Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-9-आपत्ती व्यवस्थापन-Maharashtra Board

आपत्ती व्यवस्थापन

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -9- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

() बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यांतील संबंध कारणे स्पष्ट करा.

उत्तर :

  • ज्या वेळी दरड कोसळते त्याच्या खूप आधी जमिनीत काही बदल झालेले असतात. नैसर्गिकरीत्या कठीण पाषाणात भेगा व फटी असतात. या भेगांमुळे मोठ्या खडकांचे तुकडे होऊन या फटी अजून रुंदावतात.
  • मुसळधार पाऊस असेल तर या अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा-फटींमध्ये पाणी शिरून खडकांची अधिक प्रमाणात झीज होते. जमिनीची देखील धूप होते.
  • असे मोकळे झालेले दगड, खडक तेथील मातीसोबतच उतारावरून कोसळत येतात. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही स्थित्यंतरे अधिक जलद आणि वेगवान होतात.

() भूकंप पत्ती च्या प्रसंगी काय करावे काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.

उत्तर :

भूकंपात घ्यायची दक्षता :

हे करावे हे करू नये
घरामध्ये असाल, तर :

शांतपणे उभे राहावे.

जमिनीवर बसावे, एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकावे.

जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबावे. अन्यथा घराच्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती ठेवून चेहऱ्याचे व डोक्याचे संरक्षण करावे.

चालत्या वाहनात असाल, किंवा घराबाहेर असाल, तर

सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवून आतच बसावे

बॅटरी/टॉर्चचा वापर करावा.

घाबरू नये.

इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नये.

अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नये.

शरीराची हालचाल थांबवू नये.

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आगी लागतात, त्यामुळे घरातील मेन स्विच चालू ठेवू नये.

प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नये.

इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नये.

() भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर :

  • भूकंप रोधक इमारतींचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.
  • भिंती कमी वजनाच्या किंवा लाकडाच्या असतात.
  • इमारतीच्या विविध अंगांमध्ये लवचिक सांधे वापरले जातात जेणेकरून ती वाकू शकते आणि तडे पडू शकत नाहीत.
  • भूकंपरोधक इमारतींमध्ये हलक्या वजनाच्या आणि मजबूत सामग्रीचा वापर केला जातो.
  • जड सामानांनी बांधलेल्या घरांपेक्षा भूकंपरोधक इमारती वेगळ्या प्रकारच्या असतात.

() दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा.

उत्तर :

  • नद्या डोंगरात उगम पावत असतात. तेथील दरड पडली की नद्यांना अचानक पूर येतात.
  • यामुळे नद्यांचे प्रवाह बदलतात.
  • आपली पूर्वीची जागा सोडून धबधबे स्थानांतरित होतात.
  • कृत्रिम जलाशयांची निर्मिती होते.
  • वरच्या बाजूवरून माती-खडक कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्ष उन्मळून पडतात. भूस्खलित जमिनीवरचे वनस्पती जीवन नाश पावते.
  • उतारावर वसलेली गावे, झालेली बांधकामे असे सर्व काही भुईसपाट होते. यामुळे
  • खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते.
  • वाहतूक विस्कळीत होऊ शकते. रस्त्यांवर माती, दगड इत्यादी आल्याने रस्ते व लोहमार्ग बंद पडतात.

() धरण णि भूकंप यांचा काही संबंध आहे काय? तो स्पष्ट करा.

उत्तर :

  • धरणात खूप जास्त प्रमाणात पाणी साठवलेले असते. या पाण्याचे वजन जमिनीवर पडते. मुळात वजन नसलेल्या ठिकाणी पाण्यामुळे खूप जास्त वजन निर्माण झाल्याने, अशा जमिनीवर ताण येतो. त्यातच अशा प्रदेशात जर भूकंपप्रवण गुणधर्म असतील तर त्यामुळे धरणाच्या पाण्याने भूकंप होण्याचा संभव वाढतो.
  • प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांतानुसार पृथ्वीच्या भूकवचात सतत घडामोडी होत असतात. अशा प्लेटवर जर महाकाय धरण बांधण्यात आले तर असा धोका जास्तच वाढतो.

प्रश्न 2. शास्त्रीय कारणे द्या.

() भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.

उत्तर :

  • भूकंपाच्या वेळी इमारतींची संरचना हलू लागते, त्यामुळे वस्तू खूप वेगाने पडू शकतात. अशा वेळी डोक्याला इजा होण्याचा संभव असतो.
  • भूकंपकाळात पलंग, टेबल अशा वस्तूंच्या खाली राहिल्याने वरून पडणार्‍या वस्तूंपासून संरक्षण मिळते.
  • त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी आणि गंभीर स्वरूपाची इजा टाळण्यासाठी म्हणून अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.

() पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी सरा घेऊ नये.

उत्तर :

  • मुसळधार अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊ शकते. त्यामुळे डोंगरावरील माती, मोठाले खडक इत्यादी अकस्मात कोसळू शकतात. डोंगराच्या उतारी प्रदेशात घसरत जाऊन हे खाली येतात.
  • त्यामुळे आपण जर डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेतला, तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.

() भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये.

उत्तर :

  • लिफ्ट ही विजेवर चालणारी असते. भूकंपाच्या वेळी लिफ्टचे केबल्स किंवा इलेक्ट्रिकल सिस्टम खराब होऊ शकतात, ज्यामुळे लिफ्ट अचानक थांबू शकते किंवा खाली येऊ शकते.
  • भूकंपाच्या वेळी लिफ्टचे मार्ग अडचणीत येऊ शकतात, जसे की भिंती खचणे किंवा तुटलेल्या रस्त्यामुळे लिफ्ट मार्गावर जाऊ शकत नाही.
  • कधी-कधी शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागू शकते.
  • अशा स्थितीत लिफ्टमध्ये राहणे अधिक धोकादायक ठरते. त्यामुळे भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये

() भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.

उत्तर :

  • भूकंप होत असताना भूकवच कंप पावते. भूपृष्ठाचा काही भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात.
  • अशा हादऱ्यांमुळे इमारतींना धोका पोहोचू शकतो. त्याशिवाय भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीवरच्या इमारतींचे नुकसान करू शकतात.
  • पायाभूत संरचनेच्या वेगळेपणामुळे इमारतीच्या अंगांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांना लढण्याची क्षमता वाढते, संरचना अधिक मजबूत बनते म्हणून, भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.

प्रश्न 3. भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्या ने कोणकोणत्या अडचणी येतील?

उत्तर :

भूकंपानंतर आसपास लोकांची गर्दी असेल तर तेथे बचावकार्य करणे कठीण जाईल, रुग्णवाहिका किंवा आपत्ती निवारण कक्षाचे जवान अपघात स्थळी पोहोचू शकणार नाहीत. ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना मदत पोहोचणार नाही.

प्रश्न 4. आपत्ती कालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना संस्था यांची यादी करा. त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा.

प्रश्न 5. आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्देनिहाय माहिती लिहा.

प्रश्न 6. तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणे आहेत काय? याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा.

उत्तर :

प्रश्न 4, 5, 6 उपक्रम प्रश्न, विद्यार्थ्यांनी स्वतः लिहावा.

प्रश्न 7. खालील चित्राच्या साहाय्याने आपत्ती काळातील तुमची भूमिका काय असेल ते लिहा.

उत्तर :

वरील चित्र संदिग्ध आहे. त्यातून नक्की परिस्थिती स्पष्ट होत नाही. त्यामुळे उत्तराचे दोन पर्याय आहेत.

पर्याय 1 : चित्रात दाखवलेल्या मुलाच्या हातात 'I am at risk' असे लिहिलेला कागद आहे. ते वाचून तो घाबरला आहे. हे कोणीतरी त्याला कळवले आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला मदत करणे योग्य आहे. यासाठी त्याने कोणा मोठ्या माणसाकडे हा कागद द्यावा. पोलिसांची मदत घेऊन त्या मुलाला मदत केली पाहिजे.

पर्याय 2 : जर 'I am at risk' हा संदेश जर मला पाठवला तर तातडीने आम्ही त्याच्या मदतीला धावून जाऊ. कारण 'I am at risk', म्हणजेच मी संकटात आहे असे त्याने कळवले आहे. तर, माझी भूमिका त्याला मदत आणि समर्थन देणे असेल. हे काही उदाहरणे आहेत:

  • आताच्या परिस्थितीबद्दल माहिती विचारणे: मी त्याला स्थितीबद्दल अधिक माहिती विचारू शकतो, जेणेकरून मी त्याला त्वरित आणि योग्य मदत देऊ शकेन.
  • सुरक्षित स्थळांचा सल्ला देणे: मी त्याला जवळच्या सुरक्षित स्थळांचा सल्ला देऊ शकतो आणि त्वरित सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपायांची माहिती देऊ शकतो.
  • आपत्कालीन सेवांचा संपर्क क्रमांक देणे: त्याला संपर्कासाठी आवश्यक आपत्कालीन सेवा क्रमांक देऊ शकतो, जेणेकरून त्याला त्वरित मदत मिळू शकेल.
  • भावनिक समर्थन: मी त्याला भावनिक समर्थन देऊ शकतो आणि कठीण परिस्थितीत सांत्वन देऊ शकतो.
  • महत्वाची माहिती पुरवणे: मी त्याला परिस्थितीशी संबंधित महत्वाची माहिती पुरवू शकतो, जसे की त्वरित काय करावे आणि कोणत्या उपायांचा अवलंब करावा.

या चित्रात कोणती आपत्ती आहे ते काहीच स्पष्ट होत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या 'आपत्ती काळातील भूमिका' हे लिहिता येत नाही.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-9-आपत्ती व्यवस्थापन - नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-9-आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 8 : प्रदूषण  -  Online Solutions

Next Chapter : पाठ - 10 : आपत्ती व्यवस्थापन -  Online Solutions

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *