प्रदूषण
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -8- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. खाली काही वाक्ये दिली आहेत, ती कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडतात ते सांगा.
(अ) दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते.
हवा प्रदूषण-धुरके
(आ) पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो.
जल प्रदूषण- जीवाणू आणि विषाणूने दूषित अन्न/पाणी
(इ) बरेचदा बगीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास होतो.
हवा प्रदूषण – परागकणांमुळे
(ई) काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही.
मृदा प्रदूषण
(उ) जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना श्वसनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात.
हवा प्रदूषण – वाहतुकीमुळे
प्रश्न 2. परिच्छेद वाचून त्यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आलेत व कोणत्या वाक्यात आलेत ते नोंदवा.
निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो, शाळेत जाण्यासाठी त्याला एक तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा , बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेंव्हा गावात फिरला तेंव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले, अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती, काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला.
(1) शाळेत जाण्यासाठी त्याला एक तास लागतो. (वाहतूक कोंडीमुळे दूषित हवेच्या सान्निध्यात जास्त काळ)
(2) वाहनांची वाहतूक लागते. (हवा प्रदूषण होऊ शकते. इंधनाचे मोठ्या प्रमाणात ज्वलन)
(3) काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. (हवा प्रदूषण-मानवी आरोग्यावर परिणाम)
(4) कचऱ्याचे ढीग दिसले. (घनकचरा -जमीन व हवा प्रदूषण)
(5) अनेक ठिकाणी प्राण्यांच्या, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती. (जैविक प्रदूषण, हवा प्रदूषण)
(6) काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. (अयोग्य सांडपाणी व्यवस्थापन - जल प्रदूषण)
(7) काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला. (जल प्रदूषण - मानवी आरोग्यावर परिणाम)
प्रश्न 3. ‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून प्रदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.
‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
(1) कोबाल्टमिश्रित पाणी | अ. मति मंदत्व |
(2) मिथेन वायू | ब. अर्धांग वायू |
(3) शिसेमिश्रित पाणी | क. फुफ्फुसांवर सूज येणे |
(4) सल्फर डायऑकसाइड | ड. त्वचेचा कॅन्सर |
(5) नायट्रोजन डायऑक्साइड | इ. डोळे चुरचुरणे |
(1) कोबाल्टमिश्रित पाणी - अधागवायू,
(2) मिथेन वायू - त्वचेचा कॅन्सर.
(3) शिसेमिश्रित पाणी - मतिमंदत्व.
(4) सल्फर डायऑक्साइड - डोळे चुरचुरणे.
(5) नायट्रोजन डायऑक्साइड - फूप्फुसांवर सूज येणे.
प्रश्न 4. चूक की बरोबर ठरवा.
(अ) नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही.
चूक.
स्पष्टीकरण : वाहत्या पाण्यात कपडे धुतले तरी त्यातील घाण कोठेतरी वाहत जातेच. त्यामुळे प्रदूषण होतेच.
(आ) विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते.
बरोबर.
स्पष्टीकरण : सौर ऊर्जा वापरून वीज निर्माण केली तर प्रदूषण होणार नाही. परंतु भारतात अद्यापही कोळसा वापरून जास्त प्रमाणात ऊर्जानिर्मिती केली जाते व त्यासाठी कोळसा जाळावा लागतो. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्रातून प्रदूषण होते.
प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
(अ) प्रदूषण व प्रदूषके म्हणजे काय ?
- प्रदूषण : परिसंस्थेला हानिकारक ठरणारे असे नैसर्गिक पर्यावरणाचे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.
- प्रदूषके : परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम करणाऱ्या पदार्थांना प्रदूषके म्हणतात.
(आ) आम्ल पर्जन्य म्हणजे काय ?
कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्सा इडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते. ही आम्ले , पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.
(इ) हरितगृह परिणाम म्हणजे काय ?
- हरितगृह परिणाम ही एक प्रक्रिया आहे. यामुळे जागतिक तापमानवृद्धी आणि
- वातावरणात बदल होतो.
- पृथ्वीला सूर्यापासून सौर ऊर्जा मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो व काही प्रमाणात ही ऊर्जा शोषून घेतो. त्यापैकी काही ऊर्जा अवरक्त किरणांच्या रूपात परावर्तित होऊन अवकाशात फेकली जाते.
- परंतु प्रदूषणामुळे पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणात CO2, CH4 अशा वायूंचा व बाष्पाचा थर निर्माण झाला आहे. अवकाशात फेकली गेलेली काही ऊर्जा या वायूंच्या थरात शोषली जाते. ही किरणे पुन्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे उष्णतेच्या स्वरूपात फेकली जातात.
- या वाढीव उष्णतामानाला हरितगृह परिणाम असे म्हणतात. हरितगृह परिणाम जागतिक तापमानवाढीस जबाबदार ठरतो.
- CO2, CH4, N2O, CCl2F2 आणि HClF2 यांसारख्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात.
- अधिकाधिक ज्वलनाच्या मानवी कृतींमुळे हरितगृह परिणामाचे गांभीर्य वाढत आहे.
वाढत्या हरितगृह परिणामामुळे :
- जागतिक तापमानवाढ (Global warming)
- हवामानात बदल
- पिकांचे उत्पादन कमी आणि अनियमित होणे
- वन्यजीवांना धोका
- हिमनग व हिमनद्या वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ
असे घातक परिणाम दिसून येतात.
(ई) दृश्य प्रदूषके व अदृश्य प्रदूषके कोणती ?
- दृश्य प्रदूषके : जे प्रदूषणकारी पदार्थ डोळ्यांना सहज दिसून येतात, त्यांना आपण दृश्य प्रदूषके म्हणू शकतो. उदा., घनकचरा, प्लास्टिकच्या वस्तू, प्लास्टिक पिशव्या, पाण्यात तरंगणारे पदार्थ, धातुंच्या वस्तू इत्यादी.
- अदृश्य प्रदूषके : जी प्रदूषके पाण्यात अथवा हवेत संपूर्णपणे मिसळून गेली असतील अशा प्रदूषकांना अदृश्य प्रदूषके म्हणता येईल. उदा., हवेत फवारलेली कीटकनाशके, एरोसोलसारखे पदार्थ, हवेत मिसळलेले अनेक घातक वायू, पाण्यात विद्राव्य असलेले विषारी पदार्थ इत्यादी.
प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) तुमच्या आसपासच्या भागात आढळलेली हवा प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण यांची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.
हवा प्रदूषण :
- नव्याने खूप इमारती बांधण्यात येत आहेत; जुन्या इमारती पाडण्यात येत आहेत. त्यामुळे हवेत धुळीचे खूप प्रमाण असते.
- मोटार-सायकलची आणि चारचाकी वाहनांची रहदारी खूप वाढली आहे. त्यामुळे वातावरणात धूर असल्यासारखे वाटते.
जल प्रदूषण :
- मल-मूत्र आणि इतर प्रदूषित पाणी शहरात आणि गावात जलाशयात सोडले जाते.
- समुद्र किनाऱ्यावर खूप सारे मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे.
मृदा प्रदूषण :
- जमिनीवर कचऱ्याचे ढीग दिसतात. त्यात सुया, जुन्या औपधांच्या डब्या असे काहीबाही दिसते.
- पावसाने आणलेला गाळ, मानवी मलमूत्र, पशू, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे सगळीकडे पसरून दुर्गंधी येते.
(आ) वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते ? कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगा.
वाहने जसे कार, बस, ट्रक इत्यादी विविध प्रकारची प्रदूषके उत्सर्जित करतात. या प्रदूषकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- कार्बनमोनोऑक्साइड (CO), : पेट्रोल किंवा डिझेल जळल्यानंतर हा वायू तयार होतो.
- नायट्रोजनऑक्साइड्स (NOx): इंजनमधील उच्च तापमानामुळे हे वायू तयार होतात.
- पार्टिक्युलेटमॅटर (PM): डिझेल वाहनांमधून हा प्रदूषक सर्वाधिक प्रमाणात उत्सर्जित होतो.
- वायवीयहायड्रोकार्बन्स (VOCs): इंधन जळल्यामुळे हे प्रदूषक उत्सर्जित होतात.
ही प्रदूषके वातावरणात मिळतात आणि हवा प्रदूषित करतात. यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. हवा प्रदूषणापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रदूषण वाहनांमुळे होते. या सर्व कारणांमुळे वाहने सर्वांत जास्त हवा प्रदूषण करतात हे लक्षात येते,
प्रदूषण न करणारे वाहने :
- दुचाकी सायकल.
- विजेवर चालणाऱ्या चारचाकी गाड्या
- सी.एन.जी. वर चालणारी वाहने कमी प्रदूषण करतात.
(इ) जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ते लिहा.
जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे :
जलपर्णीची वाढ | प्राणवायू कमी होतो, पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. (अतिजैविकीकरण) |
कुजणारे पदार्थ | इतर सजीवांचे (प्राणी व वनस्पती) अवशेष पाण्यात पडून सडणे व कुजणे. |
गाळ | गाळामुळे नदीचे पात्र किंवा प्रवाह नैसर्गिकरीत्या बदलतात. गाळ प्रदूषणकारी असू शकतो. |
जमिनीची धूप | जमिनीची धूप होऊन सूक्ष्मजीव जसे जैविक, तसेच अजैविक घटक पाण्यात मिसळतात. |
कवक | कवक व जीवाणूंची वाढ पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर होते. कवक आणि जीवाणूंमुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. रोगराई पसरते. |
शैवाल | पाणी शैवालामुळे अस्वच्छ होते. |
कृमी | जमिनीवरचे कृमी पाण्यात वाहत येऊन पाणी दूषित होते.. |
(ई) हवा प्रदूषणावर कोणतेही चार प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.
- कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर तसाच हवेत सोडू नये. त्यातील दूषित कण हवा यंत्रणेचा वापर करून काढून घ्यावेत. उदा., निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणी यंत्र (Filters) यांचा वापर बंधनकारक असावा.
- घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट.
- आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण.
- CFC निर्मितीवर बंदी/बंधने.
- पर्यायी कच्च्या मालाचा वापर, सुधारित उपकरणांचा वापर आणि सुधारित प्रक्रियांचा वापर करून उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करता येतात.
(उ) हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध स्पष्ट करा./परिणाम सांगा.
- हरितगृह परिणामामुळे पृथ्वीवरची उष्णता टिकून राहते. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ झाली आहे.
- कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत असल्यामुळे हरितगृह परिणाम वाढतो व त्याचा थेट परिणाम जागतिक तापमानवाढीवर होत आहे.
परिणाम :
- तापमान वाढल्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवीय प्रदेशातील बर्फ आणि हिमनग वितळत आहेत. यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे.
- किनारपट्टीचे प्रदेश आणि बेटे पाण्याखाली जातील अशी भीती आहे.
- तापमान-वाढीने अनेक सजीवांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत.
- वन्य प्राणी स्थलांतरित झाले आहेत.
- ध्रुवीय अस्वल अस्तंगत होण्याचा धोका आहे.
- समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे त्यातील प्रवाह बदलले जाऊन चक्रीवादळे, ढगफुटी, हरिकेन अशा नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत.
- पिकांचे उत्पादन कमी होत आहे. जेथे पाऊस पडत नाही अशा ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
(ऊ) हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण व पाणी प्रदूषण यावर प्रत्येकी दोन-दोन घोष वाक्ये तयार करा.
हवा प्रदूषण:
- "शुद्धहवा, सुरक्षित जीवन."
- "प्रदूषणमुक्त हवा, निसर्गाशी नवा नवा."
मृदा प्रदूषण:
- "मातीवाचवा, भविष्य संरक्षित करा."
- "शुद्धमृदा, हरित भूतकाळ."
पाणी प्रदूषण:
- "स्वच्छपाणी, निरोगी जीवन."
- "प्रदूषणरोखा, नद्या वाचवा."
प्रश्न 7. खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा.
सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.
मानवनिर्मित प्रदूषके | निसर्गनिर्मित प्रदूषके |
सांडपाणी, धूळ (बांधकाम व्यवसायाशी निगडित), रासायनिक खते, वाहनांचा धूर, कीटकनाशके | धूळ (नैसर्गिक वादळांशी निगडित), परागकण, शैवाल, पशुपक्ष्यांची विष्ठा |
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-8-प्रदूषण - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-8-प्रदूषण - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 7 : धातु-अधातु - Online Notes Next Chapter : पाठ - 9 : आपत्ती व्यवस्थापन - Online Notes |