भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-2
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ............. होते.
(अ) राजीव गांधी
(ब) श्रीमती इंदिरा गांधी
(क) एच.डी.देवेगौडा
(ड) पी.व्ही .नरसिंहराव
(अ) राजीव गांधी
(२) भारतीय हरितक्रांतीचे जनक ............ होत.
(अ) डॉ. वर्गीस कुरीयन
(ब) डॉ.होमी भाभा
(क) डॉ. एम. एस.स्वामीनाथन
(ड) डॉ. नॉमेन बोरलॉग
(क) डॉ. एम. एस.स्वामीनाथन
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) इंदिरा गांधी - राष्ट्रीय आणीबाणी
(२) राजीव गांधी - विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा
(३) पी.व्ही .नरसिंहराव - आर्थिक सुधारणा
(४) चंद्रशेखर - मंडल आयोग
चंद्रशेखर - मंडल आयोग
प्रश्न २. (अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा.
पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार
करा.
| प्रधानमंत्रीचे नाव | कालावधी |
| पंडित जवाहरलाल नेहरू | १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ |
| गुलज़री लाल नंदा | २७ मे १९६४ ते ९ जून १९६४ |
| लाल बहादुर शास्त्री | ९ जून १९६४ ते ११ जून १९६६ |
| गुलज़री लाल नंदा | ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६ |
| इंदिरा गांधी | २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७
१४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ |
| मोरारजी देसाई | २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ |
| चरण सिंह | २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० |
| राजीव गांधी | ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ |
| विश्वनाथ प्रताप सिंह | २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० |
| चंद्रशेखर | १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ |
| पी. वी. नरसिम्हा राव | २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ |
| अटल बिहारी वाजपेयी | १६ मे १९९६ ते १ जून १९९६
१९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ |
| एच. डी. देवे गौड़ा | १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ |
| इंद्र कुमार गुजराल | २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८ |
| मनमोहन सिंह | २२ मे २००४ ते २६ मे २०१४ |
| नरेंद्र मोदी | २६ मे २०१४ ते अजूनही |
(ब) टीपा लिहा.
(१) जागतिकीकरण
'जागतिकीकरण' म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच 'जागतिक अर्थव्यवस्था' निर्माण करणे होय.
- जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले.
- जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे.
- G-20 आणि BRICS यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे.
- दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे.
- भ्रमणध्वनी (मोबाइल) आणि आंतरजाल सेवा (इंटरनट), उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहत.
- याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आह.
- हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यांतून दिसतात.
(२) धवलक्रांती
- डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली.
- सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्धप्रकल्प विकसित केला गेला.
- डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध-उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली.
- डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही 'धवलक्रांती' घडवून आणली.
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.
- आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली.
- काँग्रेसचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले.
- परंतु, या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेले.
- या मतभेदांमुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला; त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम २८ महिनेच टिकले.
(२) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
- १९८० च्या दशकात पंजाबमध्ये 'खलिस्तान' आंदोलन सुरू झाले.
- भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र 'खलिस्तान' राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले.
- या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
(३) भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.
- भारताने १९५० साली संविधानाचा स्वीकार करून सार्वभौम लोकशाही राष्ट्राची स्थापना केली.
- ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा व्हास झाला होता.
- विविध भाषा, धर्म आणि जातींनी समृद्ध असलेल्या या देशाला अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हाने भेडसावत होती.
- भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देशातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्याची गरज होती.
- अनेक उद्योग उभारून, आधुनिकीकरण करून, भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते.
- नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती; म्हणून स्वातंत्र्यानंतर १९५० साली दारिद्र्य निर्मूलन व आर्थिक वाढीसाठी भारताने नियोजन आयोगाची स्थापना करून औद्योगिकीकरणाला चालना दिली.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?
१९९१ साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या-
- सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला.
- पी. व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले.
- उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली.
- याच काळात रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचे देशावर दीर्घकाळ परिणाम झाले.
(२) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये :
- अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण : भारतीय अर्थव्यवस्था पारंपरिक शेतीप्रधान प्रणालीकडून औद्योगिक व तंत्रज्ञानाधिष्ठित प्रणालीकडे झुकत आहे. यामध्ये माहिती-तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र, स्टार्टअप्स आणि डिजिटल व्यवहार यांचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवणे, आधुनिक वाहतूक व दळणवळण व्यवस्था उभारणे हे आहेत.
- आर्थिक स्वावलंबन : आर्थिक स्वावलंबन म्हणजे इतर देशांवर अवलंबून न राहता देशांतर्गत संसाधनांचा प्रभावी वापर करून उत्पादन करणे आणि आत्मनिर्भर होणे. ज्याअंतर्गत स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, आयात कमी करणे आणि निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
- सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना : भारतात लोकशाही समाजवाद स्वीकारलेला आहे. या प्रणालीत आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक न्याय महत्त्वाचा मानला जातो. यासाठी सरकार आरक्षण, सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा इत्यादी उपयोजनांवर भर देते.
ही भारताच्या स्वातंत्र्या पासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत.
प्रश्न ५. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.
| भारतापुढील आव्हाने | बलस्थाने |
| उदा., भारत-पाकिस्तान युद्ध | विविधतेतही एकता |
| ------------------- | ------------------- |
| ------------------- | अण्वस्त्र सज्जता |
| फुटीरतावाद | ------------------------ |
| भारतापुढील आव्हाने | बलस्थाने |
| भारत-पाकिस्तान युद्ध | विविधतेतही एकता |
| दारिद्रय | नियोजनबद्ध विकासाचे धोरण व औद्योगिकीकरणावर भर |
| आणीबाणी, राजकीय अस्थैर्य अशा वेळी होणारा मानवी अधिकारांचा संकोच | निवडणुकांचे यशस्वी आयोजन व लोकशाही परंपरांवरील जनतेचा विश्वास |
| दुर्बल घटकांचा विकास | सामाजिक न्यायावर आधारलेली समाजरचना |
| महिलांची अप्रतिष्ठा व अन्याय | महिला-बालके व दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी केलेले कायदे |
| मागास वर्गीयांवरील दडपशाही | अॅट्रॉसिटीसारखे कडक कायदे व संविधानाने दिलेले संरक्षण |
| शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण | भारताची अण्वस्त्रसज्जता |
| फुटीरतावादी चळवळी | सशस्त्र लष्करी ताकद |
| वाढता जमातवाद व प्रदेशवाद | जनतेतील ऐक्यभावना, राजकीय इच्छाशक्ती व शासनाचे कल्याणकारी कायदे |
| राजकीय भ्रष्टाचार | खुल्या वातावरणातील निवडणुका व स्वतंत्र न्यायव्यवस्था |
Click on link to get PDF from store
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-२ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - नोट्स
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-२ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Useful links :
| Main Page : - Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा १ : इतिहासाची साधने - online solutions Next Chapter : धडा ३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - online solutions |
