दाब

प्रश्न 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिला. तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल? कारण लिहा.

उत्तर :

पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिल्यास तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल.

प्लास्टिकचा ठोकळा पूर्णपणे पाण्यात असताना त्यावर प्रयुक्त झालेल्या प्लावक बलाचे परिमाण प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने, ठोकळ्याच्या वजनाच्या परिमाणापेक्षा जास्त असते. परिणामी ठोकळ्यावरील एकूण बल वरच्या दिशेने असते. त्यामुळे तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल.

(आ) माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते ?

उत्तर :

  • ठरावीक बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो.
  • अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकांच्या भागांचे क्षेत्रफळ वाढते. परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाहीत.

(इ) आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो? तो आपल्याला का जाणवत नाही?

उत्तर :

आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे 101 x 103 Pa इतका असतो. आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते. यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो. त्यामुळे हवेचा दाब (भार) प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही.

प्रश्न 4. असे का घडते ?

(अ) समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते.

उत्तर :

वस्तूवरील प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. परिणामी समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते. म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते.

(आ) धारदार चाकूने फळे सहज कापता येतात.

उत्तर :

बल ज्या क्षेत्रफळावर कार्यरत असते, ते क्षेत्रफळ कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो. बोथट सुरीपेक्षा धारदार सुरी वापरल्यास प्रयुक्त बल खूप कमी क्षेत्रफळावर क्रिया करते. परिणामी धारदार सुरीने भाजी, फळे चिरणे सोपे जाते. ठरावीक बल लावले असता, दाब ∝ 1/ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ.

(इ) धरणाची भिंत तळाशी रुंद असते.

उत्तर :

  • द्रवाचा दाब द्रवातील खोलीनुसार वाढत जातो. त्यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्यापेक्षा तळाशी खूपच जास्त असतो.
  • या प्रचंड दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नयेत अथवा ती पडू नये, यासाठी ती
  • वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत बनवलेली असते.

(ई) थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात.

उत्तर :

  • विराम अवस्थेतील बसमध्ये प्रवासी उभे असताना बस एकदम चालू झाल्यास त्यांच्या पायांना ते बसशी निगडित असल्याने, बसची गती प्राप्त होते.
  • पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीच्या विराम अवस्थेत राहतो. त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात.

प्रश्न 5. खालील सारणी पूर्ण करा

(i)

वस्तुमान (kg) आकारमान (m3) घनता (kg/m3)
350 175 --
-- 190 4
उत्तर :

वस्तुमान (kg) आकारमान (m3) घनता (kg/m3)
350 175 2
760 190 4

घनता = वस्तुमान / आकारमान हे सूत्र वापरून

(ii)

धातूची घनता (kg/m3) पाण्याची घनता (kg/m3) सापेक्ष घनता
-- 103 5
8.5 x 103 103 --
उत्तर :

धातूची घनता (kg/m3) पाण्याची घनता (kg/m3) सापेक्ष घनता
5 x 103 103 5
8.5 x 103 103 8.5

सापेक्ष घनता = धातूची घनता / पाण्याची घनता हे सूत्र वापरून

(iii)

वजन (N) क्षेत्रफळ (m2) दाब (Nm-2)
-- 0.04 20000
1500 500 --
उत्तर :

वजन (N) क्षेत्रफळ (m2) दाब (Nm-2)
800 0.04 20000
1500 500 3

दाब = वजन/क्षेत्रफळ हे सूत्र वापरून

प्रश्न 6. एका धातूची घनता 10.8 x 103 kg/m3 आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा.

उत्तर :

दिलेले : धातूची घनता = 10.8 x 103 kg/m3, पाण्याची घनता = 103 kg/m3, धातूची सापेक्ष घनता = ?

धातूची सापेक्ष घनता = धातूची घनता/पाण्याची घनता = (10.8 x 103)/103 = 10.8

धातूची सापेक्ष घनता = 10.8 kg/m3

प्रश्न 7. एका वस्तुचे आकारमान 20 cm3 आणि वस्तुमान 50 g आहे. पाण्याची घनता 1 g cm-3 तर ती वस्तु पाण्यावर तरंगेल की बुडेल?

उत्तर :

दिलेले : m = 50 g, V = 20 cm3, ρ (पाणी) = 1 g/cm3, वस्तु पाण्यात तरंगेल का बुडेल?,

ρ (वस्तु) = m/V = 50/20 = 5/2  g/cm

वस्तुची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने वस्तु पाण्यात बुडेल.

प्रश्न 8. एका 500 g वस्तुमानाच्या, प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 cm3 इतके आहे. पाण्याची घनता 1 g cm-3 असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल ? खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल?

उत्तर :

दिलेले : m = 500 g, V = 350 cm3, ρ (पाणी) = 1 g/cm3, खोके पाण्यात तरंगेल का

बुडेल?, खोक्याने बाजूस सारलेल्‍या पाण्याचे वस्तुमान = ?

खोक्याची घनता = m/V = 500/350 = 10/7  g/cm3

खोक्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने ते खोके पाण्यात बुडेल.

खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे आकारमान (V) = खोक्याचे आकारमान = 350 cm3

आता, घनता (ρ) = m/V ,  ∴ m = ρV

∴ खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान = 1 x 350 = 350 g

PDF - Notes Solutions, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -3-बल व दाब-नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -3-बल व दाब-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 2 : आरोग्य व रोग  -  Online Solution

Next Chapter : पाठ - 4 : धाराविद्युत आणि चुंबकत्व -  Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *