Solutions-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-8- उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव-Maharashtra Board

उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-8-Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण करा त्याचे स्पष्टीकरण द्या.

(मायकोटॉक्झीन्स, कलिकायन, रायझोबिअम)

() यीस्ट .............. पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.

उत्तर :

यीस्ट कलिकायन पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.

स्पष्टीकरण : यीस्टमध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते त्यास कलिकायन म्हणतात. कलिकायनात यीस्टच्या पेशीवर छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतात. या यीस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी असतात. अनुकूल परिस्थिती मिळताच कलिंकायन पद्धतीने यीस्ट भराभर वाढते.

() बुरशीजन्य विषारी रसायनांना .......... म्हणतात.

उत्तर :

बुरशीजन्य विषारी रसायनांना मायकोटॉक्झीन्स म्हणतात.

स्पष्टीकरण : कवकांच्या विविध प्रजाती हे विषारी द्रव्य तयार करतात. कवके विघटनाचे काम करताना अन्नातील पोषकद्रव्ये शोषून घेतात आणि त्याच वेळी मायकोटॉक्झीन्स अन्नपदार्थांत

मिसळतात.

() शिंबावर्गीय वनस्पती ..............  मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

उत्तर :

शिंबावर्गीय वनस्पती रायझोबिअम  मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

स्पष्टीकरण : रायझोबिअम हा जीवाणू शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांत सहजीवी म्हणून राहतो. हवेतील आणि मातीतील नायट्रोजन, वनम्पतीला त्याच स्वरूपात घेता येत नाही. रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात. पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबिन, घेवडा व इतर कडधान्ये अशा शिंबावर्गीय (शेंगा) वनस्पतींची 'यजमान' (Host) म्हणून गरज असते. रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळेच डाळी, कडधान्ये प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात.

प्रश्न 2 खालील पदार्थांमध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव आढळतात. त्यांची नावे लिहा.

दही, पाव, कडधान्यांच्या मुळांवरील गाठी, इडली, डोसा, खराब झालेली बटाट्याची भाजी.

उत्तर :

(1) दही - लॅक्टोबॅसिलाय

(2) पाव - यीस्ट

(3) कडधान्यांच्या मुळांवरील गाठी - रायझोबिअम

(4) इडली - यीस्ट

(5) डोसा - यीस्ट

(6) खराब झालेली बटाट्याची भाजी - क्लॉस्ट्रिडिअम.

प्रश्न 3. वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे ?

() न्युमोनिया, घटसर्प, कांजिण्या , कॉलरा.

उत्तर :

कॉलरा. (इतर सर्व श्वसनसंस्थेचे रोग आहेत.)

() लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, किण्व क्लॉस्ट्रीडिअम.

उत्तर :

क्लॉस्ट्रिडिअम. (इतर सर्व उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत.)

() मुळकूज, तांबेरा, रूबेला, मोझॅइक.

उत्तर :

रूबेला. (हा मानवात होणारा विषाणूजन्य रोग आहे. बाकीचे सर्व वनस्पतीमधील रोग आहेत.

प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा.

() उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो.

उत्तर :

उन्हाळ्याच्या दिवसांत जीवाणू आणि कवक यांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आणि तापमान असते. अशा वेळी त्यांचे प्रजनन झपाट्याने होते. खूप वेळ ठेवलेले वरण संसर्गाने असेच खराब होते. यात किण्वनाची प्रक्रिया होऊ लागते. त्यामुळे त्यात कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होते व त्यावर फेस दिसतो.

() कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

उत्तर :

डांबराच्या गोळ्यांमध्ये नॅफ्थॅलिन हा रासायनिक पदार्थ असतो. या पदार्थामुळे कपड्यांना कसर किंवा वाळवी लागत नाही. तसेच कवकांपासून देखील नॅफ्थॅलिन संरक्षण देतो. कपडे चांगले राहावेत आणि टिकावेत यासाठी कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

प्रश्न 5. कवकजन्य रोगाच्या प्रसाराची माध्यमे प्रतिबंधक उपाय लिहा.

उत्तर :

नायटा, गजकर्ण, त्वचारोग यांसारख्या कवकजन्य रोगांचा प्रसार रोग्याच्या संपर्कात राहिले तर होतो. रोग्याच्या वापरलेल्या वस्तू, कपडे, अंथरूण-पांघरूण इत्यादींमधून कवकाचे तंतू किंवा बीजाणू संक्रमित झाले की रोगाचाही प्रसार होतो. वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी योग्य नमणे या गोष्टींमुळे कवकजन्य रोग वेगाने पसरत जातात.

कवकजन्य (बुरशीजन्य) रोगांचे संक्रमण रोखू शकणारे उपाय:

  • योग्य स्वच्छता राखली पाहिजे.
  • केसांची फणी सारखी वैयक्तिक उत्पादने एकमेकांना देणे टाळावे.
  • बुरशीजन्य संसर्ग असलेल्या लोकांशी थेट संपर्क टाळा.
  • संक्रमित वस्तू आणि कपडे स्वच्छ करा किंवा टाकून द्या.

प्रश्न 6. जोड्या जुळवा.

समूह  ‘समूह
रायझोबिअम अन्न विषबाधा
क्लॉस्ट्रिडीअम नायट्रोजन स्थिरीकरण
पेनीसिलिअम बेकरी उत्पादने
यीस्ट प्रति जैविक निर्मिती

उत्तर :

(1) रायझोबिअम – नायट्रोजन स्थिरीकरण

(2) क्लॉस्ट्रिडिअम - अन्न विषबाधा

(3) पेनीसिलिअम - प्रतिजैविक निर्मिती

(4) यीस्ट - बेकरी उत्पादने.

प्रश्न 7. उत्तरे लि हा.

() लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात? का?

उत्तर :

लहान मुलांना नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना लसीकरण केले जाते.

  • अगदी सुरुवातीला पहिल्याच आठवड्यात बी.सी.जी. म्हणजे क्षयरोग प्रतिबंधक लस दिली जाते.
  • नंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या महिन्यांत त्रिगुणी लस (DPT-Diphtheria, Pertussis, Tetanus) दिली जाते. त्यात घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या रोगांच्या प्रतिबंधक लसी असतात.
  • त्रिगुणी लसीच्या वेळी पोलिओचा डोस मुखावटे देण्यात येतो.
  • नंतर नऊ महिन्यांच्या बाळाला MMR (Mumps, Measles,Rubella) म्हणजे गालगुंड, गोवर आणि रूबेल्ला या रोगांच्या प्रतिबंधक लसी एकत्रितपणे देण्यात येतात.
  • शाळेत जाणाऱ्या मुलांना टायफॉइड, कॉलरा या लसी दिल्या जातात. काही वेळा हिपाटायटीसची लस पण दिली जाते.

() लस कशी तयार केली जाते?

उत्तर :

  • पूर्वीच्या काळी रोगकारक जीवाणू माकड, घोडे अशा प्राण्यांत टोचले जात. या रोगजंतूंच्या प्रतिबंधासाठी हे प्रयोगशाळेतील प्राणी काही प्रथिने तयार करीत. त्यांना प्रतिपिंडे म्हणतात. असे पदार्थ त्या प्राण्यांच्या रक्तातून वेगळे करून त्यापासून लस बनवीत.
  • आता जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रयोगशाळेत जीवाणूंच्या साहाय्याने ठरावीक रोगाची लस बनवता येते. यासाठी त्या रोगाच्या जंतूंचा सखोल अभ्यास करण्यात येतो. त्यातील जनुके आणि डीएनए यांची रचना समजून घेतली जाते. या माहितीच्या आधारे त्याच्यावर प्रतिबंध करू शकतील अशी प्रथिने तयार केली जातात. या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार करण्यात येते.
  • काही प्रकारच्या लसी या प्रत्यक्ष रोगजंतूंनीच बनवलेल्या असतात. हे रोगजंतू थोडे क्रियाहीन आणि सुप्त करण्यात येतात. असे रोगजंतू लस म्हणून एखाद्याच्या अंगात टोचले की ते अगोदरच रोगप्रतिकारक क्रिया करतात. जेव्हा याच माणसाला खरोखरच त्या रोगाची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात अगोदरच प्रतिकार करणारी रसायने तयार असतात.

() प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते ?

उत्तर :

सूक्ष्मजीवांमध्ये काही जैवरासायनिक मार्ग असतात जे त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात; उदाहरणार्थ, श्वसन आणि विकर संश्लेषण. प्रतिजैविक या मार्गांसाठी आवश्यक असलेल्या पूर्वसूचकांशी जोडतात आणि त्यांना अवरोधित करतात. आवश्यक जीवन प्रक्रियेच्या अनुपस्थितीत, सूक्ष्मजीव मारले जातात.

उदाहरणार्थ, पेनिसिलिन प्रतिजैविकामध्ये सेल भिंतीची निर्मिती रोखून जीवाणू मारते. एकदा रोग निर्माण करणारा जीव मेला की, रोगाचा फैलाव होत नाही आणि रुग्ण बरा होऊ लागतो.

() मानवाप्रमाणे प्राण्यां नाही प्रतिजैविके दिली जातात का ? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?

उत्तर :

प्राण्यांना देखील रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांनाही जीवाणू, विषाणू आणि रोगकारक कवक यांच्यापासून रोग होतात. त्यांनाही काही प्रतिजैविके देण्यात येतात. परंतु मानवाला बाधित करणारे जीवाणू वेगळे असल्याने त्यांची काही प्रतिजैविके वेगळी असतात. काही प्रतिजैविके मात्र मानवाच्या प्रतिजैविकांसमानच असतात.

() विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?

उत्तर :

विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे जतन करणे आवश्यक आहे कारण:

  • रोगप्रतिकारक प्रतिसाद: लस तयार करण्यासाठी वापरले जाणारे जंतू (सूक्ष्मजीव) मृत किंवा कमकुवत केलेले असतात.हे जंतू शरीरात रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करतात, ज्यामुळे शरीर त्या विशिष्ट रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करते1.
  • सुरक्षितता: जंतू योग्यरित्या जतन केले नाहीत तर ते त्यांच्या संसर्गजन्य अवस्थेत परत येऊ शकतात, ज्यामुळे रोगाचा प्रसार होऊ शकतो.त्यामुळे, जंतू सुरक्षितपणे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे1.
  • संशोधन आणि विकास: भविष्यातील संशोधनासाठी आणि नवीन लसींच्या विकासासाठी जंतूंचे नमुने सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.हे नमुने वैज्ञानिकांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करण्यास मदत करतात

प्रश्न 8. थोडक्यात उत्तरे लिहा.

() विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?

उत्तर :

  • काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुदध उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके (Broad spectrum antibiotics) असे म्हणतात.
  • उदा. अॅम्पीसिलीन, अॅमॉक्झीसीलीन, टेट्रासायक्लीन इत्यादी. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा चा वापर केला जातो.

() किण्वन म्हणजे काय?

उत्तर :

ऑक्सिजनच्या अभावात कर्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साइडमध्ये करण्याच्या प्रक्रियेला किण्वन असे म्हणतात.

() व्याख्या लिहा. ‘प्रतिजैविक

उत्तर :

  • सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत.
  • प्रतिजैविकांची उदाहरण - पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-8- उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव-Notes

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-8- उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव-Solutions

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-8- उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव-Text Book

PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF)

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-7- परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह - Online Solutions

Next Chapter : पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन - Online Solutions

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *