Solution-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-1- गतीचे नियम-Maharashtra Board

गतीचे नियम

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-1-Maharashtra Board

Solution

प्रश्न 1. खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा तिसरा स्तंभ जोडा नव्याने सारणी तयार करा.

.नं. स्तंभ-1 स्तंभ-2 स्तंभ -3
1 ऋण त्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते
2 धन त्वरण वस्तूचा वेग कमी होतो एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.
3 शून्य त्वरण वस्तूचा वेग वाढतो एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.
उत्तर :

.नं. स्तंभ-1 स्तंभ-2 स्तंभ -3
1 ऋण त्वरण वस्तूचा वेग कमी होतो एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.
2 धन त्वरण वस्तूचा वेग वाढतो एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते
3 शून्य त्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.

प्रश्न 2. फरक स्पष्ट करा.

() अंतर आणि विस्थापन

उत्तर :

अंतर विस्थापन
अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असणाऱ्या वस्तूने प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय. विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे सर्वांत कमी अंतर होय.
अंतर राशीला दिशा नसते. विस्थापन या राशीला दिशा असते.
अंतर हे विस्थापनाच्या परिमाणाएवढे अथवा त्यापेक्षा जास्त असते. विस्थापनचे परिमाण अंतराएवढे अथवा अंतरापेक्षा कमी असते.

() एकसमान गती आणि नैकसमान गती

उत्तर :

एकसमान गती नैकसमान गती
वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास, तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असल्यास, तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात.
यात वस्तूची चाल बदलत नाही. यात वस्तूची चाल बदलते.
सर्व एकसमान त्वरणित गतीसाठी वेग - काल आलेख हा सरळ रेषा असतो. नैकसमान त्वरणित गतीसाठी वेग - काल आलेख वेळेनुसार वेगात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो.

प्रश्न 3. खालील सारणी पूर्ण करा.

u (m/s) a (m/s2) t (sec) v = u + at (m/s)
2 4 3  
  5 2 20

 

u (m/s) a (m/s2) t (sec) s = ut + \(\frac{1}{2}\)at2 (m/s)
5 12 3  
7   4 92

 

u (m/s) a (m/s2) t (sec) v2 = u2 + 2as (m/s)
4 3   8
  5 8.4 10

उत्तर :

u (m/s) a (m/s2) t (sec) v = u + at (m/s)
2 4 3 14
10 5 2 20

 

u (m/s) a (m/s2) t (sec) s = ut + \(\frac{1}{2}\)at2 (m/s)
5 12 3 69
7 8 4 92

 

u (m/s) a (m/s2) t (sec) v2 = u2 + 2as (m/s)
4 3 8 8
4 5 8.4 10

प्रश्न 4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा त्यांचे स्पष्टीकरण लिहा.

() वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे ........ म्हणतात.

उत्तर :

वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे विस्थापन म्हणतात.

() अवत्वरण म्हणजे ................ त्वरण होय.

उत्तर :

अवत्वरण म्हणजे ऋण त्वरण होय

() जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा ........... प्रत्येक बिंदूपाशी बदलतो.

उत्तर :

जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो.

() टक्कर होताना ......... नेहमी अक्षय्य राहतो.

उत्तर :

टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय्य राहतो.

() अग्नीबाणाचे कार्य   न्यूटनच्या  ............ नियमावर आधारित आहे.

उत्तर :

अग्नीबाणाचे कार्य   न्यूटनच्या  तिसऱ्या नियमावर आधारित आहे.

प्रश्न 5. शास्त्रीय कारणे लिहा.

() जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते.

उत्तर :

  • मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते.
  • पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे हे बल (जवळजवळ) एकसमान असते. त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही (जवळजवळ) एकसमान असते.

() क्रिया बल प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत.

उत्तर :

क्रिया बल व प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तूंवर कार्यरत असल्याने त्यांचे पश्माण समान व दिशा परस्परविरुदूध असल्या तरी ती बले एकमेकांना निष्प्रभ करीत नाहीत.

() समान वे असणाऱ्या चेंडू पैकी क्रिकटेचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते.

उत्तर :

  • वस्तूचा संवेग = वस्तूचे वस्तुमान x वस्तूचा वेग.
  • टेनिसच्या चेंडूपेक्षा क्रिकेटच्या चेंडूचे वस्तुमान जास्त असते. त्यामुळे दोन्ही चेंडूंचा वेग समान असताना क्रिकेटच्या चेंडूचा संवेग टेनिसच्या चेंडूच्या संवेगापेक्षा जास्त असतो.
  • तसेच क्रिकेटचा चेंडू टेनिसच्या चेंडूपेक्षा कडक असतो. त्यामुळे समान वेग असणाऱ्या चेंडूंपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते.

() विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते.

उत्तर :

  • ज्या गतीमध्ये वस्तू खूप लहान व समान कालावधीत समान अंतर कापते, तिला एकसमान गती म्हणतात.
  • विराम अवस्थेतील वस्तूची चाल कायम शून्य असते, म्हणजेच कोणत्याही कालावधीत वस्तूने कापलेले अंतर समान (येथे शून्य) असते. म्हणून विराम अवस्थेतील वस्तूची गती एकसमान समजली जाते.

प्रश्न 6. तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण लिहा.

उत्तर :

(i) टेबलावर ठेवलेल्या काचेच्या चिपेवर दोन संतुलित बले क्रिया करतात: (i) काचेच्या चिपेवर अधोगामी दिशेने क्रिया करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजेच वस्तूचे वजन व (ii) टेबलाच्या पृष्ठभागाने वस्तूवर ऊर्ध्वगामी दिशेने प्रयुक्त केलेले बल. या बलांचा वस्तूवरील एकत्रित परिणाम शून्य असल्याने ती वस्तू विराम अवस्थेतच राहते. न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमानुसार जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.

(ii) बंदूक उडवली असता बंदुकीची गोळी वेगाने पुढे जाते ब तिच्या प्रतिक्रिया बलामुळे बंदुकीचा दस्ता मागे ढकलला जातो. न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार क्रिया बल आणि प्रतिक्रिया बल समान परिमाणांची असतात व त्या बलांच्या दिशा परस्परविरुद्ध असतात.

(iii) जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो, तेव्हा चेंडूसुद्धा त्याच वेळी समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल विरुदध दिशेने बॅटवर प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग वाढतो, तर बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटचा पुढच्या दिशेने असलेला वेग कमी होतो.

(iv) टेबलावर ठेवलेले पुस्तक आपल्या वजनाइतके बल टेबलावर अधोगामी दिशेने प्रयुक्त करते, त्याच वेळी टेबल तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रिया बल पुस्तकावर ऊर्ध्वगामी दिशेने प्रयुक्त करते.

(v) गोट्या खेळताना असे आढळते की, दोन गोट्या सारख्याच वस्तुमानाच्या व आकारमानाच्या असल्यास जेव्हा गतिमान गोटी स्थिर गोटीवर आघात करते, तेव्हा काही वेळा गतिमान गोटी स्थिर होते आणि स्थिर गोटी (जवळजवळ) गतिमान गोटीच्या आघातापूर्वीच्या वेगाने गतिमान होते. यामध्ये दोन गोट्यांचा एकूण संवेग कायम राहतो. यावरून असे दिसते की, बाह्य बलाची क्रिया होत नसताना जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, तेव्हा त्या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतका असतो (संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत ).

प्रश्न 7. उदाहरणे सोडवा.

() एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा.

उत्तर :

दिलेले : s1= 18 m, s2 = 22 m, s3 = 14 m t1 = 3 s, t2 = 3 s, t3 = 3 s,

सरासरी चाल = ?

सरासरी चाल = \(\frac{s}{t}=\frac{s_1+s_2+s_3}{t_1+t_2+t_3}=\frac{18+22+14}{3+3+3}=\frac{54}{3}\)= 6 m/s

() एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 m/s2 त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तु मानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती?

उत्तर :

दिलेले : m1= 16 kg, a1 = 3 m/s2, F1 = ?, m2 = 24 kg, F1 = F2, a2 = ?

F1 = m1a1 = 16 x 3 = 48 N

F2 = m2a2

48 = 24 x a2       ..…(F1 = F2)

∴ a2 = 48/24 = 2 m/s2

() बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 g असून ती 1.5 m/s वेगाने 90 g वस्तूमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा.

उत्तर :

दिलेले : m1 = 10 g = 10 x 10-3 kg,  u1 = 1.5 m/s, m2 = 90 g = 90 x 10-3 kg, u2 = 0 m/s, v1 = v2 = v

संवेग अक्षय्यतेच्या सिद्धांतानुसार,

m1 u1 + m2 u2 = m1 v1 + m2 v2

येथे, u2 = 0 m/s,  व v1 = v2 = v

∴ m1 u1 + 0 = m1 v + m2 v

∴ m1 u1  = (m1 + m2)v

∴ v = \(\frac{m_1u_1}{m_1+m_2}=\frac{10×10^{-3}×1.5}{10×10^{-3}+90×10^{-3}}\)

= \(\frac{15}{10+90}=\frac{15}{100}\)= 0.15 m/s

बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी 0.15 m /s या वेगाने गतिमान होते.

() एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल?

उत्तर :

s1= 100 m, s2 = 80 m, s3 = 45 m t1 = 40 s, t2 = 40 s t3 = 20 s,

सरासरी चाल = ?

सरासरी चाल = \(\frac{s}{t}=\frac{s_1+s_2+s_3}{t_1+t_2+t_3}\)

= \(\frac{100+80+45}{40+40+20}=\frac{225}{100}\)= 2.25 m/s

PDF-Notes, Solution, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-1- गतीचे नियम-Notes

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-1- गतीचे नियम-Solutions

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-1- गतीचे नियम-Text Book

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Next Chapter : पाठ-2- कार्य आणि ऊर्जा - online solution