द्रव्याचे मोजमाप
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-4-Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. उदाहरणे लिहा.
(अ) धन आयन
(1) सोडिअम आयन Na+
(2) कॅल्शिअम आयन Ca2+
(3) सिल्व्हर आयन Ag+
(4) अल्युमिनिअम आयन Al3+.
(आ) आम्लारिधर्मी मूलके
(1) Mg2+
(2) K+
(3) Fe2+
(4) Cu2+.
(इ) संयुक्त मूलके
(1) H3O+
(2) NH4+
(3) CO32-
(4) SO22-.
(इ) परिवर्ती संयुजा असलेले धातू
(1) Cu → Cu+, Cu2+
(2) Hg → Hg +, Hg2+
(3) Fe → Fe2+, Fe3+.
(उ) द्वि −संयुजी आम्लधर्मी मूलके
(1) S2-
(2) O2-
(ऊ) त्रि−संयुजी आम्लारिधर्मी मूलके
(1) A13+
(2) Cr3+
(3) Fe3+.
प्रश्न 2. खालील मूलद्रव्ये व त्यांच्या पासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा.
पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर, क्लोरिन, ऑक्सिजन
मूलद्रव्य | मूलकांच्या संज्ञा | प्रभार |
पारा | Hg | Hg2+ |
पोटॅशियम | K | K+ |
नायट्रोजन | N | N3− |
तांबे | Cu | Cu+ |
सल्फर | S | S2− |
कार्बन | C | C− |
क्लोरिन | Cl | Cl− |
ऑक्सिजन | O | O2− |
प्रश्न 3. खालील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा.
सोडिअम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, फेरिक फॉस्फेट, कॅल्शिअम ऑक्साइड, ॲल्युमिनिअम हायड्रॉक्साइड
(संयुजा : Na = 1, K = 1, Fe (फेरिक) = 3, Ca = 2, Al = 3, Mg = 2, Ag = 1, NH4 = 1, SO4 = 2, NO3 = 1, O = 2, Cl = 1, PO4 = 3, HCO3 = 1)
(i) सोडिअम सल्फेट
वरील संयुगाचे सूत्र पुढीलप्रमाणे काढता येते :
पायरी -1 : सोडिअम आणि सल्फेटच्या संज्ञा व संयुजा लिहा
संज्ञा | Na | SO4 |
संयुजा | 1 | 2 |
पायरी -2 : बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा
सोडिअम सल्फेटचे सूत्र Na2SO4 आहे.
(ii) पोटॅशियम नायट्रेट
पायरी -1 : पोटॅशिअम आणि नायट्रेटच्या संज्ञा व संयुजा लिहा
संज्ञा | K | NO3 |
संयुजा | 1 | 1 |
पायरी -2 : बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा
पोटॅशिअम नायट्रेटचे सूत्र KNO3 आहे.
(iii) फेरिक फॉस्फेट
पायरी -1 : फेरिक आणि फॉस्फेटच्या संज्ञा व संयुजा लिहा
संज्ञा | Fe | PO4 |
संयुजा | 3 | 3 |
पायरी -2 : बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा
फेरिक फॉस्फेटचे सूत्र FePO4 आहे.
(iv) कॅल्शिअम ऑक्साइड
पायरी -1 : कॅल्शिअम आणि ऑक्सिजनच्या संज्ञा व संयुजा लिहा
संज्ञा | Ca | O |
संयुजा | 2 | 2 |
पायरी -2 : बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा
कॅल्शिअम ऑक्साइडचे सूत्र CaO आहे.
(v) ॲल्युमिनिअम हायड्रॉक्साइड
पायरी -1 : अॅल्युमिनिअम आणि हायड्रॉक्साइडच्या संज्ञा व संयुजा लिहा
संज्ञा | Al | OH |
संयुजा | 3 | 1 |
पायरी -2 : बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा
अॅल्युमिनिअम हायड्रॉक्साइडचे सूत्र Al(OH)3 आहे.
प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा.
(अ) सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे?
- मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात.
- मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता ही इलेक्ट्रॉन संरूपणातील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते.
- सोडिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. तो दुसऱ्या अणूला दिला असता धनप्रभारित सोडिअम आयन (Na+) तयार होतो. म्हणून सोडिअमची संयुजा 1 आहे.
उदा. : Na+ + Cl− → NaCl (सोडिअम क्लोराइड)
सोडिअमचा अणू एक इलेक्ट्रॉन क्लोरिनच्या अणूला देतो व सोडिअमचा धन आयन तयार होतो म्हणून सोडिअमची संयुजा 1 आहे. क्लोरिनचा अणू एक इलेक्ट्रॉन घेतो व क्लोरिनचा ऋण आयन (क्लोराइड) तयार होतो म्हणून क्लोरिनची संयुजा 1 आहे.
(आ) M हा द्विसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.
पायरी -1 : M व सल्फेटच्या संज्ञा व संयुजा लिहा
संज्ञा | M | SO4 |
संयुजा | 2 | 2 |
पायरी -2 : बाणाने दर्शवल्याप्रमाणे संयुजांचा तिरकस गुणाकार करा
रेणुसूत्र = MSO4.
(इ) अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. दोन संदर्भ अणूंची माहिती द्या.
- अणू हा अतिशय सूक्ष्म असल्याने वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे शक्य नसल्याने अणूचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती.
- हायड्रोजनचा अणू सर्वांत हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. हायड्रोजनच्या केंद्रकात एक प्रोटॉन आहे म्हणून हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक (1) असे स्वीकारण्यात आले.
- नायट्रोजनचे एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या चौदा (14) पट असते. म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान हे 14 आहे. अशा रितीने विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुववस्तुमाने ठरवली गेली आहेत.
- सन 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे वस्तुमान 12 स्वीकारले गेले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × , म्हणजेच 1u असे ठरते.
- अणूंच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे एक असते.
(ई) ‘अणूचे एकीकृत वस्तुमान’ म्हणजे काय?
विसाव्या शतकात अणूचे वस्तुमान मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एककीकृत वस्तुमान एकक (Unified Mass Unit) स्वीकारले आहे. या एककाला डाल्टन म्हणतात. यासाठी u ही संज्ञा वापरतात. 1u = 1.66053904 × 10−27 kg.
(उ) पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.
ग्रॅममध्ये व्यक्त केलेले त्या पदार्थाचे अणुवस्तुमान किंवा रेणुवस्तुमान डाल्टनमधील मूल्याएवढेच असते, म्हणजेच पदार्थाचा एक मोल होय.
मोल (mol) हे SI एकक आहे.
ऑक्सिजनचे रेणुवस्तुमान 32 u आहे. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल होय.
कार्बनचे अणुवस्तुमान 12 u आहे. 12 ग्रॅम कार्बन म्हणजे 1 मोल होय.
पाण्याचे रेणुवस्तुमान 18 u आहे. 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल होय.
प्रश्न 5. खालील संयुगांची नावे लिहा व रेणुवस्तुमाने काढा.
Na2SO4, K2CO3, CO2, MgCl2, NaOH, AlPO4, NaHCO3
(i) Na2SO4 (सोडिअम सल्फेट) :
रेणू | घटक मूलद्रव्य | अणुवस्तुमान (u) | रेणूतील अणूंची संख्या | अणुवस्तुमान ×अणूंची संख्या | घटकांचे अणुवस्तुमान(u) |
Na2SO4, (सोडिअम सल्फेट) | Naसोडिअम | 23 | 2 | 23 × 2 | 46 |
S(सल्फर) | 32 | 1 | 32 × 1 | 32 | |
O(ऑक्सिजन) | 16 | 4 | 16 × 4 | 64 |
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
Na2SO4 चे रेणुवस्तुमान = (Na चे अणुवस्तुमान) × 2 + (S चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान) × 4
= (23 × 2) + (32 × 1) + (16 × 4) = 46 + 32 + 64 = 142
Na2SO4 (सोडिअम सल्फेट) चे रेणुवस्तुमान = 142 u.
(ii) K2CO3 (पोटॅशिअम कार्बोनेट) :
रेणुवस्तुमान - घटक अणुवस्तुमानांची बेरीज
K2CO3 चे रेणुवस्तुमान = (K चे अणुवस्तुमान) × 2 + (C चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान) × 3
= (39 × 2) + (12 × 1) + (16 × 3) = 78 + 12 + 48 = 138
K2CO3 (पोटॅशिअम कार्बोनेट) चे रेणुवस्तुमान = 138 u.
(iii) CO2 (कार्बन डायऑक्साइड) :
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
CO2 चे रेणुवस्तुमान = (C चे अणुवस्तुमान) × 1+ (O चे अणुवस्तुमान) × 2
= (12 × 1) + (16 × 2) = 12 + 32 = 44
CO2 (कार्बन डायऑक्साइड) चे रेणुवस्तुमान = 44 u.
(iv) NaOH (सोडिअम हायड्रॉक्साइड) :
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
NaOH चे रेणुवस्तुमान = (Na चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान) × 1 + (H चे अणुवस्तुमान) × 1
= (23 × 1) + (16 × 1) + (1 × 1)
= 23 + 16 + 1 = 40
NaOH (सोडिअम हायड्रॉक्साइड) चे रेणुवस्तुमान = 40 u.
(v) AIPO4 (अॅल्यमिनिअम फॉस्फेट) :
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानाची बरीज
AIPO4 चे रेणुवस्तुमान = (Al चे अणुवस्तुमान) × 1 + (P चे अणुवस्तुमान) × 1+ (O चे अणुवस्तुमान) × 4
= (27 × 1) + (31 × 1) + (16 × 4)
= 27 + 31 + 64 = 122
AIPO4 (अॅल्युमिनिअम फॉस्फेट) चे रेणुवस्तुमान = 122 u.
(vi) NaHCO3(सोडिअम बायकार्बोनेट) :
रेणुवस्तुमान = घटक अणुवस्तुमानांची बेरीज
NaHCO3 चे रेणुवस्तुमान = (Na चे अणुवस्तुमान) × 1+ (H चे अणुवस्तुमान) × 1+ (C चे अणुवस्तुमान) × 1 + (O चे अणुवस्तुमान) × 3
= (23 × 1) + (1 × 1) + (12 × 1) + (16 × 3)
= 23 + 1 + 12 + 48 = 84
NaHCO3(सोडिअम बायकार्बोनेट) चे रेणुवस्तुमान = 84 u.
प्रश्न 6. दोन वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे ‘म’ आणि ‘न’ हे दोन नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढीलप्रमाणे :
‘नमुना म’ : वस्तुमान 7 ग्रॅम
घटक ऑक्सिजनचे वस्तुमान : 2 ग्रॅम
घटक कॅल्शियमचे वस्तुमान : 5 ग्रॅम
‘नमुना न’ : वस्तुमान 1.4 ग्रॅम
घटक ऑक्सिजनचे वस्तुमान : 0.4 ग्रॅम
घटक कॅल्शियमचे वस्तुमान : 1 ग्रॅम
यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा.
चुनकळीचे 'म' आणि 'न' हे दोन नमुने मिळाले.
नमुना 'म' मध्ये 7 ग्रॅम नमुन्यामधून 5 ग्रॅम कॅल्शिअम (Ca) व 2 ग्रॅम ऑक्सिजन (O) मिळाले. म्हणजे Ca व O चे वजनी प्रमाण 5 : 2 आहे.
तसेच नमुना 'न' मध्ये 1.4 ग्रॅम नमुन्यामधून 1 ग्रॅम कॅल्शिअम (Ca) व 0.4 ग्रॅम ऑक्सिजन (O) मिळाले. म्हणजे Ca व O चे वजनी प्रमाण 1 : 0.4 आहे.
म्हणजे चुनकळीच्या दोन वेगवेगळया नमुन्यांमधील Ca व O चे वजनी प्रमाण स्थिर असल्याचे आढळून आले.
नमुना 'म' Ca : 05 : 2
नमुना 'न' Ca : 01 : 0.4 म्हणजेच 5 : 2.
यावरून स्थिर प्रमाणाचा नियम सिद्ध होतो. संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते.
प्रश्न 7. खालील राशींमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
32 ग्रॅम ऑक्सिजन, 90 ग्रॅम पाणी , 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड, 7.1 ग्रॅम क्लोरिन
ऑक्सिजन (O2) चे रेणुवस्तुमान = 16 × 2 = 32
∴ 1 मोल ऑक्सिजन = 32 ग्रॅम ऑक्सिजन
1 मोल ऑक्सिजनमधील रेणूंची संख्या = 6.022 × 1023
32 ग्रॅम ऑक्सिजनमधील रेणूंची संख्या = 6.022 × 1023
प्रश्न 8. खालील पदार्थांचे 0.2 मोल हवे असल्यास त्यांच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
सोडिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम ऑक्साईड, कॅल्शिअम कार्बोनेट
सोडिअम क्लोराइडचे (NaCl) रेणुवस्तुमान = 23 + 35.5 ......( Na + Cl)
∴1 मोल सोडिअम क्लोराइड = 58.5 ग्रॅम सोडिअम क्लोराइड ग्रॅममधील सोडिअम क्लोराइडचे वस्तुमान
= सोडिअम क्लोराइडच्या मोलची संख्या × रेणुवस्तुमान
= 0.2 × 58.5 = 11.7 ग्रॅम
0.2 मोल सोडिअम क्लोराइड = 11.7 ग्रॅम सोडिअम क्लोराइड.
Click on link to get PDF from store :
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-4- द्रव्याचे मोजमाप-Notes
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-4- द्रव्याचे मोजमाप-Solutions
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-4- द्रव्याचे मोजमाप-Text Book
महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF) Rs. 72
Useful links :
Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान- All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ-3- धाराविद्युत - online Solutions Next Chapter : पाठ-5- आम्ल, आम्लारी व क्षार- online Solutions |