धातु-अधातु
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -7- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. तक्ता पूर्ण करा.
धातूंचे गुणधर्म | दैनंदि न जीवनात उपयोग |
(i) तन्यता | |
(ii) वर्धनीयता | |
(iii) उष्णतेचे वहन | |
(iv) विद्युतवहन | |
(v) नादमयता |
धातूंचे गुणधर्म | दैनंदिन जीवनात उपयोग |
(i) तन्यता | सोने, चांदीचे दागिने |
(ii) वर्धनीयता | अॅल्युमिनिअम, गॅल्व्हनाइज्ड पत्रे |
(iii) उष्णतेचे वहन | स्टेनलेस स्टीलची भांडी, तांब्याची भांडी, बॉयलर्स |
(iv) विद्युतवहन | तांब्याच्या तारा |
(v) नादमयता | पितळेच्या वस्तू, कांस्यचे टाळ |
प्रश्न 2. गटात न बसणारा शब्द ओळखा.
(अ) सोने, चांदी, लोह, हिरा
हिरा. (इतर सर्व धातू आहेत.)
(आ) तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता
ठिसूळता. (इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत.)
(इ) C, Br, S, P
Br. (इतर सर्व स्थायू आहेत.)
(ई) पितळ, कांस्य , लोखंड, पोलाद
लोखंड. (इतर सर्व संमिश्रे आहेत.)
प्रश्न 3. शास्त्रीय कारणे लि हा.
(अ) स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो.
स्टेनलेस स्टील हे संमिश्र लोखंड व कार्बन, क्रोमिअम, निकेल यांपासून बनलेले आहे. तांब्यामध्ये उष्णता वाहून नेण्याची क्षमता ही स्टीलमधील लोखंडापेक्षा जास्त आहे. तांब्याला लवकर व एकसारखी उष्णता मिळते. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो, म्हणजेच इंधनाची बचत होते. म्हणून स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो.
(आ) तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात?
- तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साइड तयार होते. कॉपर ऑक्साइडची हवेतील कार्बन डायऑक्साइडशी अभिक्रिया होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो. त्यामुळे तांब्याची चकाकी जाते.
- लिंबू रसामध्ये आम्ल असते. या आम्लात कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर (आम्लारिधर्मी) विरघळतो. त्यामुळे पुन्हा तांब्याची व पितळेची भांडी स्वच्छ होतात व त्यांना चकाकी प्राप्त होते.
(इ) सोडिअम धातूला केरोसीनमध्ये ठेवतात.
- सोडियमअत्यंत प्रतिक्रियाशील असतो, विशेषतः हवेतील ऑक्सिजन आणि पाण्याशी.
- कक्ष तापमानाला सोडिअम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो.
- त्यामुळेसोडियम केरोसीनमध्ये ठेवतात. सोडिअम केरोसीनमध्ये बुडतो व केरोसीन सोडियमला हवा आणि पाण्यापासून अलग ठेवते, केरोसीनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही ज्यामुळे ते सुरक्षित राहते. म्हणून सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात.
प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
(अ) धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल?
- धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वारनिश, व रंगाचे थर दिले जाते. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो.
- या क्रियांमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही.
- उदा. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते.
(आ) पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत?
- पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यांपासून बनवतात.
- कांस्य हे संमिश्र तांबे व कथिल यांच्यापासून बनवतात.
(इ) क्षरणांचे दुष्परिणाम कोणते?
- लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो.
- तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो.
- क्षरणामुळे स्वयंचलित वाहने, पूल, लोखंडाच्या वस्तू, जहाजे यांना धोका निर्माण होतो.
- चांदी, तांब्याच्या वस्तूंची चकाकी नाहीशी होते.
(ई) राजधातूंचे उपयोग कोणते?
- सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो.
- चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. (Antibacterial property).
- सोन्या-चांदीची पदकेही तयार करतात.
- काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने यांचा उपयोग होतो.
- प्लॅटिनम, पॅलेडिअम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक (Catalyst) म्हणून सुद्धा होतो.
प्रश्न 5. खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षानळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
(अ) परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही?
परीक्षानळी 2 मध्ये, हवेचा संपर्क तेलामुळे रोखला गेला आहे. तेलाखाली असलेले उकळलेले पाणी हे वायुमुक्त असते, त्यामुळे खिळ्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. त्यामुळे परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज चढला नाही.
(आ) परीक्षानळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल?
परीक्षानळी 1 मधील खिळा पाणी व हवा या दोन्हींच्या संपर्कात येत असल्याने त्याचे ऑक्सिडीकरण जलद होते. त्यामुळे परीक्षानळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज चढलेला दिसतो,
(इ) परीक्षानळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का?
परीक्षानळी 3 मध्ये कोणताच बदल दिसणार नाही, कारण कॅल्शिअम क्लोराइड हे ओलावा, दमटपणा शोषून घेते. त्यामुळे शुष्क हवा तयार होते व खिळ्यावरील गंज रोखला जातो.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-7-धातु-अधातु - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-7-धातु-अधातु - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 6 : द्रव्याचे संघटन - Online Solutions Next Chapter : पाठ - 8 : प्रदूषण - Online Solutions |