Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -4-धाराविद्युत आणि चुंबकत्व-Maharashtra Board

धाराविद्युत आणि चुंबकत्व

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -4- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. रिकाम्या जागी खालील शब्द समूहातील योग्य शब्द लिहा.

(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V)

() धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते, याचे कारण .....

उत्तर :

धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते, याचे कारण गुरूत्वाकर्षण

() एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स .......... विभव असलेल्या बिंदूपासून ...... विभव असलेल्या

बिंदूकडे वाहतात.

उत्तर :

एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात.

() विद्युतघटाच्या धन अग्र ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ....... होय.

उत्तर :

विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय.

() 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर

...... V इतके असेल.

उत्तर :

1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर 4.5V इतके असेल.

() एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती ..... निर्माण करते.

उत्तर :

एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते.

प्रश्न 2. 3 कोरड्या विद्युतघटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे. तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा.

उत्तर :

प्रश्न 3. एका विद्युतपरिपथात एक बॅटरी एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसविले आहेत. जर बल्ब प्रकाशित होत नसेल, तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल ?

उत्तर :

  • बल्बमधील कुंतल (filament) दिसू शकत असल्यास ते अखंड आहे का तुटलेले आहे हे तपासा.
  • विद्युतघट योग्य प्रकारे जोडलेले आहेत, की अयोग्य प्रकारे जोडलेले आहेत, ते तपासा.

जोडणी अयोग्य असल्यास, एकूण विभवांतर 2 V+ (-2 V) = शून्य असेल.

प्रश्न 4. प्रत्येकी 2 V विभवांतराचे विद्युतघट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत. दोन्ही जोडण्यांत बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल?

उत्तर :

(i) तीन घटांची एकसर जोडणी : एकूण विभवांतर = 2V + 2V + 2V = 6V.

(ii) चार घटांची एकसर जोडणी :  एकूण विभवांतर = 2V + 2V + 2V + 2V = 8 V.

प्रश्न 5. कोरड्या विद्युतघटाची रचना, कार्य उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या साहाय्याने करा.

उत्तर :

कोरड्या विद्युतघटाची रचना :

कोरडा विद्युतघटात त्याचे बाहेरचे आवरण व त्याच्या आत एक पांढरट धातूचे आवरण असते. हे पांढरट धातूचे आवरण जस्त (Zn) धातूचे आवरण होय. हेच घटाचे ऋण टोक.

जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी (Electrolyte) भरलेली असते.

विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ऋणप्रभारित आयन असतात. त्यांच्यामार्फत विद्युतवहन होते.

ही अपघटनी म्हणजे ZnCl2 (झिंक क्लोराइड) आणि NH4CI (अमोनिअम क्लोराइड) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो.

घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते. हे घटाचे धन टोक असते.

कांडीच्या बाहेरील भागात MnO2 (मँगनीज डायऑक्साइड) ची पेस्ट भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर (graphite rod, zinc) विद्युतप्रभार तयार होतो व परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो.

कार्य उपयुक्तता :

  • या विद्युतघटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते. म्हणून मोटा विदयुतप्रवाह यातून मिळवता येत नाही.
  • द्रवपदार्थांचा वापर करणाऱ्या विद्युतघटांच्या तुलनेत त्यांची साठवण कालमर्यादा (Shelf life) अधिक असते.
  • कोरडे विद्युतघट वापरायला सोयीचे असतात; कारण ते उभे, आडवे, तिरपे, कसेही ठेवता येतात व ते रेडिओ मंच, भिंतीवरील घड्याळ, विजेरी यांसारख्या चल साधनांमध्येही सहजपणे वापरता येतात.

प्रश्न 6. विद्युतघंटेची रचना कार्य आकृतीच्या साहाय्याने वर्णन करा.

उत्तर :

विद्युत घंटेचे कार्य धाराविद्युतच्या चुंबकीय परिणामावर आधारित आहे.

विद्युत घंटेची रचना :

  • आकृती मध्ये विद्युत घंटेची रचना विद्युत परिपथासह दाखवली आहे.
  • यात एका लोखंडी तुकड्यावर तांब्याची तार कुंतलाच्या स्वरूपात गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युतचुंबक म्हणून कार्य करते.
  • या विद्युतचुंबकाजवळ एक लोखंडी पट्टी टोलासहित बसवलेली असते व त्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो.
  • परिपथातील कळ वापरून परिपथ पूर्ण केल्यावर, स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो.
  • परिणामी कुंतल विद्युतचुंबक होऊन त्याकडे लोखंडी पट्टी खेचली जाते. त्यामुळे टोला घंटेवर आपटून नाद निर्माण होतो.
  • मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटून विद्युतप्रवाह खंडित होतो. परिणामी कुंतलाचे विद्युत चुंबकत्व नष्ट होते. त्यामुळे लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. परिणामी लगेच विद्युतप्रवाह सुरू होऊन पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आपटून नाद निर्माण होतो.
  • विद्युत घंटेतील लवचीक लोखंडी पट्टीमुळे विद्युत परिपथ पूर्ण होणे व खंडित होणे या क्रिया वारंवार व जलद गतीने होतात व परिपथातील कळ बंद (Closed) असेपर्यंत घंटा खणखणत राहते. कळ वापरून परिपथातील विद्युतप्रवाह बंद केल्यावर घंटेचा खणखणाट थांबतो.

PDF - Notes Solutions, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -4-धाराविद्युत आणि चुंबकत्व-नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -4-धाराविद्युत आणि चुंबकत्व-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 3 : बल व दाब  -  Online Solution

Next Chapter : पाठ - 5 : अणूचे अंतरंग -  Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *