वनस्पतींचे वर्गीकरण
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6-Maharashtra Board
Notes
अभ्यासघटक :
|
ओळख :
सजीवांचे वर्गीकरण :
रॉबर्ट व्हिरकर (1959) या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धती तयार केली. याप्रमाणे मोनेरा, प्रोटिस्य, कवक, वनस्पती आणि प्राणी अशा पाच सृष्टीत सजीवांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
सजीवांचे गुणधर्मानुसार, त्यांच्यातील साम्य-भेद, प्रजनन पद्धती, अधिवास आणि इतर शरीररचनेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन वर्गीकरण करण्यात आले आहे.
सृष्टी : वनस्पती (Kingdom Plantae)
- पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला ‘वनस्पती’ म्हणतात.
- वनस्पती हरितद्रव्यांच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत
- स्वयंपोषी वनस्पतीपेशीमध्ये लवके ही वैशिष्ट्यपूर्ण अंगके असतात. यापैकी हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश-संश्लेषण करू शकतात, म्हणून वनस्पतीपेशी प्राणीपेशीपेक्षा वेगळी ठरते.
वनस्पती वर्गीकरण : वनस्पतीशास्त्रज्ञ एचर (1883) यांनी वनस्पतीसृष्टीचे अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले.
वर्गीकरणाचा आधार : वनस्पतींचे वर्गीकरण करताना पुढील वैशिष्ट्ये लक्षात घेतली जातात :
- वनस्पतींना अवयव असणे/नसणे : वनस्पतीला अवयव नसल्याम ती थॅलोफायटा विभागात येते.
- वनस्पतींमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्था असणे/नसणे : जर स्वतंत्र वहन ऊती नसतील; पण मूलाभ आणि पानांसारखे अवयव असतील तर त्या वनस्पतीचा समावेश ब्रायोफायटा विभागात केला जातो. जर त्या वनस्पतीत वहन ऊती असतील तर ती वनस्पती टेरिडोफायटा विभागात समाविष्ट केली जाते. तसेच इतर सर्व बीजपत्री वनस्पतींनाही वहन ऊती असतात.
- वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता असणे/नसणे : जर वनस्पतीला फुले, फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती असते व तिचा टेरिडोफायटा विभागात समावेश केला जातो. जर फुले, फळे व बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती होते..
- बियांवर फळांचे आवरण असणे/नसणे : जर बीवर फळाचे आवरण नसेल तर ती अनावृत्तबीजी वनस्पती ठरते. बीवर फळाचे आवरण असेल तर ती आवृत्तबीजी वनस्पती होते.
- बीजपत्रांची संख्या : एक/दोन : बीजांमध्ये जर एकच बीजपत्र असेल तर ती एकबीजपत्री आणि दोन बीजपत्रे असतील तर ती द्विबीजपत्री ठरते.
उपसृष्टी-अबीजपत्री वनस्पती (Cryptogams) :
उपसृष्टी अबीजपत्री या गटातील वनस्पतींचे प्रजनन बीजाणूच्या साहाय्याने होते. त्यांची प्रजननसंस्था अप्रकट असून त्यांची प्रजननांगे लपलेली असतात.
विभाग I - थॅलोफायटा (Thallophyta) :
- थॅलोफायटा विभागातील वनस्पती जलीय असतात. काही गोड्या पाण्यातल्या तर काही सागरी जलातल्या.
- यांना विशिष्ट अवयव (मूळ -खोड --पाने -फुले) नसतात.
- या स्वयंपोषी असतात. त्यांच्यात हरितद्रव्य असते. उदा., शैवाल (Algae).
- शैवाले अनेक प्रकारची असतात. त्यांचे शरीर मऊ व तंतुरूपी असते. उदा., एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म आणि काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले. उदा., स्पायरोगायरा, युलोध्रिक्स, सरगॅसम, उल्व्हा, कारा इत्यादी.
- जुन्या वर्गीकरण पद्धतीनुसार याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या कवकांचा समावेश केला जाई. परंतु कवके परपोषी असल्यामुळे आता त्यांना वनस्पतीचा दर्जा दिला जात नाही. अशा कवक वर्गात (Fungi) किण्व व बुरशीचा समावेश होतो.
स्पायरोगायरा वनस्पतीची वैशिष्ट्ये:
- अबीजपत्री वनस्पती.
- उपसृष्टीमधील थॅलोफायटा वनस्पती स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे.
- गोड्या पाण्यात आढळतात. या केवळ पाण्यातच जगू शकतात.
- शरीर लांब तंतूप्रमाणे असते. या बहुपेशीय तंतुमय शरीरात सर्पिल भासणारा हरितलवक असतो. याच्या मधोमध पायरेनॉईड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या असतात.
- हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश -संश्लेषण करतात. म्हणून त्या स्वयंपोषी आहेत.
- त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते.
- खंडीभवन प्रक्रियेने स्पायरोगायरा वाढतात.
विभाग II - ब्रायोफायटा (Bryophyta) :
- ब्रायोफायटा गटातील वनस्पती उभयचर असतात.
- ओलसर मातीत वाढणाऱ्या या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज भासते.
- पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर, बिटांवर आणि खडकांवर पाण्याची उपलब्धता मिळाल्यामुळे या वनस्पती जोमाने वाढून हिरवागार गालिचाच तयार करतात.
- या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात.
- बीजाणूनिर्मितीने प्रजनन होते.
- शरीररचना चपट्या रिबिनीसारखी लांब असते.
- खरी मुळे, खोड, पाने नसतात; मात्र पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मूलाभ असतात.
- पाणी व अन्नाच्या वहनासाठी खास ऊती नसतात.
- उदा., मॉस (फ्युनारिआ), मकॅशिया, अन्थॉसिरॉस, रिक्सिया इत्यादी.
विभाग III - टेरिडोफायटा (Pteridophyta) :
- टेरिडोफायटा गटातील वनस्पतींना फुले -फळे येत नाहीत. मात्र मुळे, खोड, पाने असे अवयव असतात.
- पाणी व अन्न बहनासाठी स्वतंत्र संवहनी संस्था असतात.
- त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंदूवारे अलैंगिक प्रजनन होते.
- युग्मक निर्मितीदवारे लैंगिक प्रजनन होते.
- उदा., फर्न्स-नेफ्रोलेपीस (नेचे), मासेलिया, टेरीस, एडीअँयम, इक्थविसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम इत्यादी.
लक्षात ठेवा :
- थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटांतील वनस्पतींच्या शरीररचनांमध्ये फरक असले तरी या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री (Cryptogams : लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती) म्हणतात. अप्रकट प्रजननसंस्था ही या तिन्ही. गटांतील समानता आहे.
- शैवाल निराळे आणि शेवाळ निराळे. शैवाल म्हणजे अल्गे वनस्पती जी थॅलोफायटा असते आणि शेवाळ म्हणजे मॉस जे ब्रायोफायटा असते.) शोभिवंत फुलबागा तयार करताना खूप सारे मॉस एकत्र करून बनवलेले मॉसचे दांडे बापरले जातात.
उपसृष्टी बीजपत्री (Phanerogams) :
- बीजपत्री वनस्पतीत प्रजननासाठी खास ऊती असतात. बियांची निर्मिती होते. त्यात भ्रूण व अन्नसाठा असतो.
- जर या बिया फळांमध्ये झाकलेल्या नसतील, तर त्या अनावृत्तबीजी वनस्पती असतात. जर बिया झाकलेल्या असतील, तर त्या आवृत्तबीजी वनस्पती ठरतात.
विभाग I- अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms) :
(Gymnos -न झाकलेले/अनावृत्त, Sperm -बीज)
- या वनस्पती बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात.
- या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात. पानांचा मुकुट तयार झालेला असतो.
- नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रां वर येतात.
- अनावृत्तबीजी वनस्पतींच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच फळे येत नाहीत.
- उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मारपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.
विभाग II - आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms) :
(Angios—Cover म्हणजे आवरण, Sperm -बीज)
- या वनस्पतींना सर्व अवयव असतात. फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत.
- फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात.
- आवृत्तबीजी वनस्पतीच्या बियांवर फळाचे आवरण असते.
- यांचे दोन वर्ग आहेत. दूविबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती.
ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्वि बीजपत्री वनस्पती म्हणतात तर ज्यां च्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात
उदा. मका आणि गहू यांना एकबीजपत्र आहे. त्यांचे समान भाग होत नाहीत. घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोय या द्विदल बिया आहेत. त्यांचे दोन समान भाग होतात.
(i) कांदा : (एकबीजपत्री वनस्पती) :
- शास्त्रीय नाव : Allium cepa
- कांद्याचे रोप छोटे असून त्याचा कंद भूमिगत असतो.
- मूळ : तंतुमय मुळे.
- खोड : भूमिगत, कंदाच्या स्वरूपात.
- पाने : पोकळ नलिकेसमान, पात्यासारखी.
- फुले : पूर्ण व द् विलिंगी, निदलपुंज व दलपुंज दोन्ही एकाच परिदलपुंज या स्वरूपात. प्रत्येकी 3 याप्रमाणे दोन थरांत त्यांची रचना.
- पुमंग/पुंकेसर : परिदलपुंजांवर चिकटलेले 6 पुंकेसर.
- जायांग/स्त्रीकेसर : त्रिभागी, अंडाशय वरच्या पातळीवर.
(i) जास्वंद : (दूविबीजपत्री वनस्पती) :
- शास्त्रीय नाब Hibiscus rosasinensis
- मूळ : ठळक, प्राथमिक मूळ -सोटमूळ या प्रकारातील मुळे.
- पाने : साधी, जाळीदार शिराविन्यास असलेली पाने.
- फुले : देठ असलेली, पूर्ण, द्विलिंगी, पंचभागी.
- निदलपुंज : पाच हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज,
- दलपुंज : पाच लाल रंगाच्या सुट्या पाकळ्यांचा दलपुंज
- पुमंग /पुंकेसर : पुंकेसर, परागकोश आणि वृंत यांचा बनलेला आहे. अनेक पुंकेसर एकत्र येऊन परागनलिका तयार होते. परागकोशाची रचना दूविपाळी असून वृक्काच्या आकाराचे परागकोश वृंताच्या टोकावर दिसतात.
- जायांग/स्त्रीकेसर : कुक्षी, कुक्षीवंत आणि अंडकेशयापासुन स्त्रीकेसर बनलेला असतो. ५ स्त्रीकेसर दिसून येतात.
दूविबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती फरक :
Click on link to get PDF from store :
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6- वनस्पतींचे वर्गीकरण-Notes
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6- वनस्पतींचे वर्गीकरण-Solutions
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6- वनस्पतींचे वर्गीकरण-Text Book
PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF)
Useful links :
Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान- All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ-5-आम्ल, आम्लारी व क्षार - online notes Next Chapter : पाठ-7- परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह- online notes |