Solutions-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Maharashtra Board

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10-Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.

(1) संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ...... मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

उत्तर :

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर इंटर्नल/प्रायमरी मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

कारण : प्रक्रिया सी.पी.यू. मध्ये केल्या जातात. प्रायमरी मेमरी ही सी.पी.यू. मध्ये असते.

रीड ओन्ली मेमरी (ROM) या संगणकाच्या स्वतःच्या मेमरीमध्ये डाटा आपण फक्त वाचू शकतो. इंटरनल/प्रायमरी मेमरीमध्ये आपण या डाटाची प्रक्रिया करू शकतो आणि संपादितही करू शकतो.

(2) शास्त्रज्ञांच्या शोधाबद्द्ल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना .........चा वापर करता येईल.

उत्तर :

शास्त्रज्ञांच्या शोधाबद्द्ल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट चा वापर करता येईल.

कारण : पॉवरपॉइंटमध्ये एकाच स्लाइडवर मजकूर, चित्रे, व्हिडिओ घेता येतात.

(3) प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयर करण्यासाठी.......वापरतात.

उत्तर :

प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल (स्प्रेडशीट) वापरतात.

कारण : मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये विविध प्रकारचे आलेख, चार्ट्स (तक्ते) तयार करण्याची

सोय आहे.

(4) पहिल्या पिढीतील संगणक ..........मुळे बंद पडत होते.

उत्तर :

पहिल्या पिढीतील संगणक उष्णता निर्मिती मुळे बंद पडत होते.

कारण : पहिल्या पिढीत निर्वात नलिका वापरल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असे. विजेच्या जादा वापरामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होऊन निर्वात नलिका तापल्याने

निकामी होत. परिणामी संगणक चटकन बंद पडत.

(5) संगणकास ........ दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार नाही.

उत्तर :

संगणकास विद्युत पुरवठा दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार नाही.

कारण : संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन असून त्याचे कार्य सुरू राहण्यासाठी विद्युत पुरवठ्याची (इलेक्ट्रिक सप्लाय) आवश्यकता असते.

प्रश्न 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर :

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषणाची भूमिका खालीलप्रमाणे:

  • विज्ञान तंत्रज्ञानामुळे विज्ञान विषय शिकणे आता सोपे आणि अधिक समृद्ध झाले आहे.
  • विद्यार्थ्यांना सिम्युलेशनच्या मदतीने धोकादायक आणि महागडे प्रयोग करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.
  • हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना घरच्या घरी प्रयोग करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व :

  • शास्त्रीय माहिती जमा करण्यासाठी : आंतरजाल, न्यूजग्रूप, ब्लॉग यांसारख्या आधुनिक साधनांच्या मदतीने शास्त्रीय माहिती उपलब्ध होते. उदा., पचनसंस्था.
  • सादरीकरण : पॉवरपॉइंटच्या मदतीने प्रेझेटेशन तयार करून सादरीकरणाद्वारे वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतात. उदा., बेडकाचा जीवनक्रम.
  • अंदाज वर्तवण्यासाठी : शास्त्रीय माहितीवर प्रक्रिया करून अंदाज वर्तवण्यासाठी उपयोग होतो. उदा., हवामानाचा अंदाज.
  • अध्ययनास सहकार्य : सहकारी, तज्ज्ञ शिक्षक, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने शिकण्याची संधी मिळते.

() संगणकातील कोणकोणत्या अॅप्लीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला? कशाप्रकारे ?

उत्तर :

विज्ञानाचा अभ्यास करताना अनेक अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. पुढील अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर विज्ञानाचा अभ्यास करताना झाला :

स्पेशलाइझ्ड अँप्लिकेशन सॉफ्टवेअर : ग्राफिक्स, वेब, ऑथरिंग, सर्च इंजिन्स इत्यादी.

जनरल पर्पझ अँप्लिकेशन सॉफ्टवेअर : वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, ब्राऊझर्स, इत्यादी.

  • वर्ड प्रोसेसर (मायक्रोसॉफ्ट वर्ड) : प्रात्यक्षिक कार्याचे तसेच प्रोजेक्टचे लेखन कार्य करण्यासाठी.
  • स्प्रेडशीट (मायक्रोसॉफ्ट एक्सेल) : प्रयोगाचे गणन करणे तसेच आलेख काढण्यासाठी.
  • प्रेझेंटेशन (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) : आकर्षक, मनोरंजक सादरीकरण तयार करण्यासाठी.
  • ब्राऊझर्स : ब्राऊझर्सच्या मदतीने वेबसाइटवरील माहिती शोधण्यासाठी. विज्ञान विषय घटकाशी निगडित माहिती जमा करण्यासाठी उपयुक्त.

() संगणकाचे कार्य कशा पध्द्तीने चालते ?

उत्तर :

संगणकाचे कार्य : संगणकाचे कार्य तीन टप्प्यांमधे चालते.

  • इनपुट डिव्हाइसेसमार्फत संगणकास माहिती पुरवली जाते. साधारणत: यासाठी Key-Board चा वापर केला जातो.
  • पुरवलेल्या माहितीवर सीपीयूमध्ये बसवलेला प्रोसेसर प्रक्रिया करतो.
  • प्रक्रिया झाल्यावर तयाार झालेले उत्तर आऊटपुट डिव्हाइसेसमार्फत वापरकर्त्यास मिळते. साधारणत: आऊटपुट युनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटरचा वापर केला जातो.

() संगणकातील विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?

उत्तर :

संगणकातील विविध सॉफ्टवेअर वापरताना घ्यावयाची काळजी पुढीलप्रमाणे :

  • अधिकृत परवानाधारक सॉफ्टवेअरचा परवानगी घेऊनच वापर करावा.
  • फ्रीवेअर सॉफ्टवेअरशिवाय इतर परवानाधारक अधिकृत सॉफ्टवेअरच इन्स्टॉल/लोड करावे.
  • अधिकृत स्रोताद्वारे माहिती अक्सेस करावी. इतरांच्या फाइल्स त्याच्या परवानगीशिवाय अॅक्सेस करू नयेत.
  • सायबर लॉचा भंग होणार नाही या दृष्टीने अधिकृत मार्गानेच वैध सॉफ्टवेअरची खरेदी करून त्याचा वापर करावा.

() माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो?

उत्तर :

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने : दूरध्वनी, मोबाइल, संगणक, रेडिओ, दूरदर्शन, आंतरजाल (इंटरनेट), ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने आहेत.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा विज्ञानातील वापर :

  • मोबाइल : विज्ञानविषयक व्याख्याने, शैक्षणिक स्थळांना भेटी यांचे ध्वनिमुद्रण व चित्रीकरण करून ते पुन्हा ऐकले व पाहिले जाते. विज्ञानविषयक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो.
  • दूरदर्शन : विज्ञानविषयक शैक्षणिक पाठांचे निरीक्षण करता येते. नॅशनल जिऑग्राफीक, अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी या वाहिन्यांवरील विज्ञानविषयक कार्यक्रमांचे निरीक्षण करून आवश्यक ती माहिती मिळवता येते.
  • संगणक : विज्ञानविषयक माहिती साठवून ठेवणे, सादरीकरण, आलेख निर्मितीसाठी संगणक या साधनांचा वापर केला जातो.
  • आंतरजाल (इंटरनेट) : संगणक व आंतरजालाद्वारे विज्ञान-विषयक माहिती मिळवणे. विविध वेबसाइटस्ना भेट देणे व आवश्यक माहिती व चित्र कॉपी करून घेणे. वैज्ञानिक प्रयोग व कृतींचे निरीक्षण करणे.

प्रश्न 3. गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र.4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर अॅन्थनी यांच्या गतीचा अंतर - काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल.

उत्तर :

(i) (X,Y) - (काल, अंतर)

(ii) सारणीमध्ये घड्याळी वेळ दिली आहे. त्याऐवजी तासामध्ये 0, 0.5, 1, 1.5, 2, 2.5, 3.0 याप्रमाणे कालावधी घ्यावा.

(iii) वर्कशीटमध्ये माहिती भरून झाल्यानंतर आलेख काढावयाचा सर्व मजकूर शीर्षकासह निवडा.

(iv) इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. इन्सर्ट चार्ट वर क्लिक करा. Line हा चार्ट प्रकार व Line with Markers नमुना निवडा.

प्रश्न 4. संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे?

उत्तर :

संगणकाच्या पिढ्या : संगणकाच्या विकासाचे टप्पे संगणकात वापरले जाणारे तंत्रज्ञान यांच्या कालखंडानुसार केले आहेत. त्यास संगणकाची पिढी असे म्हटले जाते.

  • माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून पाच पिढ्या मानण्यात येतात.

संगणकामधील विद्युतमंडले बनवण्याचा मुख्य घटक कोणता यावरून विविध कालावधीत बनवलेल्या संगणकाच्या पिढ्या पुढीलप्रमाणे आहेत :

(i) पहिली पिढी (कालावधी 1946 ते 1959) : या पिढीतील संगणकात प्रामुख्याने निर्वात नलिका (व्हॅक्यूम ट्यूब्ज) वापरल्या जात. त्यामुळे विजेचा वापर अधिक होत होता. संगणकाचा आकार प्रचंड मोठा होता व वेगही कमी होता. उष्णता निर्मितीमुळे संगणक चटकन बिघडत असे. उष्णता कमी करण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर करावा लागत असे.

 (ii) दुसरी पिढी : (कालावधी 1959 ते 1963) दुसऱ्या पिढीत व्हॅक्यूम ट्यूब्जच्या जागी ट्रान्झिस्टर्संचा वापर करण्यात आला. त्यामुळे तुलनेने संगणकाचा आकार कमी झाला, वेग वाढला, वीज वापर कमी झाला.

(iii) तिसरी पिढी (कालावधी 1964 ते 1971) : तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये इंटिग्रेटेड सर्किट (IC) चा वापर करण्यात आला. हजारो ट्रान्झिस्टर्स, कर्पेसिटर्स व रेझिस्टर्स एका लहान सिलिकॉन चिपच्या तुकड्यावर कोरलेले असल्यामुळे संगणकाचा आकार खूपच कमी होऊन वेग कितीतरी पटींनी वाढला. विजेचा वापर खूपच कमी होऊ लागला.

(iv) चौथी पिढी (कालावधी 1971 ते 1990)  : या पिढीतील संगणकात मायक्रोप्रोसेसरचा उपयोग केला गेला. मॅग्नेटिक कोअर मेमरीऐवजी सेमी कंडक्टर मेमरीचा वापर झाला. निरनिराळ्या संगणक प्रणालीचा विकास व वापर करण्यात येऊ लागला. संगणकाचा आकार व किमती कमी झाल्या, गती ब साठवणक्षमता वाढली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातही संगणकाचा वापर वाढला.

(v) पाचवी पिढी (कालावधी 1990 ते आजअखेर) : एका प्रोसेसमध्ये दोन, चार किंवा आठ कोअरचा वापर करण्यात येत आहे. मल्टिपल कोअर वापरामुळे (पॅरलल प्रोसेसिंग) संगणकाच्या वेगात प्रचंड वाढ झाली आहे. आकार लहान झाला आहे.

जसजशी पुढची पिढी आली, तसतसा संगणकाचा आकार लहान होत गेला, वेग व क्षमता वाढत जाऊन संगणक हाताळणे सोपे झाले आहे. संगणकाची किंमतही कमी झाली आहे.

प्रश्न 5. तुमच्या जवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल.

उत्तर :

स्वतःजवळची असणारी माहिती इतरांना देण्यासाठी पुढील माहिती संप्रेषण साधनांची मदत घेऊ :

  • संगणक व नेटवर्किंग या साधनांच्या मदतीने ब्लॉग, फोरम, चॅटिंग, ई-मेल सादरीकरणाच्या माध्यमातून.
  • दूरध्वनी व मोबाइल या साधनांच्या मदतीने संभाषणात्मक तसेच मजकूर व्हिडिओ स्वरूपात माहितीची देवघेव.
  • दूरदर्शन या साधनाच्या माध्यमातून चर्चा, वादविवाद यांमध्ये सहभागी होऊन माहितीची देवघेव इतरांना करू.

प्रश्न 6. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर Powerpoint Presentations तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

  • घटक निवडून त्यासाठीच्या लेखी स्लाइडस् कागदावर तयार ठेवाव्यात.
  • आवश्यक चित्रे आंतरजालवरून डाऊनलोड करून आकृत्या, तक्ते हे एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवावेत. योग्य क्रमाने हवेत.
  • होम टॅब = न्यू स्लाइड पर्यायावर क्लिक करा. आवश्यकतेनुसार योग्य प्लेस होल्डर्सची स्लाइड निवडा.
  • योग्य मजकूर व चित्राची भर घालून स्लाइडचे फॉरमॅटिंग करा.
  • स्लाइडला ट्रांझिशन्स व अॅनिमेशन इफेक्ट देणे.

प्रश्न 7. संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या ? त्या

सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?

उत्तर :

संगणक वापरताना खालील तांत्रिक समस्या उद्भवल्या:

() वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने प्रविष्ट केलेली माहिती नष्ट झाली.

उपाय: संगणकात माहिती प्रविष्ट करताना, कार्यरत फाइल नियमित अंतराने वारंवार जतन केली जाते. यू.पी.एस. (UPS) यंत्राच्या जोडणीमुळे, वीज पुरवठ्यात किरकोळ बिघाड झाला तरीही काही कालावधीसाठी माहिती जतन केली जाऊ शकते.

() फोटो अपलोड करत असताना नेटवर्कच्या समस्येमुळे फोटो अपलोड होत नव्हता.

उपाय: फोटोचा आकार आणि स्वरूप बदलून अपलोड केला गेला.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Notes

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Solutions

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Text Book

PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF)

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन - Online Solutions

Next Chapter : पाठ-11- प्रकाशाचे परावर्तन - Online Solutions

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *