Solutions-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन-Maharashtra Board

पर्यावरणीय व्यवस्थापन

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9-Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न 1. ‘स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा.

स्तं       स्तं
() धोकादायक कचरा . काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी.
() घरगुती कचरा . रसायने, रंग, राख इत्यादी.
() जैववैद्यकीय कचरा . किरणोत्सारी पदार्थ
() औद्योगि कचरा . वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली
() शहरी कचरा . बँडेज, कापूस, सुया इत्यादी.

उत्तर :

() धोकादायक कचरा - किरणोत्सारी पदार्थ

पर्यावरणावर होणारा परिणाम :

  • किरणोत्सारी पदार्थांमुळे पेशी आणि डी.एन.ए. वर घातक परिणाम होतो.
  • या जनुकीय बदलांमुळे पुढच्या पिढ्या विकृत होऊ शकतात.
  • किरणोत्सारी पदार्थ पर्यावरणात साचून राहतात. त्यामुळे तेथल्या वनस्पती आणि प्राण्यांवर परिणाम होतो.

() घरगुती कचरा - वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली

पर्यावरणावर होणारा परिणाम :

  • हा कचरा कुठेही आणि कसाही फेकल्यास दुर्गंधी येते.
  • हा सर्व कचरा विघटनशील असल्यामुळे त्याच्यापासून जीवाणूंच्या मदतीने निसर्गतःच असेंद्रिय पदार्थ निर्माण होत असतात.
  • परंतु हे विघटन होत असताना घरमाशा, बुरशी आणि इतर अनारोग्यकारक सूक्ष्मजीव त्यावर वाढू शकतात. म्हणून अशा कचऱ्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावून त्यापासून मौल्यवान खत बनवले पाहिजे.
  • अन्यथा निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरल्या जातील. शिवाय परिसर गलिच्छ आणि अनारोग्यकारक बनेल.

() जैववैद्यकीय कचरा - बँडेज, कापूस, सुया इत्यादी.

पर्यावरणावर होणारा परिणाम :

  • जैववैद्यकीय कचरा अतिशय काळजीपूर्वक टाकला पाहिजे. याचे स्रोताच्या ठिकाणीच ज्वलन करणे आवश्यक असते.
  • जैववैद्यकीय कचऱ्यात रक्त, पू आणि इतर जैविक प्रकारचा उत्सर्जित कचरा असतो. हे सर्व अतिशय घातक ठरू शकतात.
  • कचऱ्यातल्या मुयांचा गैरवापर होऊ शकतो. व्यसनाधीन लोकांकडून असा वापर
  • होणयाची शक्यता जास्त असते. यामुळे एड्स आणि हेपाटीटीस बी सारख्या रोगांचा प्रसार होतो.
  • असा कचरा दिसायला अतिशय गलिच्छ असतोच, पण त्याहून घातक म्हणजे तो रोगांचा प्रसार करू शकतो. म्हणून इतरांचे आरोग्य वाचवण्यासाठी जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे लागते.

() औद्योगिक कचरा - रसायने, रंग, राख इत्यादी.      

पर्यावरणावर होणारा परिणाम :

  • औद्योगिक विकासाचा एक परिणाम म्हणजे औद्योगिक प्रदूषितांमुळे होणारे जल आणि वायुप्रदूषण.
  • कारखान्यांत होणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे विषारी आणि घातक रसायने निर्माण होतात. हे पदार्थ परिसरात साचून राहतात.
  • हा कचरा द्रव, घन किंवा वायू असू शकतो, तो हवा, माती आणि जवळचे जलस्रोत प्रदूषित करतो. त्यामुळे तेथील स्थानिक प्राणी आणि वनस्पती नष्ट होऊ शकतात.

() शहरी कचरा - काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी

पर्यावरणावर होणारा परिणाम :

  • शहरात राहणारे लोक प्लास्टिक आणि रबर यांपासून बनलेल्या वस्तूंचा खूप वापर करतात. कोणतीही टाकाऊ वस्तू कोठेही फेकण्याच्या प्रवृत्तीमुळे कॅरीबॅग, काचा आणि इतरही अनेक गोष्टी इतस्तत: टाकल्या जातात.
  • शहरी लोकांत जबाबदारीची आणि सुजाण नागरिकत्वाची भावना कमी होत चालली आहे. त्यामुळे परिसरात कचन्याचे साम्राज्य पसरत चालले आहे.

प्रश्न 2. दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.

(भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा)

() जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक...... हा आहे.

उत्तर :

जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक भौगोलिक अनुकूलता हा आहे.

समर्थन : भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या-त्या प्रदेशात वनस्पती व प्राणी तग धरू शकतात. म्हणून जैवविविधता भौगोलिक अनुकूलतेवरच अवलंबून असते.

() कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन.......होय.

उत्तर :

कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन हवा होय.

समर्थन : वातावरणाची अल्पकाळाची स्थिती म्हणजे हवा होय आणि ती विशिष्ट काळ व विशिष्ट जागा यांच्याशी संबंधित असते.

() मानवाने कितीही प्रगती केली तरी.........चा विचार करावाच लागतो.

उत्तर :

मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामान चा विचार करावाच लागतो.

समर्थन : हवामानाच्या घटकावर दैनंदिन जीवन अवलंबून असते. हवामानबदलाच्या संकटामुळे नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा, अन्नउत्पादन आणि बांधकामे असे सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे कोलमडते. हे हवामानबदलामुळे होत आहे. म्हणूनच मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामानाचा विचार करावा लागतो.

() हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना......... असे म्हणतात.

उत्तर :

हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना वेधशाळा असे म्हणतात.

समर्थन : वेधशाळा या ठिकाणी हवामानशास्त्रातील संशोधन केलेले ज्ञान नोंदींच्या स्वरूपात असते. तसेच, निरनिराळ्या तंत्र व यंत्रांचा समावेश असतो. अशा वेधशाळा वातावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी मदत करतात.

प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?

उत्तर :

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्याअगोदर प्रथमोपचार केले जातात. प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवहानी टाळणे, प्रकृती खराब होत जाण्यापासून रोखणे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा असतो. त्यामुळे प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

यात तीन महत्त्वाचे उपाय आहेत. या  उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्त्वे असे म्हणतात.

  • A - श्वसनमार्ग (Airway): आपद्गस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
  • B - श्वासोच्छवास (Breathing): जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपद्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
  • C - रक्ताभिसरण (Circulation): जर आपद्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio – Pulmonary Resuscitation) म्हणतात. आपद्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.
  • रक्तस्राव: जर आपद्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे द्यावा.
  • अस्थिभंग व मणक्यावर आघात: जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण (Immobilisation) करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील त्या बांधून अचल करण्यासाठी उपयोग करावा. पाठीवर/मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रूग्णशिबिकेवर (Hard Stretcher) ठेवावे.
  • पोळणे-भाजणे: जर आपद्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते.
  • लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुका मार: आपद्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. आपद्गस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे. बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा. मार लागलेला भाग उंचावून ठेवावा.

() शास्त्रीय पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा.

उत्तर :

शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे:

  • कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरणः ही कचरा व्यवस्थापनातील पहिली पायरी होय. कचऱ्यावरील पुढील प्रक्रियेसाठी सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करणे खूप महत्त्वाचे असते.
  • कंपोस्टिंग (सेंद्रिय खत): शिल्लक राहिलेले अन्न, स्वयंपाकघरातील कचरा, भाज्या व फळे यांच्या साली, बागेतील कचरा इत्यादींच्या विघटनाने चांगल्या प्रतीचे खत मिळू शकते.
  • गांडूळ खत निर्मिती: या पद्धतीत, गांडुळाच्या मदतीने घनकचऱ्याचे विघटन जलद रीतीने केले जाते. गांडूळ खत निर्मितीतून मिळालेले खत हे पोषकद्रव्यांनी समृद्ध असल्याने शेतीसाठी उपयुक्त ठरते.
  • सुरक्षित भूमीभरणाची पद्धती: या पद्धतीमध्ये, मानवी वस्तीपासून सुरक्षित दूर असलेल्या विशेष स्थानी कचरा ठेवून दिला जातो. अशा ठिकाणी जमिनीवर प्लॅस्टिकचे व चिकण मातीचे आवरण केले जाते, जेणेकरून कचऱ्यातील पाणी जमिनीत मुरत नाही.
  • पायरोलिसिस: ही एक शास्त्रीय पद्धत असून त्यात कचऱ्याचे उच्च तापमानास ज्वलन केले जाते. या पद्धतीत जैववायूपासून विद्युतऊर्जा निर्मिती केली जाते.
  • भट्टीतील ज्वलन/भस्मीकरण: ही एक औद्योगिक पद्धत आहे, ज्यात कचऱ्याचे साध्या घन अथवा वायूस्वरूपात रूपांतरित केले जातात. या पद्धतीमध्ये, भट्टीमध्ये कचऱ्याचे उच्च तापमानावर ज्वलन केले जाते. सामान्यपणे, जैविक वैद्यकीय कचऱ्यासाठी ह्या पद्धतीचा वापर होतो.

() हवामान अंदाज आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

  • विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने आता हवामानाचा अंदाज वर्तवणे सोपे झालेले आहे. पूर, भूकंप, चक्रीवादळे इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या काळात परिणामकारक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी हवामानाचा अंदाज मदतगार ठरतो.
  • ज्या वेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा जीवित आणि संपत्ती यांचे खूप मोठे नुकसान होते. गुरे-ढोरे मरण पावतात. लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात. यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तेथून हलवले जाते.
  • याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2013 साली 'फालीन' हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर येणार, असे भारतीय वेधशाळेचे भाकीत होते. 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे आपल्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून ओडिशाच्या किनाऱ्यावर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या पाच लाख लोकांना पुढच्या 3-4 दिवसांत तेथून सुरक्षित जागी हलवले. खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकली असती अशी जीवितहानी अशा व्यवस्थेने टाळता आली.
  • या उदाहरणावरून हे स्पष्ट होते, की हवामानाच्या अंदाजानुसार आपण आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य ती खबरदारी घेऊ शकतो आणि आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार राहू शकतो. यामुळे, हानीची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि आपत्तीपासून जलद सुटका मिळू शकते.
  • आतासुद्धा वादळ, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील, मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असेल, तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जनतेला सतर्क करते. लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयातुन मोबाइलवर संदेश पाठवले जातात.

() -कचरा घातक का आहे? याबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर :

  • ई-कचरा हा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण होतो.
  • दूरदर्शन संच, मोबाइल फोन्स, संगणक, म्युझिक सिस्टिम्स अशा अनेक उपकरणांची विल्हेवाट लावणे ही एक फार मोठी समस्या झालेली आहे.
  • हा ई-कचरा धोकादायक असतो; कारण त्यात घातक रासायनिक संयुगे असतात आणि शिसे, बेरिलिअम, पारा व कॅडमिअमसारखे जड धातू देखील आढळतात.
  • हे जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात.
  • मातीतील विघटनकारी सूक्ष्मजंतूंवर ई-कचऱ्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होतो.
  • ई-कचरा मानवाच्या आरोग्यासही घातक आहे.
  • ई-कचऱ्याचे ज्वलन किंवा भूमिभरण केल्यास तेही हानिकारक ठरते. ई-कचरा अशा रितीने घातक आहे.

() घनकचरा व्यवस्था पनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल?

उत्तर :

  • मी सर्वप्रथम आमच्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करीन. सुका कचरा व ओला कचरा साठवण्यासाठी वेगवेगळे डबे घेईन.
  • ओला कचरा बागेत नेऊन एका कोपऱ्यात खड्डा खणून विघटनासाठी ठेवीन. यात गांडुळे सोडली तर जलदरीत्या खत निर्मिती करता येईल.
  • सुक्या कचऱ्यात कोणकोणते घटक आहेत हे तपासेन व त्याप्रमाणे त्यांचे नियोजन करेन. भंगारवाला आणि रद्दीवाला यांच्या दुकानात जाऊन अशा वस्तू विकून थोडे पैसे मिळतील. या पैशातून झाडांची रोपे आणून माझ्या कंपोस्ट खड्ड्यासभोवती लावीन.
  • फळांच्या बिया कधीही फेकून देणार नोही. त्यापासून रोपे बनवण्याचा प्रयत्न करीन.
  • कचरा कमी करणे (Reduce), कचऱ्याचा पुनर्वापर (Reuse), कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण (Recycle), अविघटनशील पदार्थां पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे (Refuse), ही R तत्त्वे आचरणात आणीन.
  • मी जे करतो ते माझ्या इमारतीतल्या आणि सोसायटीतल्या इतर मुलांना पटवण्याचा प्रयत्न करीन.

प्रश्न 4. टीपा लिहा.

() हवामानशास्त्र

उत्तर :

  • हवामानशास्त्र हे हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र आहे.
  • याच्या अंतर्गत तापमान, हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो.
  • काही वर्षांच्या माहितीचा साठा केलेला असतो.
  • जुन्या आणि वर्तमानातल्या माहितीवरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात.
  • या अंदाजांचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, मानवसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
  • या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक हवामानशास्त्र संघटना काम करते. तर आपल्या राष्ट्रीय पातळीवर भारतीय हवामान खाते हवामानविषयक संशोधन करीत असते.

(२) हवामानाचे घटक,

उत्तर :

  • वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान असे काही हवामानाचे विविध घटक आहेत.
  • हे सर्व घटक वातावरणाची तत्कालीन स्थिती ठरवतात.
  • एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात.
  • हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप केले जाते आणि त्यावरून त्या प्रदेशाचे हवामान ठरले जाते.

(३) मान्सून प्रारूप,

उत्तर :

डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या अभ्यासगटाने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवले आहे. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप भारतात वापरले गेले. या प्रारूपामुळे मान्सूनचा नेमका अंदाज येतो.

मान्सून प्रारूपाचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार आहेत :

  • संख्यात्मक प्रारूप (डायनॅमिक)/ गणितीय मॉडेल : हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेतला जातो आणि त्यावरून संख्यात्मक रूपांद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो.
  • समुच्चित प्रारूप : अनेक रूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे, अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात देतो.
  • सांख्यिकी प्रारूप : विविध प्रदेशांत समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता या सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास केला जातो. त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत ते पाहिले जाते. याला अनुसरून सद्य:स्थितीत मान्सून कसा असेल असा अंदाज प्रारूपात लावला जातो.

(४) औद्योगिक कचरा,

उत्तर :

  • कारखाने आणि विविध उद्योगांतून निर्माण होणारे, नको असलेले पदार्थ म्हणजेच औद्योगिक कचरा होय.
  • यात रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू इत्यादी मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • यातले बहुतेक पदार्थ विषारी असू शकतात. त्यांनी हवा, जल आणि जमिनीचे प्रदूषण होते.
  • औद्योगिक कचरा अविघटनशील असल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा पशु-पक्षी आणि मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

(५) प्लॅस्टिक कचरा,  

उत्तर :

  • प्लास्टिक कचरा हा मूलतः घरगुती घनकचऱ्यातून खूप जास्त प्रमाणात सर्वदूर पसरला जातो.
  • प्लास्टिक हे अविघटनशील असल्याने हजारो वर्षे पर्यावरणात ते तसेच पडून राहते. प्लास्टिकचा कचरा जाळल्यास त्यातून विषारी वायूंची निर्मिती होते.
  • प्लास्टिकच्या भक्षणाने गुरे मरतात. जलचरांनाही तरंगत्या प्लास्टिकने धोका पोहोचतो.
  • प्लास्टिक कचरा निर्माण करणारा फक्त मानव, मात्र त्याचे दुष्परिणाम पूर्ण परिसंस्था. भोगते.
  • याचा विचार करून प्लास्टिकच्या अतिवापरावर अंकुश आला पाहिजे आणि या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे.

(६) प्रथमोपचाराची मूलतत्त्वे

उत्तर :

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्याअगोदर प्रथमोपचार केले जातात. यात तीन महत्त्वाचे उपाय आहेत. या उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्त्वे असे म्हणतात.

  • A - श्वसनमार्ग (Airway): आपद्गस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
  • B - श्वासोच्छवास (Breathing): जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपद्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
  • C - रक्ताभिसरण (Circulation): जर आपद्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio – Pulmonary Resuscitation) म्हणतात. आपद्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.

प्रश्न 5. हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर :

हवामानाचे सजीवसृष्टीमधील महत्त्व पुढीलप्रमाणे आहे :

  • दैनंदिन हवेचा आणि दीर्घकालीन हवामानाचा संपूर्ण परिसंस्थेवर आणि मानवी जीवनपद्धतीवर प्रभाव पडत असतो.
  • प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पती म्हणजेच जैवविविधता तेथल्या स्थानिक हवामानानुसारच ठरतात.
  • एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती तेथल्या स्थानिक हवामानाप्रमाणे असते.
  • उदाहरणार्थ, थंड प्रदेशातील काश्मिरी आणि उष्ण राजस्थानमधील लोकांचा आहार, वेश आणि राहणीमान निरनिराळे असते. थंड प्रदेशात राहणारे लोक त्यांना उबदार ठेवण्यासाठी अधिक उष्णता मुक्त करणारे अन्न खातात तर उष्ण प्रदेशात राहणारे लोक अन्न खातात ज्यात थंड गुणधर्म असतात. ध्रुवीय अस्वल ध्रुवीय प्रदेशात (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक) आढळतात तर उंट वाळवंटी भागात आढळतात. ही काही उदाहरणे आहेत जी हवामानाचे महत्त्व स्पष्ट करतात.
  • समुद्राच्या पाण्याची क्षारता, सागरप्रवाहांची व जलचक्राची निर्मिती अशा सर्व बाबी हवा व हवामानावरच अवलंबून असतात.
  • हवामानातील विविध घटक भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडकांची धूप करतात. यालाच विदारणाचे कार्य म्हणतात. यामुळेच मातीची निर्मिती आणि विकास होत असतो. हवामानाचे शिलावरणाच्या समृद्धीत खूप महत्त्व आहे.
  • मातीत असणारे विघटक जीवाणू सेंद्रिय द्रव्याची निर्मिती करतात. ही विघटन प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते.

प्रश्न 6. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

रुग्णांचे वहन करण्याच्या विविध पद्धती आहेत. कोणत्या प्रकारे रुग्ण आजारी आहे किंवा त्याला कोणती इजा झाली आहे यावर ठरावीकच पद्धत वापरली जाते.

पाळणा पद्धत, पाठुंगळीला मारणे, मानवी कुबडी पद्धत, खेचून नेणे किंवा उचलून नेणे, चार हातांची बैठक, दोन हातांची बैठक किंवा स्ट्रेचरचा वापर या निरनिराळ्या पद्धती आहेत.

उदाहरणे :

  • एखाद्या व्यक्तीचा अपघातामुळे एक पाय जायबंदी झाला असेल तर त्याच्या दुसऱ्या पायावर त्याला थोडा भर देऊन चालायला सांगावे. असे करताना आपण त्याला कुबडीप्रमाणे आधार द्यावा. यालाच मानवी कुबडी पद्धत असेही म्हटले जाते.
  • अपघातग्रस्त व्यक्ती आपले हात वापरू शकत नसेल तर दोन जणांनी दोन हातांची बैठक या पद्धतीने अशा रुग्णाला वाहून न्यावे.
  • जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा याच दोन जणांना चार हातांची बैठक हा उपाय वापरता येतो.

या सर्व पद्धती वापरताना अपघातग्रस्त रुग्णाला कमीत कमी त्रास होईल हे पाहिले पाहिजे. त्याच्या दुखावलेल्या अवयवांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णाला आराम पडेल, धीर येईल अशा रितीने आपण वागले पाहिजे.

प्रश्न 7. फरक स्पष्ट करा.

() हवा हवामान

उत्तर :

हवा हवामान
वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी परिस्थितीला हवा म्हणतात. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात.
हवेत अल्पकाळात बदल होतात. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो.
एका प्रदेशातीलही हवेत सातत्य नसते. हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते.
हवा सतत बदलत असते. हवामान सतत बदलत नाही.
हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो.

() विघटनशील अविघटनशील कचरा.

उत्तर :

विघटनशील कचरा अविघटनशील कचरा
ज्या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते, त्याला विघटनशील कचरा असे म्हणतात. ज्या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होत नाही, त्याला अविघटनशील कचरा असे म्हणतात.
या प्रकारच्या कचऱ्याला ओला घनकचरा असे म्हणतात. या प्रकारच्या कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात.
अशा प्रकारचा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहत नाही. अशा प्रकारचा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहतो.
या कचऱ्यापासून विघटन होऊन सजीवांचे असेंद्रिय पदार्थ निसर्गात परत येतात. या कचऱ्यापासून नैसर्गिक विघटन होत नाही. परंतु पुनर्चक्रीकरण केल्यास यातील

काही पदार्थ पुन्हा वापरता येतात.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन-Notes

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन-Solutions

PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-9- पर्यावरणीय व्यवस्थापन-Text Book

PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF)

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-8- उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - Online Solutions

Next Chapter : पाठ-10- माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - Online Solutions

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *