Solutions-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-18-अवकाश निरीक्षण : दुर्बिणी-Maharashtra Board

अवकाश निरीक्षण : दुर्बिणी

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-18-Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1.  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) दृश्य प्रकाशाची तरंगलांबी सुमारे ......ते .........मध्ये असते

उत्तर :

दृश्य प्रकाशाची तरंगलांबी सुमारे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर मध्ये असते

(आ) GMRT चे कार्य ..........लहरींवर अवलंबून आहे.

उत्तर :

GMRT चे कार्य रेडिओ लहरींवर अवलंबून आहे.

(इ) क्ष-कि रणां च्या एका दुर्बिणीला .........या शास्त्र ज्ञाचे नाव दिलेले आहे.

उत्तर :

क्ष-कि रणां च्या एका दुर्बिणीला सुब्रमण्यम चंद्रशेखर या शास्त्र ज्ञाचे नाव दिलेले आहे.

(ई) अवकाश निरीक्षणा साठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम ....... या शास्त्रज्ञाने केला.

उत्तर :

अवकाश निरीक्षणा साठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने केला.

(उ) भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण ..........येथे स्थित आहे.

उत्तर :

भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण नैनिताल येथे स्थित आहे.

प्रश्न 2. जोड्या लावा

अ गट ब गट
अ. क्ष-किरण a. GMRT
आ. दृश्य प्रकाश दुर्बीण b. इस्रो
इ. भारतीय रेडिओ दुर्बीण c. हबल
ई. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण d. चंद्रा

उत्तर :

अ गट ब गट
अ. क्ष-किरण चंद्रा
आ. दृश्य प्रकाश दुर्बीण हबल
इ. भारतीय रेडिओ दुर्बीण GMRT
ई. कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इस्रो

प्रश्न 3. भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या ? या अडचणी कशा दूर करता येतात?

उत्तर :

  • अवकाशातून येणारा दृश्य-प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करीत पृथ्वीवर पोहोचतो. यादरम्यान काही प्रमाणात प्रकाश वातावरणात शोषला गेल्याने त्याची तीव्रता कमी होते. त्याशिवाय वातावरणातील तापमानाचा व दाबाचाही प्रकाशावर परिणाम होतो,
  • त्यामुळे प्रकाश अस्थिर होतो. त्याचप्रमाणे शहरांजवळील दिव्यांमुळेही दृश्य-प्रकाश दुर्बिणींना प्रकाश ग्रहण करण्यात अडचणी येतात. काही वेळेस वातावरण ढगाळ झाल्यास दृश्य-प्रकाश दुर्बिणी नीट काम करू शकत नाहीत.

भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य-प्रकाश दुर्बिणींना अशा विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

या अडचणींवर पुढील दोन प्रकारे मात करून अडचणी दूर करता येतात :

  • शहरातील दिवे, हवेचा दाब, तापमान इत्यादी अडचणींसाठी या दुर्बिणी पहाडी प्रदेशात, उंचावर निर्जन स्थानी बसवल्या जातात.
  • पृथ्वीवरील या सर्व अडचणींवर पूर्णपणे मात करण्यासाठी या दुर्बिणी अवकाशातच बसवल्या जातात. अवकाशातील दृश्य-प्रकाश दुर्बिणींना कोणतीही अडचण उद्भवत नाही आणि त्यामुळे मिळणाऱ्या प्रतिमा या अधिक सुस्पष्ट असतात.

प्रश्न 4. अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे. त्याची रेखाकृती काढा.

उत्तर :

अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून परावर्तक पद्धतीच्या दुर्बिणी तयार करता येतील. परावर्तक दुर्बिणीतही पुढील रेखाकृतीत स्पष्ट केल्याप्रमाणे न्यूटन पद्धतीची व कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण बनवता येईल.

प्रश्न 5. आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा.

(अ) चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे?

उत्तर :

चित्रात दाखवलेली दुर्बीण ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे.

(आ) दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे दया

उत्तर :

(इ) दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे.

उत्तर :

ही दुर्बीण अंतर्वक्र आरशावर आधारित आहे.

(ई) या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे?

उत्तर :

अंतर्वक्र आरशावर आधारित दुसरी दुर्बीण म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण होय.

(उ) वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते?

उत्तर :

  • वरील दुर्बिणीत अंतर्वक्र आरसा, सपाट आरमा व बहिर्गोलीय नेत्रिका हे तीन मुख्य भाग आहेत. ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे.
  • अंतर्वक्र आरसा आणि सपाट आरसा यांमधील अंतगमुळे नाभीय अंतर कमी-जास्त करता येते.
  • दूरवरुन दूवरच्या पदार्थापासून येणारे किरण समांतर असतात. हे किरण अंतर्वक्र आरशावर पडतात आणि ते किरण पदार्थाची वास्तव, लहान व उलटी प्रतिमा आपल्या समोरील सपाट आरशावर परावर्तित करतात.
  • सपाट आरशावर पडलेली लहान व उलट प्रतिमा परत परावर्तित होते. आता ही प्रतिमा नेत्रिकेसाठी पदार्थ म्हणून काम करते.
  • नेत्रिका आता साध्या सूक्ष्मदर्शकाचे काम करते व सपाट आरशावरून परावर्तित झालेल्या, वास्तव परंतु लहान व उलट प्रतिमेला पुन्हा सुलट परंतु विशाल आभासी प्रतिमा म्हणून नेत्रिकेच्या जवळून निरीक्षक पाहू शकतो.

प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करा.

उत्तर :

गॅलिलिओ गॅलिलीने १७ व्या शतकाच्या सुरुवातीला (सन १६०९ मध्ये) दुर्बिणीची रचना केली होती आणि ती मुख्यतः दोन भिंगांचा वापर करून बनवली होती.

  • गॅलिलिओची दुर्बीण ही एक वक्रीभवक दुर्बीण असून त्यात दोन बहिर्वक्र भिंगांचा वापर केला जातो.
  • या दोन भिंगांपैकी एक भिंग पदार्थिक भिंग, तर दुसरे भिंग नेत्रिकाचे काम करते.
  • पदार्थिक भिंग द्वारे सूर्यप्रकाश किंवा इतर प्रकाश एकत्रित करून दुर्बिणेद्वारे वाढवला जातो.
  • नेत्रिका भिंग द्वारे प्रतिमा स्पष्ट आणि विविध विस्तारांच्या प्रमाणात पाहण्यात येतात.
  • या दोन्ही भिंगांना धातूच्या नळीमध्ये बसवून दुर्बीण तयार केली जाते. गरजेनुसार या दोन भिंगातील अंतर कमी-जास्त करण्याची सोय या नळीत (दुर्बिणीत) केलेली असते.

(आ) रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा.

उत्तर :

रेडिओ दुर्बीण (Radio Telescope) : अवकाशातील तारे, ग्रह, दीर्घिका अशा खगोलीय वस्तूंपासून दृश्य-प्रकाशाशिवाय इतर प्रकाशलहरी देखील निघतात. या लहरी ग्रहण करून त्यांपासून प्रतिमा मिळवण्यासाठी विशिष्ट दुर्बिणींचा वापर होतो, त्यांना रेडिओ दुर्बिणी म्हणतात.

  • रेडिओ दुर्बीण ही विशिष्ट अशा घमेल्याच्या आकाराच्या (Paraboloid) एक डिश किंवा अनेक डिशच्या संचापासून बनवली जाते.
  • दृश्य-प्रकाश दुर्बिणींप्रमाणेच या डिशच्या वक्रभागावरून परावर्तित होणाऱ्या रेडिओ व अन्य प्रकाशलहरी डिशच्या नाभी केंद्राशी एकत्रित केल्या जातात आणि पुढे संगणकाद्वारे या लहरींवरून प्रतिमा मिळवली जाते.

(इ) दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात?

उत्तर :

  • अवकाशातून येणारा दृश्य-प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करीत पृथ्वीवर पोहोचतो. वातावरणाच्या तापमान व दाब यांमुळे दृश्य-प्रकाश स्थिर राहत नाही. वातावरणातही प्रकाश शोषला गेल्याने त्याची तीव्रता कमी होते.
  • रात्रीच्या वेळेस शहरांतील दिवे, दिवसा प्रखर सूर्यप्रकाश, काही वेळेस ढगाळलेले वातावरण अशा विविध अडचणी टाळण्यासाठी दृश्य-प्रकाशाच्या दुर्बिणी पर्वतमाथ्यांवर निर्जन जागी उभारण्यात येतात.

(ई) क्ष-किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही?

उत्तर :

  • अवकाशातील खगोलांपासून विविध स्वरूपांतील प्रकाश-किरणे पृथ्वीकडे येत असतात. मात्र या प्रकाशकिरणांपैकी क्ष-किरणे पृथ्वीच्या वातावरणाच्या अडथळ्यांमुळे पृथ्वीपर्यंत/भूपृष्ठापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
  • त्यामुळे वातावरणाचा किंवा तापमान, दाब असा अन्य अडथळा पृथ्वीवर असल्याने क्ष-किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत होऊ शकत नाही.
  • क्ष-किरण निरीक्षणांसाठी, वैज्ञानिक अंतराळात दुर्बीण पाठवतात, जसे की नासा च्या चंद्रा एक्स-रे ऑब्झरजेटरी.

PDF-Notes, Solution, Text Book
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-18-अवकाश निरीक्षण : दुर्बिणी-Notes

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-18-अवकाश निरीक्षण : दुर्बिणी-Solutions

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-18-अवकाश निरीक्षण : दुर्बिणी-Text Book


महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF) Rs. 72

महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF) Rs. 68

महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (36 PDF) Rs. 122

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान- All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-17-जैवतंत्रज्ञानाची ओळख - online solutions

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *