Notes-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन-Maharashtra Board

पर्यावरणीय व्यवस्थापन

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9-Maharashtra Board

Notes

अभ्यासघटक :

  • हवामान
  • हवामान शास्त्र
  • घनकचरा व्यवस्थापन
  • आपत्ती व्यवस्थापन

हवामान (Climate) :

हवामान : हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणी ठरावीक वेळेला असलेली वातावरणाची स्थिती होय. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात.

प्रादेशिक हवामान : एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे प्रादेशिक हवामान होय.

हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी कारणीभूत असणारे घटक :

हवामानातील बदल (Change in Weather) :

निसर्गत: हवामान सतत बदलत राहत नाही. एका ठरावीक प्रदेशातील आणि ठरावीक वेळेसाठी हवामान दीर्घकाळासाठी सारखेच राहते.

हवामानाची दैनंदिन जीवनामधली महत्त्वाची भूमिका : पुढील गोष्टी हवामानावर अवलंबून असतात :

  • अन्न, वस्त्र, निवारा अशा प्राथमिक गरजा; विविध व्यवसाय, शेती व पिके, बांधकामे इत्यादी.
  • वाऱ्याची दिशा व गती, तापमान व हवेचा दाब अशा बाबी; विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, बंदरनिर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे आदी योजनांमध्ये लक्षात घेतल्या जातात.
  • 23 मार्च हा दिवस “जागतिक हवामानशास्त्र दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व (Importance of Weather for Living World)

  • दैनंदिन तसेच दीर्घ कालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवनपद्धतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. भूपृष्ठ, जलाशये , वनस्पती व प्राणी मि ळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते. हे पर्यावरण सजीवांच्या विकासास कारणीभूत ठरते.
  • एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोषाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती निवडण्यास त्या प्रदेशातील हवामान साहाय्यभूत ठरते. उदाहरणार्थ काश्मिरी तसेच राजस्था नमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान.
  • सागरजलाची क्षारता, सागरप्रवाहांची निर्मिती व जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाच्या विविध घटकांशीच संबंधि त आहेत.
  • भूपृष्ठाच्या आच्छा दनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात.
  • मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
  • मातीत असणाऱ्या जीवाणूंचा सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असतो. ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते.
  • वातावरण व हवामानशास्त्रा चा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टीकोनातून फारच महत्त्वाचा आहे.

हवामानाचा अभ्यास :

जगातील बहुतेक देशांत हवामान खाते किंवा वेधशाळा स्थापन केलेली असते. वेधशाळा आधुनिक यंत्रसामग्री व उपकरणांनी सुसज्ज असतात. पूर्वीच्या आणि आताच्या हवामानाचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या हवामान बदलाचा अभ्यास वेधशाळेमार्फत केला जातो.

हवा (Weather) आणि हवामानातील (Climate) फरक :

हवा (Weather) आणि हवामानातील (Climate) फरक :

हवा (Weather) हवामान (Climate)
मानवी जीवनावर परिणाम करणारी वातावरणाची परिस्थिती यावर हवा* (Weather) अवलंबून असते. अशा हवेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. हवामान (Climate) म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान. काही शास्त्रज्ञांनी असे नमूद करून ठेवले आहे की, ठरावीक प्रदेशातील सलग तीन वर्षांच्या हवेच्या परिस्थितीची सरासरी म्हणजे ते त्या प्रदेशाचे हवामान.
तापमान, आर्द्रता, संघनन, ढगाळ आसमंत, प्रखर प्रकाश दृश्यता, वारे आणि वातावरणाचा कमी-अधिक दाब अशा अनेक घटकांप्रमाणे हवा बदलत असते. हवामान-अभ्यासकांच्या मते, “तुम्हांला ज्याची अपेक्षा असते ते म्हणजे हवामान आणि प्रत्यक्षात तुम्हांला जे अनुभवावे लागते ती म्हणजे हवा.
प्रत्येक मिनिटाला, तासाला, दिवसाला किंवा ऋतूला हवाबदल होत असतो. हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो.

हवामानशास्त्र (Meteorology) :

  • हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे , पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास व विश्लेषण हवामानशास्त्र करते.
  • हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट इत्यादी अशा अनेक घटकांचा अभ्यास याद्वारे केला जातो.
  • भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. अशा अंदाजांचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
हवामान संस्थांविषयी माहिती :

हवामान संस्थांविषयी माहिती :

(i) जागतिक हवामानशास्त्र संघटना (World Meteorological Organization) :  या संस्थेची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 23 मार्च 1950 रोजी करण्यात आली. ही संस्था अन्नसुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण यांबाबत कार्य करते.

(ii) भारतीय हवामान खाते (Indian Meteorology Department ) :

स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. त्याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. गुवाहाटी, मुंबई, कोलकता, चेन्नई, नागपूर व नवी दिल्ली येथे याची प्रादेशिक कार्यालये आहेत.

कार्य :

  • 24 तासांत 2 वेळा हवा कशी राहील याचे नकाशे तयार करणे.
  • संशोधन : हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंपमापनाशी निगडित हवामानाचे अंदाज, पर्जन्य अंदाज. उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे आणि पर्जन्याचे अंदाज, हवा प्रदूषण.
  • नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना सर्व प्रसिद्धी माध्यमे व नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
  • विमान उड्डाण खाते, नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांना हवामानविषयक माहिती देणे.
  • अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे वेधशाळेत विश्लेषण करणे.

मान्सून प्रारूप हवामानाचा अंदाज (Monsoon Model and Climate Prediction) :

भारतातील मान्सूनसंबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्यासाठी मान्सून प्रारूप तयार केली जातात. एच. एफ. ब्लेनफोर्ड व सर गिल्बर्ट वॉकर या दोघांनी सुरुवातीला मान्सूनचे अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न केले. 1990 च्या दशकात डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी मान्सूनचे प्रारूप तयार केले.

प्रारूपाचे पुढीलप्रमाणे प्रकार आहेत :

  • संख्यात्मक प्रारूप (डायनॅमिक) / गणितीय मॉडेल : हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपांद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. हवामानाची चालू निरीक्षणे वापरून परम संगणकाच्या साहाय्याने गणिती प्रक्रिया केल्या जातात. गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडली जातात.
  • समुच्चित प्रारूप : अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे, अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. सध्या IMD तर्फे दिला जाणारा अंदाज अशाच प्रकारे अनेक प्रारूपांचे एकत्रित फलित असते. याला समुच्चित प्रारूप म्हणतात.
  • सांखियकी प्रारूप : गतकाळात विविध प्रदेशांत समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होतायांचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो.
IMD = Indian Meteorological Department

IITM = Indian Institute of Tropical Meteorology

घनकचरा व्यवस्थापनः काळाची गरज (Solid Waste Management ) :

घनकचरा : नको असलेले घन स्वरूपातले टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनकचरा होय. आपल्याला त्याची आवश्यकता वाटली नाही की आपण ते फेकून देतो.

  • घरगुती कचरा, औद्योगिक कचरा म्हणजेच कारखान्यांतून येणारा घनकचरा, जैववेद्यकीय कारणांनी निर्माण होणारा कचरा, ई-वेस्ट, प्लास्टिक अशा अनेक प्रकारे घनकचरा निर्माण होतो. त्या त्या पदार्थांचा घनकचऱ्यात समावेश होतो. या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
  • टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात.
  • संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या असून यामुळे सर्वच परिसंस्थांचे प्रदूषण होते. आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने घनकचरा मोठी समस्या आहे.
  • अयोग्य घनकचरा व्यवस्थापन आणि साचलेला घनकचरा हे विविध आपत्तींचे प्रमुख कारण ठरू शकते.
  • पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम टाळायचे असतील, तर घनकचऱ्याचा यथायोग्य विनिमय केला पाहिजे.

टाकाऊ पदार्थांचे प्रामुख्याने विघटनशील आणि अविघटनशील अशा दोन गटांमध्ये विभाजन होते :

विघटनशील कचरा (Biodegradable waste) :

  • या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते.
  • यामध्ये स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादींचा समावेश होतो.
  • हा कचरा मुख्यत: सेंद्रीय प्रकारचा असून यालाच आपण ओला घन कचरा म्हणतो.
  • याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासून उत्तम प्रकारचे खत व इंधन मिळते.

अविघटनशील कचरा (Non-biodegradable waste)  :

  • या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही,
  • कारण यांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो शिवाय विविध तंत्रांचाही वापर करावा लागतो.
  • यामध्ये प्लॅस्टिक, धातू वा यांसारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात.

