Notes-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Maharashtra Board

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10-Maharashtra Board

Notes

अभ्यासघटक :

  • संगणकाचे महत्त्वाचे घटक
  • विविध सॉफ्ट्वेअर
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व
  • संगणक क्षेत्रातील संधी

आपण माहिती गोळा करण्यासाठी विविध प्रकारचे साधनांचा वापर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे करतो

उदा. फोन (दूरध्वनी, मोबाइल), संगणक आणि नेटवर्किंग हार्डवेअर, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, मायक्रोफोन, रेडिओ, दूरदर्शन, आंतरजाल (इंटरनेट), उपग्रह, फॅक्स (दूरछाया), ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (Information Communication Technology : ICT ) :

  • माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनादूवारे माहितीची निर्मिती, साठवणूक, प्रसारण, देवाणघेवाण, व्यवस्थापन व वापर होय.
  • “माहिती संप्रेषण तंत्रशान ' या संज्ञेत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने आणि त्यांचा वापर याचबरोबर त्यांच्या मदतीने पुरवल्या जाणाऱ्या सेवा यांचाही समावेश होतो.

संगणक :

संगणकाच्या पिढ्या : संगणकाच्या विकासाचे टप्पे संगणकात वापरले जाणारे तंत्रज्ञान यांच्या कालखंडानुसार केले आहेत. त्यास संगणकाची पिढी असे म्हटले जाते.

  • माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाच्या पहिल्या निर्मितीपासून पाच पिढ्या मानण्यात येतात.
  • संगणकामधील विद्युतमंडले बनवण्याचा मुख्य घटक कोणता यावरून विविध कालावधीत बनवलेल्या संगणकाच्या पिढ्या पुढीलप्रमाणे आहेत :
संगणकाच्या पाच पिढ्या :

(i) पहिली पिढी : या पिढीतील संगणकात प्रामुख्याने निर्वात नलिका (व्हॅक्यूम ट्यूब्ज) वापरल्या जात. त्यामुळे विजेचा वापर अधिक होत होता. संगणकाचा आकार प्रचंड मोठा होता व वेगही कमी होता. उष्णता निर्मितीमुळे संगणक चटकन बिघडत असे. उष्णता कमी करण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर करावा लागत असे.

संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते. या काळात ENIAC (Electrical Numerical Integrator And Computer) हा संगणक तयार झाला. अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते जॉन प्रेस्पर एस्केट आणि जॉन माऊचले यांनी 1946 साली या संगणकाची निर्मिती केली.

(ii) दुसरी पिढी : दुसऱ्या पिढीत व्हॅक्यूम ट्यूब्जच्या जागी ट्रान्झिस्टर्संचा वापर करण्यात आला. त्यामुळे तुलनेने संगणकाचा आकार कमी झाला, वेग वाढला, वीज वापर कमी झाला.

(iii) तिसरी पिढी : तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये इंटिग्रेटेड सर्किट (IC) चा वापर करण्यात आला. हजारो ट्रान्झिस्टर्स, कर्पेसिटर्स व रेझिस्टर्स एका लहान सिलिकॉन चिपच्या तुकड्यावर कोरलेले असल्यामुळे संगणकाचा आकार खूपच कमी होऊन वेग कितीतरी पटींनी वाढला. विजेचा वापर खूपच कमी होऊ लागला.

(iv) चौथी पिढी : या पिढीतील संगणकात मायक्रोप्रोसेसरचा उपयोग केला गेला. मॅग्नेटिक कोअर मेमरीऐवजी सेमी कंडक्टर मेमरीचा वापर झाला. निरनिराळ्या संगणक प्रणालीचा विकास व वापर करण्यात येऊ लागला. संगणकाचा आकार व किमती कमी झाल्या, गती ब साठवणक्षमता वाढली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातही संगणकाचा वापर वाढला.

(v) पाचवी पिढी : एका प्रोसेसमध्ये दोन, चार किंवा आठ कोअरचा वापर करण्यात येत आहे. मल्टिपल कोअर वापरामुळे (पॅरलल प्रोसेसिंग) संगणकाच्या वेगात प्रचंड वाढ झाली आहे. आकार लहान झाला आहे.

(vi) सहावी पिढी : सहाव्या पिढीतील संगणक भविष्यात अस्तित्वात येतील. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) कार्य करतील. माणसाप्रमाणे विचार करून निष्कर्ष काढू शकतील, अनेक बोलीभाषा समजू शकतील.

जसजशी पुढची पिढी आली, तसतसा संगणकाचा आकार लहान होत गेला, वेग व क्षमता वाढत जाऊन संगणक हाताळणे सोपे झाले आहे. संगणकाची किंमतही कमी झाली आहे.

[collapse]

सुपर कम्प्युटर : अनेक मायक्रोप्रोसेसर एकमेकांस जोडून पॅरलल प्रोसेसिंगचा (समांतर प्रक्रिया) वापर करून समस्या किंवा गुंतागुंतीच्या क्रिया यांची विभागणी केली जाते. अनेक प्रोसेसरच्या मदतीने समस्या अतिशय जलदरीत्या सोडवल्या जातात.

पुण्याचे संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताचा पहिला सुपर कम्प्युटर “परम ' याची निर्मिती केली. सुपर कम्प्युटरची क्षमता प्रचंड असून प्रतिसेकंद दहा लक्ष अब्ज इतक्या क्रिया तो करू शकतो.

संगणकाची वैशिष्ट्ये : प्रचंड वेग, प्रचंड साठवणक्षमता, कार्यक्षमता, अचूकता, कमी खर्चीक, कामातील सातत्य, पारदर्शकता इत्यादी संगणकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

  • मानवाच्या दैनंदिन जीवनातील असंख्य काम आज संगणकाद्वारे केली जातात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर करणे अनिवार्य ठरत आहे.
  • शिक्षण, उदयोग, बँकिंग, कार्यालये, वैदयकीय, कृषी (शेती), व्यवसाय, कला व मनोरंजन, दळणवळण व संदेशवहन, पर्यटन, खरेदी-विक्री इत्यादी अनेक क्षेत्रांत संगणकाचा वापर केला जातो.

संगणकाचे मुख्य भाग : संगणक तीन भागांनी बनलेला असतो :

  • आदान उपकरणे (इनपुट इिव्हाइसेस) : संगणकास माहिती व सूचना पुरवणाऱ्या साधनांना इनपुट डिव्हाइसेस म्हणतात. उदा., की-बोर्ड, माऊस.
  • सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू) : सीपीयू हे ऑरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट व मेमरी युनिट या तीन भागांचे बनलेले असते.
  • प्रदान उपकरणे (आऊटपुट इिव्हाइसेस) : सीपीयूमध्ये प्रक्रिया झाल्यानंतर संगणकाकडून वापरकर्त्यास माहिती पुरवणाऱ्या साधनांना प्रदान उपकरणे (आऊरपुट डिव्हाइसेस) म्हणतात.

संगणकाचे कार्य : संगणकाचले कार्य तीन टप्प्यांमधे चालते

(i) इनपुट डिव्हाइसेसमार्फत संगणकास माहिती पुरवली जाते.

(ii) पुरवलेल्या माहितीवर सीपीयूमध्ये बसवलेला प्रोसेसर प्रक्रिया करतो.

(iii) प्रक्रिया झाल्यावर तयाार झालेले उत्तर आऊटपुट डिव्हाइसेसमार्फत वापरकर्त्यास मिळते.

संगणकाचे महत्त्वाचे घटक :

मेमरी : ‘‘मेमरी’’ म्हणजे इनपूट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा. कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकारची मेमरी वापरण्यात येते.

  • कॉम्प्युटरची स्वत:ची (Internal Memory)
  • बाहेरून पुरवलेली मेमरी (External Memory)

कॉम्प्युटरची Internal मेमरी : ही मेमरी दोन प्रकारची असते.

  • RAM (Random Access Memory) : ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्टस् पासून तयार केली जाते. कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो.
  • ROM (Read Only Memory) : या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो. मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही.

एक्स्टर्नल/सेकंडरी/दुय्यम मेमरी : ही कायम स्वरूपाची असून आपणांस गरजेनुसार वापरता येते ब त्यात बदलही करता येतो. ही माहिती साठवण्यासाठी मॅग्नेटिक हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, ऑप्टिकल सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क यांचा वापर करता येतो.

ऑपरेटिंग सिस्टिम : कॉम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्राम्सद्वारे केले जाते. यालाच DOS (Disk Operating System) म्हणतात. ऑपरेटींग सिस्टिमशिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही.

प्रोग्राम : प्रोग्राम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह (Group) होय. प्रोग्रॅम्सला सॉफ्टवेअर असेही म्हटले जाते.

डाटा इन्फॉरमेशन :

  • डेटा : मजकूर, अंक, ध्वनी व चित्र स्वरूपांतील कच्ची माहिती म्हणजे डेटा होय. डेटा ही प्रक्रिया न केलेली असंस्कारीत माहिती असते.
  • माहिती (इन्फॉर्मेशन) : डेटावर प्रक्रिया करून त्यातून विशिष्ट असा अन्वयार्थ प्राप्त केला जातो व सुसूत्रपणे मांडण्यात येतो, तेव्हा त्या डेटाचे (कच्च्या सामग्रीचे) माहितीत रूपांतरण होते.

संगणकाचे प्रमुख दोन घटक :

  • हार्डवेअर : संगणकात व संगणकासोबत वापरल्या जाणाऱ्या दृश्य स्वरूपातील सर्व यंत्रभागांचा समावेश यात होतो.
  • सॉफ्टवेअर : सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाला पुरवल्या जाणाऱ्या आज्ञावलींचा संच होय.

विविध सॉफ्ट्वेअर :

सॉफ्टवेअरचे प्रकार : सॉफ्टवेअरचे प्रमुख दोन प्रकार आहेत :

उदाहरणे :

  • ऑपरेटिंग सिस्टिम सॉफ्टवेअर : डॉस युनिक्स, विंडोज, लिनक्स इत्यादी.
  • युटिलिटी सॉफ्टवेअर : ट्रबलशूटिंग, अँटिव्हायरस, अन् इन्स्टॉल, बॅकअप सॉफ्टवेअर इत्यादी.
  • जनरल पर्पझ अँप्लिकेशन सॉफ्टवेअर : वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, ब्राऊझर्स, इत्यादी.
  • स्पेशलाइझ्ड अँप्लिकेशन सॉफ्टवेअर : ग्राफिक्स, वेब, ऑथरिंग, सर्च इंजिन्स इत्यादी.

जनरल पर्पझ अँप्लिकेशन सॉफ्टवेअर - एम. एस. ऑफिस :

  • वर्ड प्रोसेसर (मायक्रोसॉफ्ट वर्ड) : प्रात्यक्षिक कार्याचे तसेच प्रोजेक्टचे लेखन कार्य करण्यासाठी.
  • स्प्रेडशीट (मायक्रोसॉफ्ट एक्सेल) : प्रयोगाचे गणन करणे तसेच आलेख काढण्यासाठी.
  • प्रेझेंटेशन (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) : आकर्षक, मनोरंजक सादरीकरण तयार करण्यासाठी.
  • ब्राऊझर्स : ब्राऊझर्सच्या मदतीने वेबसाइटवरील माहिती शोधण्यासाठी. विज्ञान विषय घटकाशी निगडित माहिती जमा करण्यासाठी उपयुक्त.

(i) वर्ड प्रोसेसर : हे शब्दांवर प्रक्रिया करणारे सॉफ्टवेअर असून याच्या अंतर्गत मजकुराचे लेखन, जतन, संपादन, मांडणी करणे शक्य होते. मजकुरातील चुका, त्रुटी दुरुस्त करता येतात. मजकुरात आवश्यक तो बदल करता येतो. मजकुराची जागा बदलता येते, नवीन मजकुराची भर घालता येते. यात आलेख, चित्रे, तक्ते, टेबल, समीकरणे यांचाही समावेश करता येतो.

(ii) स्प्रेडशीट : हा प्रामुख्याने गणिती क्रियांसाठी, अकाउंटसाठी तयार करण्यात आलेला प्रोग्रॅम असून, यामध्ये आकडेमोड अतिशय जलद गतीने केली जाते. गणन करणे, तक्ते तयार करणे, आलेख काढणे, पगारपत्रके, निकालपत्रके इत्यादी कामे सुलभपणे करण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त आहे.

स्प्रेडशीटमध्ये डेटा पुरवताना घ्यावयाची काळजी :

स्प्रेडशीटमध्ये डेटा पुरवताना घ्यावयाची काळजी :

  • डेटा पुरवताना टेबल स्वरूपात ठेवावा.
  • निरनिराळ्या प्रकारच्या डेटासाठी निरनिराळ्या सेल्सचा (Cells) वापर करावा.
  • डेटा पुरवताना नीटनेटका व एकाच फ्लोमध्ये असावा.
  • गरजेनुसारच स्पेस व स्पेशल कॅरॅक्टरस्टिकचा वापर करावा. अनावश्यक वापर टाळावा.
  • योग्य स्मार्ट टॅग (Smart tag) चा वापर करून डेटा ड्रॅग आणि फिल (Drag and Fill) करावा.
  • डेटा पुरवल्यानंतर आवश्यक ते फॉरमॅटिंग करावे व फॉर्म्युल्याचा वापर करून गणन करावे.
  • फॉर्म्युला वापरताना ' = ' हे चिन्ह दयावे व त्यापुढे कोणताही स्पेस न देता फॉर्म्युला टाइप करावा.

[collapse]

(iii) प्रेझेंटेशन : सादरीकरणासाठी बनवण्यात येणाऱ्या फाइलला प्रेझेंटेशन म्हणतात. प्रेझेंटेशनमध्ये अनेक स्लाइडस् असतात.

(iv) वेब ब्राउझर : इंटरनेट एक्सप्लोअरर हा एक ब्राऊझर असून त्याच्या मदतीने आपण इंटरनेटवरील विविध साइटस व वेब पेजस पाहू शकतो. याशिवाय अँपल सफारी, गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज आणि मोझिला फायरफॉक्स हे चार प्रसिद्ध ब्राउझर्स आहेत.

PDF (Portable Document Format) : पोटेंबल डॉक्युमेंट फॉरमॅट हे एक जनरल पर्यझ अँप्लिकेशन सॉफ्टवेअर असून यामध्ये कोणत्याही अँप्लिकेशन सॉफ्टवेअरशिवाय PDF स्वरूपातील फाइल पाहता येते; तसेच त्या फाइलची छपाई करता येते. सध्या लोकप्रिय व मोठ्या प्रमाणात ADOBE READER - PDF फाइल व्ह्यूअर वापरला जातो.

सर्च इंजिन्स : सर्च इंजिन हे स्पेशलाइइड प्रोग्रॅम्स असून ते वेब आणि इंटरनेटवरील माहिती शोधण्यास मदत करतात. बिंग, गुगल, आस्क, याहूही काही प्रमुख सर्च इंजिन्सची उदाहरणे आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व :

  • शास्त्रीय माहिती जमा करण्यासाठी : आंतरजाल, न्यूजग्रूप, ब्लॉग यांसारख्या आधुनिक साधनांच्या मदतीने शास्त्रीय माहिती उपलब्ध होते. उदा., पचनसंस्था.
  • सादरीकरण :पॉवरपॉइंटच्या मदतीने प्रेझेंटेशन तयार करून सादरीकरणाद्वारे वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतात. उदा., बेडकाचा जीवनक्रम.
  • अंदाज वर्तवण्यासाठी : शास्त्रीय माहितीवर प्रक्रिया करून अंदाज वर्तबण्यासाठी उपयोग होतो. उदा., हवामानाचा अंदाज.
  • अध्ययनास सहकार्य : सहकारी , तज्ज्ञ शिक्षक, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने शिकण्याची संधी मिळते.

संगणक क्षेत्रातील संधी

  • सॉफ्टवेअर क्षेत्र : हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. सॉफ्टवेअर तयार करण्याच आव्हान स्वीकारून अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधींचे वर्गीकरण पुढीलप्रकारे करता येईल - अॅप्लीकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट, ऑपरेटींग सिस्टिम आणि युटिलीटी डेव्हलपमेंट, स्पेशल पर्पज सायंटिफिक अॅप्लीकेशन
  • हार्डवेअर क्षेत्र : आता आपल्या देशातही संगणक तयार करणाऱ्या कंपन्या बऱ्याच आहेत. त्या स्वत:चे बनवलेले संगणक विकतात. तर काही बाहेरून आणून विकतात, दुरुस्त करतात, तर मोठ्या कंपन्यातून अनेक संगणक सतत कार्यक्षम रहावेत, बंद पडूच नयेत यासाठी देखभाल करण्याचे कंत्राटी काम घेतात. त्यात भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. हार्डवेअर डिझायनिंग, हार्डवेअर प्रोडक्शन, हार्डवेअर जुळणी (असेंब्लींग आणि टेस्टिंग), हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग व दुरुस्ती इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
  • प्रशिक्षण : वेगवेगळ्या कामांसाठी नव्यांना शिकविणारे ट्रेनिंग फिल्ड फारच मोठे आहे. स्वत: समरस होऊन शिकवि णारे आणि संगणक विषयात कार्यक्षम असणारे प्रशिक्षक महत्त्वाचे आहेत.
  • मार्केटिंग : संगणक व त्याला पूरक सामग्री (अॅक्सेसरीज) तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या खूप संस्था आहेत. त्यांना विक्री कुशल असणारे लोक पाहिजे असतात. त्यांना संगणकाची कार्य पद्धती, अनुभव याबरोबरच मार्केटिंग मधील कौशल्य असले पाहिजे.
सी—डॅक :

सीडॅक (Centre for Development of Advance Computing) :

  • संगणक क्षेत्रात संशोधन कार्य करणारी भारतातील एक प्रमुख संस्था असून ती पुणे येथे आहे.
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिल्या सुपरसंगणकाची (परम संगणक) निर्मिती या संस्थेत करण्यात आली.
  • अनेक भारतीय भाषांत लेखन करण्यासाठी ISCII (Indian Script Code for Information Interchange) (इस्की) कोडच्या निर्मितीत C-DAC या संस्थेचा मोठा हातभार आहे.
  • भारतीय भाषांचे व्याकरण विचारात घेऊन INSCRIPT KEYBOARD ची निर्मिती करण्याचा प्रथम मान सी-डॅक या संस्थेस मिळतो.

[collapse]
PDF-Notes, Solution, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Notes

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Solutions

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा-Text Book

PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF)

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन - online notes

Next Chapter : पाठ-11- प्रकाशाचे परावर्तन - online notes

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *