इतिहासाची साधने
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे.
(अ) पुणे
(ब) नवी दिल्ली
(क) कोलकता
(ड) हैदराबाद
(ब) नवी दिल्ली
(२) दृक् -श्राव्य साधनांमध्ये .......... या साधनाचा समावेश होतो.
(अ) वृत्तपत्र
(ब) दूरदर्शन
(क) आकाशवाणी
(ड) नियतकालिके
(ब) दूरदर्शन
(३) भौतिक साधनांमध्ये .......... चा समावेश होत नाही.
(अ) नाणी
(ब) अलंकार
(क) इमारती
(ड) म्हणी
(ड) म्हणी
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
| व्यक्ती | विशेष |
| जाल कूपर | टपाल तिकिट अभ्यासक |
| कुसुमाग्रज | कवी |
| अण्णा भाऊ साठे | लोकशाहीर |
| अमर शेख | चित्र संग्राहक |
अमर शेख- चित्र संग्राहक
प्रश्न २. टीपा लिहा.
(१) लिखित साधने
'लिखित साधने' हे इतिहासलेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे.
- लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोशवाङ्मय अशा छापील साहित्याचा समावेश होतो.
- रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी हाती लेखन केलेले साहित्यही लिखित साधनातच मोडते.
या साधनांच्या आधारे समाजजीवन, चळवळी, प्रशासन, सांस्कृतिक व सामाजिक बाबींचा अभ्यास करता येतो.
(२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
- देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पीटीआय, यूएनआय, समाचार भारती व हिंदुस्थान समाचार या संस्था करतात.
- जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात.
- पीटीआय ही वृत्तसंस्था १९५३ पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपत्रांना देत आली आहे. १९९०च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली आहे.
- पीटीआय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहासलेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असतो.
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
- भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते.
- भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणांस सांगत आली आहेत.
- विविध नेत्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतकोत्सव अशा प्रसंगांवर टपाल तिकिटे काढली गेली आहेत.
- प्राणी, पक्षी, फुले असा निसर्ग, देशातील विविध सण-महोत्सव, महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादींविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत.
- अशा रितीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते.
(२) आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
- दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल (इंटरनेट), माहितीपट अशा दृक्-श्राव्य साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.
- राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात.
- वृत्तपट व अनुबोधपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतो.
- म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.
Click on link to get PDF from store
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने - नोट्स
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Useful links :
| Main Page : - Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : धडा २ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - Online Solutions |