घनकचऱ्याचे दुष्परिणाम :

(i) सजीवांच्या विविधतेवर परिणाम : घनकचऱ्यामुळे आणि त्यातून येणाऱ्या दर्पांमुळे पक्षी तेथे येण्याचे टाळतात. अशा प्रदूषित ठिकाणांपासून पक्षी स्थलांतरित होतात. यामुळे पक्ष्यांची जैवविविधता नष्ट होते.

(ii) कचऱ्याची दुर्गंधी : कचरा साठवला गेला की, त्या परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरते. जसजशी कचऱ्यावर विघटन प्रक्रिया होत असते, तसतशी आणखी दुर्गंधी पसरत जाते.

(iii) विषारी वायू निर्मिती : हायड्रोजन सल्फाइड (H2S), मिथेन (CH4) आणि कार्बन डायऑक्साइड (CO2) यांसारखे हानिकारक वायू कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी किंवा जमीन भरण ठिकाणाहून बाहेर पडतात. हे विषारी वायू आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतात.

(iv) नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास :  ज्या ठिकाणी घनकचरा पसरलेल्या स्वरूपात राहतो, तेथील परिसर गलिच्छ दिसतो. तेथील परिसरातील नैसर्गिक सौंदर्य नाहीसे होते.

(v) हवा, माती आणि जल प्रदूषण :

  • कचऱ्याचे जैविक विघटन होताना तसेच ज्वलन केल्यास विषारी वायूंची निर्मिती होते. कचऱ्याला आग लावल्याने त्याची घनता कमी होते; परंतु त्यामुळे विषारी वायू आणि राख व धूलिकण हवेत मिसळतात.
  • मातीच्या विघटनाच्या कार्यात अविघटनशील पदार्थांमुळे अडथळा होतो. मातीचे विघटन करणाऱ्या सूक्ष्मजीवांना देखील धोका पोहोचतो. घनकचऱ्यातील रासायनिक संयुगामुळे जमिनी खाऱ्या व आम्लयुक्त होतात.
  • घनकचरा साठवला गेलेल्या ठिकाणाहून दूषित द्रव्ये जवळपासच्या पाण्याच्या साठ्यात पाझरतात. दूषित द्रव्यांमुळे तसेच रोगकारक सुक्ष्मजीवांमुळे शुद्ध पाणी प्रदूषित होते.

(vi) रोगप्रसार : घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे अनेक रोगांचा फैलाव होतो.

  • आमांश, जुलाब आणि कॉलरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • कचरा असणाऱ्या परिसरात अस्वच्छ पर्यावरणीय स्थिती निर्माण होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो.
  • डास, माश्या, उंदीर अशा रोगकारक सजीवांचा सुळसुळाट होतो. यामुळे रोगांचा प्रसार अधिकच प्रमाणात होतो.
  • खराब अन्न आणि भाज्या असलेल्या प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यामुळे गायी –गुरे आजारी पडतात. भटक्या जनावरांमध्ये पोटाच्या कर्करोगासारखे घातक आजार यामुळे होतात.

घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता :

  • पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी
  • ऊर्जानिर्मिती तसेच खतनिर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती/कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी
  • घनकचरा प्रक्रिये द्वारा नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी.
  • आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी

घनकचऱ्याचे व्यवस्थापनाची विविध पध्दती :

  • कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण.
  • जैववैदयकीय कचरा व्यवस्थापन (भट्टीद् वारे उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन).
  • पायरोलिसिस (उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती. उदा., बायोगॅस, जैववायूपासून विद्युतऊर्जा निर्मिती प्रकल्प).
  • कंपोस्टिंग (सेंद्रिय खत).
  • औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन (भूमिभरणाची पद्धती).
  • सुरक्षित भूमिभरणाची स्थळे.
  • गांडूळ खतनिर्मिती.

घनकचरा व्यवस्था पनाची 7 तत्त्वे  :

  • पुनर्वापर (Reuse) : वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्या .
  • वापर नाकारणे (Refuse) : प्लॅस्टिक व थर्मोकोल यांसारख्या अविघटनशील पदार्थां पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे.
  • चक्रीकरण (Recycle) : टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्री करण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करणे. उदा, कागद, काच, यांचे पुनर्चक्रीकरण करता येते.
  • पुनर्विचार (Rethink) : दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्या बाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे.
  • वापर कमी करणे (Reduce) : साधनसंपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे. अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करणे. वापरा व फेका (Use and Throw) अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळणे.
  • संशोधन (Research) : तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील यासंबंधीचे संशोधन करणे.
  • नियमन/जनजागृती (Regulate and Public Awareness) : कचरा व्यवस्था पनाबाबतचे कायदे, नियम स्वतः पाळणे व इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करणे.
कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी :

कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी :  कचऱ्याच्या निरनिराळ्या पदार्थांच्या विघटनासाठी लागणारा कालावधी वेगवेगळा आहे. खूप जास्त कालावधी लागणारे पदार्थ यामुळेच पर्यावरणाला खूप धोकादायक असतात.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) :

  • आपत्ती या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतात. वीज पडणे, महापूर, आग किंवा वणवा, भूकंप या नैसर्गिक आपत्ती आहेत. अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, दंगल, गदींच्या ठिकाणी झालेली चेंगराचेंगरी या मानवनिर्मित आपत्ती आहेत.
  • कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक हानी होते.
जीवित हानी प्रकार :

जीवित हानी कोणत्या प्रकारची आहे हे आपत्तीच्या स्वरूपावर अवलंबून आहे.

उदा.,

  • आगीमुळे होणारे मृत्यू हे वेळीच मदत न मिळाल्यामुळे किंवा कोंडले गेल्याने झालेले असतात.
  • महापूर, त्सुनामी, वादळ अशा घटनांत माणसे बुडून मरण पावतात.
  • पोहता येत नसल्याने किंवा सुरक्षित ठिकाणी न जाता आल्यामुळे त्यांना प्राणास मुकावे लागते. भूकंप, भू-स्खलन अशा वेळी पक्क्या घरात न राहणारे माती-विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून मरतात.
  • एकच बाब या सर्व आपत्तीत सारखी असते. ती म्हणजे वेळेवर मदत न मिळाल्याने आपत्तीग्रस्त प्राणास मुकतो.

आपत्ती व्यवस्थापन : आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय याद्वारे अंमल-बजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया होय. यात पुढील बाबींचा समावेश होतो.

  • आपत्ती मुळे होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करणे.
  • धारणाक्षमता बांधणी करणे.
  • आपत्ती निवारण करणे/धोक्याचे स्वरूप व व्याप्ती कमी करणे.
  • आपत्तीचा सामना करण्याची पूर्व तयारी करणे.
  • आपत्तीच्या परिस्थितीत तत्काळ कृती करणे.
  • आपत्तीने झालेल्या हानीचा व तिच्या तीव्रतेचा अंदाज घेणे.
  • सुटका व मदतकार्य करणे.
  • पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करणे.

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांना प्रथमोपचार :

  • प्रथमोपचाराचे उद्देश : जीवित हानी टाळणे. वैद्यकीय मदत येईतो आपदग्रस्त व्यक्तीच्या प्रकृतीला जमेल तेवढा आराम देणे. प्रकृती खराब होत जाण्यापासून रोखणे आणि पुनर्लांभाची प्रक्रिया सुरू करणे.
  • प्रथमोपचाराची मूलतत्त्वे : सुचेतनता आणि पुनरुज्जीवन (Life and Resuscitation).
  • श्वसनमार्ग (Airway) : आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल, तर श्वासनलिका खुली राहण्यासाठी डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे.
  • श्वासोच्छ्वास (Breathing) : श्वसन बंद झाले असेल, तर॒ आपद्ग्रस्ताला तोंडातून कृत्रिम
  • श्वासोच्छ्वास दावा.
  • रक्ताभिसरण (Circulation) : जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोछ्वास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio - Pulmonary Resuscitation) म्हणतात. आपद्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.

रुग्णाचे/आपदग्रस्ताचे वहन :

  • पाळणा पद्धत,
  • पाठुंगळीला मारणे,
  • मानवी कुबडी पद्धत,
  • खेचून नेणे किंवा उचलून नेणे,
  • चार हातांची बैठक,
  • दोन हातांची बैठक,
  • स्ट्रेचवरून हलवणे.

आपत्तीकाळातील इतर साधने :

महापूर : बोटी, लाकडी फळ्या, बांबूंचा तराफा तसेच हवा भरलेली टायरची ट्युब इत्यादी.

आग : अग्नीशामक यंत्र.

PDF-Notes, Solution, Text Book

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *