Notes-Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Maharashtra Board

पर्यावरणीय व्यवस्थापन

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4-Maharashtra Board

Notes

अभ्यासघटक :

  • परिसंस्था (पुनरावलोकन)
  • पर्यावरण व परिसंस्था संबंध
  • पर्यावरण संवर्धन
  • पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता
  • जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे

परिसंस्था (पुनरावलोकन) (ecosystem):

परिसंस्था : एखाद्या परिसरात असणारे जैविक आणि अजैविक घटक, तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया परिसंस्था तयार करतात. परिसंस्थेत प्रत्येक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

  • वनस्पती अन्ननिर्मिती करतात.
  • हरिण, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी या वनस्पती खाऊन वाढतात.
  • या शाकाहारी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम वाघ व सिंह यांसारखे मांसाहारी प्राणी करतात.
  • निसर्गात आढळणारे विघटक जीवाणू, अळ्या, वाळवी इत्यादी निसर्ग सफाईची महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
  • मानवाचे अस्तित्व या घटकांमुळेच टिकून राहते. यासाठी प्रत्येक परिसंस्थेतील सर्व घटकांचे योग्य ते संतुलन टिकवणे गरजेचे आहे.

परिसंस्थेतील विविध घटक :

  • अजैविक घटक - हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता वगैरे.
  • जैविक घटक -- सर्व प्रकारचे सजीव, जसे जीवाणू, कवक, वनस्पती आणि प्राणी.

भक्षकांचे प्रकार : प्राथमिक, दूवितीय, तृतीयक किंवा सर्वोच्च असे भक्षकांचे प्रकार आहेत. निरनिराळ्या

पोषणपातळ्यांप्रमाणे भक्षकांचे प्रकार असतात.

अन्नसाखळी : प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेच्या क़माला अन्नसाखळी म्हणतात. प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, दुवितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा चार वा पाचहुन अधिक कड्या असतात. या कड्या सरळ रेषेतच असतात.

अन्नजाळे : अन्नजाळे हा गुंतागुंतीच्या आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह असतो. अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्नजाळे तयार होते.

अन्नसाखळीमधील विविध पोषणपातळ्या :

अन्नसाखळीमधील विविध पोषणपातळ्या : उत्पादक (प्रथम पोषणपातळी), प्राथमिक भक्षक - (दूवितीय पोषणपातळी), दूवितीय भक्षक - (तृतीय पोषणपातळी)तृतीय भक्षक - (चतुर्थ पोषणपातळी) अशा अन्नसाखळीमधील विविध पोषणपातळ्या असतात.

  • वरील चित्रात सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती प्रकाश-संशश्‍लेषण करून अन्न तयार करतात. त्यामुळे त्या उत्पादक आहेत. हे अन्न नाकतोडा खात आहे. तो प्राथमिक भक्षक आहे. बेडूक दूवितीय भक्षक आहे कारण तो कीटक खाऊन गुजराण करतो. साप तृतीयक भक्षक तर गरुड सर्वोच्च भक्षक आहे. शेवटचे चित्र विघटक सजीवांचे आहे. त्यात कवक आणि जीवाणू दाखवले आहेत.
  • वरील चित्र अन्नजाळ्याचे चित्र होण्यासाठी त्या अन्नसाखळ्यांत आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. एखादा सजीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असू शकतो. तसेच हाच सजीव स्वतःदेखील भक्षक असू शकतो. बेडूक निरनिराळे कीटक खातो व बेडकाला साप, गरुड इत्यादी भक्षक देखील खाऊ शकतात. जर चित्रात अशा आंतरक्रिया दाखवल्या तर ते अन्नजाळे होऊ शकते.
विघटन : ही प्रक्रिया वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात अडकलेली मूलट्रव्ये आणि रेणू पुन्हा निसर्गात परत पाठवते. शरीर तयार होत असताना ज्या मूलद्रव्यांचा वापर केला जातो, ती जर पुन्हा निसर्गात पाठवली नाहीत तर या रसायनांचा चक्राकार प्रवास होणार नाही. केवळ विघटनानेच पालापाचोळा, मृत शरीरे इत्यादी पुन्हा निसर्गात विलीन होऊ शकतात. जर हे नेमाने चालणारे विघटन झाले नाही तर पृथ्वीवर या साऱ्यांचे ढीगच्या ढीग साचून राहतील. निसर्गाचा समतोल बिघडेल.

 

अन्नसाखळीचे स्वरूप बदलले तर निसर्गातले संतुलन बिघडते :

उदाहरण :

  • भातपीक -> नाकतोडे -> बेडूक -> साप ही अन्नसाखळी निसर्गतः सुरू असते. काही कारणांनी येथील बेडूक कमी झाले की दूवितीय भक्षक कमी होतील. हे कमी झाल्यावर तृतीयक भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे, म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील. सापांच्या कमतरतेने उंदीरही बाढतील.
  • बेडूक ही मधली कडी नष्ट झाली तर परिसंस्थेतील तोल बिघडेल. भक्ष्य आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या नष्ट होतील. परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल.

पर्यावरणीय व्यवस्थापन :

पर्यावरण परिसंस्था संबंध :

पर्यावरण (Environment) : ज्या ठिकाणी सजीव जगतो, त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व घटक म्हणजे पर्यावरण होय.

  • आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो.

पर्यावरणाचे प्रकार : पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार .

  • (i) नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण -नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो.
  • (ii) मानवनिर्मित पर्यावरण.

पर्यावरणातील दोन प्रमुख घटक : (i) जैविक घटक (ii) अजैविक घटक.

  • जैविक आणि अजैविक घटकांत सतत महत्त्वपूर्ण आंतरक्रिया घडत असतात.
  • मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो.
  • पारिस्थितिकी (Ecology) : पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी होय.
  • परिसस्था (Ecosystem) : पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे मूलभूत कार्यात्मक एकक म्हणजे परिसंस्था. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो.
  • एखाद्या निश्‍चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यांतील आंतरक्रिया, या दोन्हींनी परिसंस्था बनते.
  • पर्यावरणातील विविध चक्रे जसे जल चक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र इत्यादी पर्यावरणाचे संतुलन अखंडितपणे टिकवून ठेवतात. तसेच परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे देखील पर्यावरण संतुलन कायम राहते.

लक्षात ठेवा :  

  • निसर्ग टिकला तरच मानव टिकेल. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन केले तरच मानव पृथ्वीवर टिकून राहिल.
  • आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही तर ती पुढच्या पिढीकडून आपल्याला उसनवार मिळाली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी पृथ्वी सांभाळून ठेवली पाहिजे.
पर्यावरणातील चक्रे त्यांचे महत्त्व :

पर्यावरणात अवसादन चक्र आणि वायुचक्र अशी दोन प्रकारची जैव-भू-रासायनिक चक्रे असतात.

जैव-भू-रासायनिक चक्र (bio-geo-chemical cycle) :

  • परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषणद्रव्यांच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला ' जैव-भू-रासायनिक चक्र ' असे म्हणतात. पोषकद्रव्यांचा हा चक्रीय प्रवाह सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषकद्रव्ये पुरवतो.
  • पोषकद्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. या आवश्यक पोषकद्रव्यांचा प्रवास शीलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण याच्या माध्यमातून अविरत चालू असतो.
  • पोषकद्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. ते जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पातळीवर चालू असते. परिसंस्थेतील ऊर्जावहनाच्या पातळीवरदेखील ते अवलंबून असते.

जैव -भू-रासायनिक चक्राचे प्रकार :

वायुचक्र (Gaseous cycle) : पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषकद्रव्याचा प्रवास. उदा., नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, बाष्प यांची चक्रे.

अवसादन (भू) चक्र (Sedimentary cycle) : पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात मुख्य अजैविक पोषकद्रव्यांचे संचयन असते. उदा., आयर्न (लोह), कॅल्शिअम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश.

  • वायुचक्र वेगाने घडते. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे वायुचक्राची गती, तीव्रता व संतुलन यांवर गंभीर परिणाम होत आहेत. अवसादन चक्र जमिनीवरच्या प्रदूषणाने असंतुलित होते.
  • वायुचक्र ब अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांवर अवलंबून असतात. नायट्रोजन आणि कार्बन हे दोन्ही अजैविक घटक वायुरूपात असतात आणि खनिजाच्या स्वरूपात जमिनीवर पण आहित.
  • कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र ही तिन्ही महत्त्वाची जैव-भू-रासायनिक चक्रे आहेत.

 

पर्यावरण संवर्धन (Environmental conservation) :

पर्यावरणावर परिणाम करणारे घटक : पर्यावरणावर नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक परिणाम करतात.

  • काही नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात, तेव्हा पर्यावरणातील अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होऊन त्याचा परिणाम, मुख्यत्वे जैविक घटकांवर होतो.
  • नैसर्गिक घटकांपैकी अचानक होणारे हवामानातले बदल, येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अशांनी पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. अशा बदलांनी पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम होऊन अन्नसाखळी आणि अन्नजाळी यांच्या आंतरक्रियांत बाधा येते.
  • मानवनिर्मित कारणांनी तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. औद्योगिकीकरण व त्यामुळे होणारे प्रदूषण, नागरीकरण, बन्य प्राण्यांच्या शिकारी, धरणे, रस्ते, पूल बांधणे अशांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी होत आहे.
  • पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. उदा., पर्यावरणीय प्रदूषण.
पर्यावरणीय प्रदूषण :

पर्यावरणीय प्रदूषण : नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय. यामुळे हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये घातक बदल होतात.

  • प्रदूषण होण्याची कारणे : लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण, मानवाचे अविवेकी वागणे इत्यादी.
  • आपली जबाबदारी : हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण आढळून येते. प्रदूषणाचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होतो. त्यामुळे ते कमी करून पर्यावरण संवर्धन करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे.

प्रदूषणाचे प्रकार :

  • हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भू प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. याशिवाय प्रकाश प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे इतरही प्रदूषणाचे प्रकार आहेत.
  • नैसर्गिक स्रोतांमधून आणि नैसर्गिक प्रक्रियांतून निर्माण होणारे प्रदूषण म्हणजे नैसर्गिक प्रदूषण. मानवनिर्मित प्रदूषण हे मानवांच्या हस्तक्षेपामुळे होते.

किरणोत्सारी प्रदूषण : नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारे होणारे किरणोत्सारी प्रदूषण खूप घातक आहे.

  • नैसर्गिक किरणोत्सार : अल्ट्राव्हॉयोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे.
  • मानवनिर्मित किरणोत्सार : एक्स-रे, अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार.

जागतिक पातळीवर चेनौबिल, विंड्स्केल आणि थ्रीमाईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना झाल्या. त्यामुळे हजारो व्यक्‍ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत.

किरणोत्सारी प्रद्षणाचे काही परिणाम :

  • एक्स-रेच्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सरांची निर्मिती होणे.
  • शरीरातील ऊतींचा नाश होणे.
  • जनुकीय बदल होणे.
  • दृष्टीवर हानिकारक परिणाम होणे.

पर्यावरण संवर्धनाची गरज (Need of environmental conservation) :

आज जगातील सर्व विकसित, विकसनशील व अविकसित देशांनी पर्या वरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आले आहेत.

  • पर्यावरणविषयक समस्यांवर चर्चा - संयुक्‍त राष्ट्रसंघटनेने (UNO) स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषद - 1972.
  • त्यातूनच ' युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) ची स्थापना.
  • भारतात चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्‍नांवर चर्चा.
  • पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना.
  • 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन.

लोक-सहभाग :

  • पर्यावरण संवर्धनासंबंधीच्या कायद्यांची माहिती सर्वांनी करून घ्यावी.
  • लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि प्रभायी लोकचळवळ झाल्यास पर्यावरण संवर्धन होऊ शकने.
  • शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती आणि लहानपणापासून व मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक देशाने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पर्यावरण रक्षणाची धोरणे, नियम आणि कायदे केलेले आहेत.

पर्यावरण संवर्धन - आपली सामाजिक जबाबदारी :

  • पर्यावण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे.
  • नैसर्गिक साधनसंपत्तीचा अफाट वापर मानवानेच केला. स्वत:च्या प्रगती-विकास प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश केला आणि यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या.
  • मानवाने बुद्धिमत्ता, स्मरणशक्‍ती, कल्पनाशक्ती वापरून नैसर्गिक संसाधनांचा अफाट वापर केला व त्यामुळे पर्यावरणाची सर्वांत जास्त हानी झाली आहे.
  • पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.
  • जरी पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम मानवाने केले असले तरी आता पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्याचे कामही त्यानेच केले पाहिजे.
  • पर्यावरण बिघडवण्यासाठी घातक कृती सर्वसामान्य लोक अजाणतेपणी करीत राहतात, त्यांना सजग केले पाहिजे.
पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले कायदे :

पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले कायदे :

वनसंवर्धन कायदा, 1980 :

  • वनसंरक्षणासाठी, वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने.
  • केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक.
  • कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा

पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 :

प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थावर कारवाई

करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला आहे.

  • या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही.
  • या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा एक लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 : पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे

वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 :

  • कलम 49 : दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी.
  • कलम 49 ब : वन्यप्रा ण्यां च्या कातडीपासून किंवा अवयवांपासून बनविलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी
  • कलम 49 क : व्यापाऱ्याकडे दुर्मीळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे बंधनकारक.

इतर कायदे :

  • ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) नियम 2000
  • जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम 1998
  • ई-कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2011
माहिती :

ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी आसाम राज्यामधील जादव मोलाई पयांग या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये ‘जोरहाट’ येथील कोकीलामुख येथे हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री ’ या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. आज या जंगलाला ‘मोलाई जंगल’ म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते.

पर्यावरण संवर्ध करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर पार पाडाण्यासाठी विशिष्ट भूमिकांची यादी :

टिकवणे : उपलब्ध साधनसंपत्ती टिकवून ठेवणे.

नियंत्रण

  • हानी रोखणे.
  • हानी करणारी कृती थांबवणे.
  • मानसि कता बदलणे.

निर्मिती :

  • पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे.
  • नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे.

जतन :

  • जे उरले आहे त्याचे जतन करणे.
  • हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे.
  • अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवणे

प्रतिबंध :

  • संभाव्य धोके रोखणे.
  • नवीन कृती कार्यक्रम आखणे.
  • पर्यावरणाला हानी पोहचवणारे घटक

प्रसार :

  • शिक्षण
  • मार्ग दर्श न
  • जागृती
  • अनुकरण
  • संघटन
  • प्रत्यक्ष सहभाग

 पर्यावरण संवर्धन आणि जेवविविधता (Environmental Conservation and Biodiversity) :

पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वांत घातक परिणाम हा सजीवांवर होत आहे. सजीवसृष्टी ही अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अशा विविधतेने नटलेली होती. परंतु मानवी विकासाच्या परिणामामुळे ही विविधता नष्ट होत आहे.

जैवविविधता : निसर्गामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या सजीवसृष्टीची समृद्धी म्हणजेच जैवविविधता.

जैवविविधतेच्या पातळ्या :

जैवविविधतेच्या पातळ्या :

(i) आनुवंशिक विविधताः (Genetic Diversity) :

  • एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय.
  • यात एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक ब आनवंशिक फरक अभ्यासला जातो.
  • उदा. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो.
  • पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे आनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो.

(ii) प्रजातींची विविधता (Species Diversity) :

  • एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येणारी विविधता.
  • उदा., वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार.

(iii) परिसंस्थेची विविधता (Ecosytem Diversity)

  • प्रत्येक प्रदेशात असलेल्या अनेक परिसंस्था म्हणजे परिसंस्थांची विविधता.
  • उदा., नैसर्गिकव मानवनिर्मित परिसंस्था.
  • प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात.
  • एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यां चा अधिवास आणि पर्या वरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते.

देवराई (Sacred grove) :

  • देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे ‘देवराई’.
  • हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य’ असते.
  • देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते.
  • भारताच्या  पश्चि म घाटात, संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात.
  • भारतात अशा 13000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत.

जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?

  • दुर्मीळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे.
  • राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.
  • काही क्षेत्रे ‘राखीव जैवविभाग’ म्हणून घोषित करणे.
  • विशिष्ट प्रजातीच्या संवर्ध नासाठी खास प्रकल्प सुरू करणे.
  • प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
  • कायद्यांचे पालन करणे.
  • पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.
  • जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मेला साजरा केला जातो.

जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे (Hotspots of the biodiversity)

  • जगातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे : 34.
  • पूर्वी या क्षेत्रांनी पृथ्वीचा व्यापलेला भाग : 15.7%.
  • आज नष्ट झालेली संवेदनक्षम क्षेत्रे : सुमारे 86 %.
  • आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष : 2.3%.
  • यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती. या एकूण जागतिक स्तरापैकी 50 % आहेत.
  • भारतात 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलांत आढळून येतात.
  • पश्‍चिम घाटात 1500 हून अधिक वनस्पतींच्या प्रदेशनिष्ठ प्रजातीही आढळून येतात.
  • जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत.

धोक्यात आलेली देशातील तीन वारसास्थळे :

पश्चिम घाट :

  • गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या पाच राज्यांत व्याप्ती .
  • खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आला आहे.
  • तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहेत.

मानस अभयारण्य (आसाम) :

  • धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका.
  • तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झाला आहे.

सुंदरबन अभयारण्य (पश्चिम बंगाल) :

  • हे अभयारण्य वाघांसाठी राखीव आहे,
  • धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले चर यांमुळे धोक्यात
  • यांमुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान

धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण :

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN) ही संघटना विविध देशांतील धोक्यात आलेल्या वन्यजीव

प्रजातींची यादी (Red list) तयार करते. या यादीमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती तर हिरवी पृष्ठे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्या मधून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवितात.

(i) संकटग्रस्त प्रजाती (Endangered species) :

  • या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो, की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात.
  • उदाहरणार्थ , लायन-टेल्ड वानर, तणमोर.

(ii) दुर्मीळ प्रजाती (Rare species) :

  • या प्रजातींची संख्या बरीच कमी असते.
  • स्थानविशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात.
  • उदाहरणार्थ , रेड पांडा, कस्तुरी मृग.

(iii) संवेदनशील प्रजाती (Vulnerable species) :

  • या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते.
  • उदाहरणार्थ , पट्टेरी वाघ, गीरचे सिंह.
काही महत्त्वाची घोषवाक्ये :

काही महत्त्वाची घोषवाक्ये :

  • वृक्षनाश म्हणजे सर्वनाश.
  • राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण.
  • वनश्री हीच धनश्री.
  • पर्यावरण रक्षण, हेच मूल्यशिक्षण.
  • कागदाची काटकसर, म्हणजे वृक्षतोडीला आवर.
  • पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास.
  • आरोग्याची गुरुकिल्ली - शुद्ध हवा, शुद्ध पाणी.
जागतिक वन्यजीव निधी WWF या संघटनेने 2008 साली प्रसिदध केलेल्या अहवालानुसार गेल्या 30 वर्षांमध्ये जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत

हे वास्तव भयावह आहे. संपूर्ण वनस्पती आणि प्राणी प्रजाती नष्ट झाल्या तर त्यांचे पुन्हा जोपासणे अशक्य आहे. या वेगाने जर प्राणी प्रजाती अस्तंगत झाल्या तर भविष्यात एकही प्राणी शिल्लक राहणार नाही. केवळ मानव या पृथ्वीतलावर खूप जास्त प्रमाणात वाढत राहील आणि निसर्गाचा समतोल

बिघडवत राहील.

PDF-Notes, Solution, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Notes

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Solutions

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Text Book

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-3- सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - online notes

Next Chapter : पाठ-5- हरित ऊर्जेच्या दिशेने - online notes

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *